http://shrwandeore.blogspot.in/

Tuesday, April 17, 2018

19 BahujanNama 15April 2018


एकोणविसावी  खेप......!  
  (दै. लोकमंथन रविवार – 15 April 2018 च्या अंकासाठी) 
 बहुजननामा-19
एकदा कॉंग्रेस, एकदा भाजप... उरावर घेण्याचा खेळ थांबवा ...!

बहुजनांनो.... !
काल औरंगाबादला संयुक्त जयंती निमित्ताने व्याखानासाठी आलो. संतोष नवतुरे,          भागवत गायकवाड आणी त्यांच्या 50 जणांच्या टीमने होनाजी नगरात भव्य जयंती उत्सवाचा कार्यक्रम घडवू आणला. मला काही नेत्यांशी चर्चा करायची असल्याने मी एक दिवस आधीच औरंगाबदला आलो होतो. कॉ. भालचंद्र कॉंगोशी व लाल निशाणचे कॉ. भीमराव बनसोड यांच्याशी अनेक मुद्दयांवर चर्चा झाली. मी माझी भुमिका मांडली. 2019 च्या निवडणूका 1977 सालच्या जनता पक्ष वा 1989च्या जनता दलासारख्या अशास्त्रीय मोट न बांधता 2019 च्या निवडणुकांसाठी अगदी स्पष्टपणे भुमिका घेत ‘जात्यंतक-वर्गांतक आघाडी’ स्थापन करून माननीय ऍड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवाव्यात. ज्याप्रमाणे 2014 साली ओबीसी वोटबँक कॅश करण्यासाठी ‘ओबीसी मोदींचा’ चेहरा परधानमंत्री म्हणून दिला, त्याचप्रमाणे आता बाळासाहेब आंबेडकरांचा पर्याय दिला पाहिजे.
बाळासाहेबांना नेतृत्व देण्यामागे एक सर्वात मोठेकारण हे आहे की,
1)  त्यांचे नेतृत्व आज देशपातळीवर सर्व पुरोगामी पक्ष-घटनांना मान्य झालेलं नेतृत्व आहे.
2)  या पर्वी लालूंचा पर्याय पुढे आला होता, परंतू राजकिय गुन्होगारी विरोधी कायदा करून लालूंचा कयमस्वरूपी बंदोबस्त करण्यात आला.
3)  त्यानंतर नितीश कुमारांना भावी प्रधानमंत्री म्हणून मान्यता मिळत असतांनाच त्यांना चारा घोटाळ्यात ब्लॅकमेल करण्यात आलं व लालूंशी असलेली त्यांची दोस्ती तोडण.या भाग पाडण्यात आलं.
4)  बहनजी मायावती सतत जेलमध्ये जाण्या भीतीने दहशतीत वावरत असतात, त्यामुळे त्यांना प्रधानमंत्री बनण्याची स्वप्ने पढणे बंद झालेलं आहे.
5)  शेवटचा एक पर्याय भुजबळसाहेबांचा होता, तोही आता संपलेला आहे.
अशाप्रकारे पुरोगामी पक्षातले सर्व पर्याय संपविण्यात आलेले आहेत. आता एकमेव पर्याय फक्त बाळासाहेब आंबेडकरांचा उरलेला आहे. बहन मायावती जी सोडल्यात तर बालासाहेबांच्या नावाला फारसा कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. व्यक्तीगत कारणे सोडलीत भुमिका म्हणून व काळाची अंतिम गरज म्हणून बाळासाहेब हेच एकमेव पर्याय आहेत. बाळासाहेबांची दुसरी एक मोठी जमेची बाजू म्हणजे ते देश पातळीवरचे बहुजन नेते म्हणून मान्यता पावत असतांना त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी कोणतेही कारण अस्तित्वात नाही. त्यांचा अपघात घडवून त्यांना ठारही केले जाऊ शकत नाही. कारण मुंडे साहेबांना ठार मारल्यानंतर ओबीसी बांधवांचा संतापजनक उद्रेक ब्राह्मणवादी नेत्यांनी पाहिला व अंत्ययात्रेपासून पळ काढला. काहींनी पोलीसांचा आधार घेत अर्ध्या रस्त्यावरून परतीची धुम ठोकली. त्यामुळे आता दलित व ओबीसींच्या संयुक्त जागृतीच्या परिणामी ‘खुन करण्यासारखे’ अतिरेकी पाऊल ब्राह्मणवादी उचलणार नाहीत, हे निश्चित.
