11 नोव्हे 16
विद्यार्थी भारतीच्या 10 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा......!!!
मला पुरस्कार देऊन गौरविल्याबद्दल धन्यवाद...!!
विद्यार्थी भारती ही संघटना गेल्या 10 वर्षांपासून समग्र समाजपरिवर्तनासाठी संघर्ष करीत आहे्. रस्त्यावरचा संघर्ष असो की जेल भरो असो, संघटनेचा तरूण कधी मागे हटला नाही. वैचारिक अधिष्ठान असलेल्या या संघटनेने पुणे विद्यापीठाला
सावित्रीमाई फुलेंचे नाव देण्यासाठी संघर्ष केला. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी
जेल भरो आंदोलन केले. वैचारिक पाया पक्का व्हावा म्हणून संघटनेने वारंवार केडर कँप
घेतले. या सर्व संघर्षांचा मी स्वतः साक्षीदार आहे. अनेक कार्यक्रमात मला
निंमंत्रित केले असल्याने मी हे जवळून पाहीले आहे. या संघटनेत मुलींचे योगदान फार
मोठे आहे. पुजा, ज्योती यांनी तर आपली बेडेकर फॅमिली संघटनामय करून टाकलेली आहे.
या संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याचं व्यक्तीमत्व वेगळे आहे. किशोरदांनी तर आपले
पुर्ण आयुष्यच पणाला लावलेले आहे. ही संघटना केवळ सामाजिक नाही तर ते एक
जीवाभावाचं कुटुंबच आहे. किशोरदा या कुटुंबाचे आई, बाप भाऊ सर्वस्व आहेत.
अशा या लढाऊ संघटनेने
मला ‘संघर्षवीर’ सारखा मानाचा पुरस्कार देऊन गौरविले आहे. हा माझा बहुमानच आहे. या
वर्धापन दिनाला मी प्रत्यक्ष उपस्थीत राहून शुभेच्छा देऊ शकत नाही, याचे वाईट
वाटते आहे. परंतू सततच्या दौर््यांमुळे व कार्यक्रमांच्या धावपळीमध्ये आजारी
असल्याने मी उपस्थीत राहू शकत नाही. मला पुरस्कार देऊन गौरविल्याबद्दल पुन्हा एकदा
विद्यार्थी भारतीचे आभार मानतो.
संघटनेच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा
देतो. धन्यवाद!
...... प्रा. श्रावण देवरे, नाशिक,
मोबाईल- 94 22 78 85 46
ईमेलः- s.deore2012@gmail.com
No comments:
Post a Comment