जातीच्या प्रश्नावर डावे (कम्युनिस्ट) मवाळ होत आहेत, ही आनंदाची बाब आहे. मुंबईच्या अधिवेशनात सीपीआय ने ओबीसी जनगणनेवरचा ठराव मंजूर केला. त्यानंतर शहादे येथील राज्य अधिवेशनातही हा ठराव मंजूर झाला. आता हा ठराव पॉलिटब्युरोपर्यंत जाऊन देशपातळीवर ओबीसी जनगणनेचे आंदोलन उभे राहीले तर त्याचा निश्चित परिणाम 2019 च्या निवडणुकात होईल व दलित-ओबीसींच्या वाढत्या संयुक्त जागृतीमुळे नियोजित ‘जात्यंतक-वर्गांतक’ राजकीय आघाडी प्रचंड बहुमताने सत्तेवर येईल, यात फारशी शंका घेण्याचे कारण नाही.
एक अत्यंत महत्वाचा अडथळा यात आहे. कॉंग्रेस सोबत जावे की जाऊ नये यावर सीपीएम मध्ये घमासान चालू आहे. त्यालाच जोडून महाराष्ट्रात एक उप-अडथळा येत आहे. महाराष्ट्रातील डाव्यांना कधी नव्हे ते पवारसाहेबांबद्दल अतिप्रेम वाटायला लागले आहे. अर्थात 1978 च्या पुलोदने जोडलेले हे प्रेम एक राजकीय तात्पुरता प्रसंग म्हणून सोडून दिले पाहिजे व एक नवा पर्याय बाळासाहेबांसारखा स्वीकारला पाहजे. छगन भुजबळांना भ्रष्चारी म्हणून हिणविणार्‍या डाव्यांना मात्र महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवाव्याशा वाटणे, हा एक फार मोठा विनोदच आहे. निवडणुका लढविण्यासाठी पैसा लागतो, हे मान्य करूनही त्यासाठी एवढी खालची पातळी गाठून राजकीय तडजो डावे कशी करू शकतात?
कॉंग्रेस काय आणी राष्ट्रवादीसारखी त्यीं पिल्ले काय, हे सर्व शेवटी आर.एस.एस. च्या दारातले कस्टमरच आहेत. आर.एस.एस. ची भुमिकाच आहे की या देशात कायमस्वरूपी कॉंग्रेसचेच राज्य असावे. परंतू लोकशाहीत अँटीईन्कंबसीमळे लोक पर्याय शोधतात व त्यातून लालू-मुलायम-मायावती-भुजबळांसाखे जातीविरोधी पर्याय पुढे येतात. त्यामुळे आर.एस.एस. ला नाईलाजास्व भाजपचा पर्याय पुढे आणावा लागतो. कॉंग्रेसला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची मोट बांधून भाजपला पुढे आणायचे व नंतर भाजपाला पराभूत करण्यसाठी पुहा कॉंग्रेसच्याचनेतृत्वखाली निवडणूका लढवाव्यात, हा धंदा किती वर्षे चालू ठेवायचा? एकदा कॉंग्रेसला उरावर बसवायचे व त्यानंर भाजपाला पर्याय म्हणून पुन्हा उरावर घ्यायचे. हीच तर भुमिका आरएसएस ची आहे. तिला छेद दिला पाहिजेच.
2019 च्या निवडणुका पुन्हा भाजपा सत्तेवर येण्याची कोणतीही भीती न बाळगता ‘जात्यंतक-वर्गांतक’’ राजकय आघाडीचा पर्याय लोकांसमोर उभा केला पहिजे. तरच पल्य पुरोगामी चळवळींचे अस्तित्व कायम राहील व आपली निर्णय प्रक्रियेतील दखल कायम राहील. ‘कॉंग्रेस-भाजपाच्या’ आरएसएस प्रणित खेळात आपण केवळ एक प्यादे म्हणून काम करीत राहिलोत तर लोकांच्या लेखी आम्हीही अर.एस.एस चे एक हस्तक म्हणूनच सिद्ध होऊ! निर्णय प्रक्रिया गमावून बसलेल्यांना क्रांतिकारक कसे म्हणायचे, हाही फार मोठा प्रश्न जनतेसमोर उभा राहील.

सत्य की जय हो !!




------- प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270
                                      Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/
                                       Email- s.deore2012@gmail.com

12 BahujanNama Lokmanthan 25 Feb 18


बहुजननामा          बारावी खेप                      (दिनांकः- 25 फेब्रु च्या अंकासाठी)
मोक्याच्या आणि मार्याच्या जागा सामाजिक युद्ध!
प्रत्येक युगात महापुरूष निर्माण होतात. त्यांचे समकालीन असलेल्या प्रतिमहापरूषांशी त्यांचा समोरासमोरचा संघर्ष असतो. ते एकमेकांचा राग-द्वेष करतात, आपापल्या भुमिका तावातावाने मांडतात, त्यासाठी आंदोलन-प्रतिआंदोलनही करतात कधीकधी समजदारीची भुमिका घेत एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देतात. प्रस्थापित व्यवस्था आपल्या हिताची भुमिका मांडणार्या व्यक्तिला विचारवंत, तत्वज्ञानी, युगपुरूष, महापुरूष, महात्मा, हतात्मा अशा पद्व्या देऊन गौरविते. तर विरोधी असलेल्या विस्थापितांच्या बाजूने लढणार्या व्यक्तीला धर्मद्रोही, देशद्रोही, अराजकतावादी, जातीयवादी, वंशवादी, बाटगा वगैरे विशेषणे लावून बदनाम करीत असते. अशा परिस्थितीत शोषित-पिडित जनता जेवढ्या प्रमाणात जागृत होते तेवढ्या प्रमाणात त्यांच्याही महान व्यक्तींचा गौरव होतो. महापुरूषांचा हा गौरव नंतर अनावश्यकपणे इतक्या खालच्या स्तरावर जातो की त्यातून भजन-भक्ती सुरू होते. महापुरूष वा महानस्त्रिया यांना देवत्वाचे स्वरूप प्राप्त होते. या देवत्वाचे अर्थकारण बाजार-व्यवस्था काही मुठभर लोकांना आपले नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी मदत करते. गल्लीबोळात छोटे छोटे मंडळ स्थापन करून उत्सव साजरे करणारी तरूणाई पावती-पुस्तके घेऊन दारोदारी फिरतांना दिसते. महापुरूषांच्या भक्तीभजनात आपलाही हाथभर लागावा म्हणून मध्यमवर्गीय लोक आपापल्या परीने खिसा रिकामा करतात. या तरूणाईचे नेतृत्व करणारा गल्लीतील म्होरक्या लगेच नगरसेवक बनलेला दिसतो. पुढे आमदार, मंत्रीही होतो. तोच आमच्या चळवळीचा नेताही बनतो.
      प्रस्थापित ब्राह्मणी छावणीत असे घडतांना दिसते काय? काळानुसार देव बदलणारी ब्राह्मणी छावणी आपल्या जातीतून महापुरूष निर्माण होऊ देत नाहीत. निर्माण झालाच तर त्याला सरकारी महापुरूष बनवून बहुजनांच्या माथी मारतात, पण कोणत्याही परिस्थितीत ते स्वतः आपल्या डोक्यावर कधीच मिरवित नाहीत. ब्रह्मा-विष्णूला देव माणनारी ब्राह्मणी छावणी बौद्ध क्रांतीला शह देण्यासाठी क्षत्रिय राम-कृष्णाला देव बनवितात बहुजनांच्या माथी मारतात. ते फायद्यासाठी एखाद्यालामहात्माबनवितात तोटा दिसताच त्याला गोळ्या घालून ठारही करतात. टिळक, सावरकर, गोखले, रानडे हे कसे महान होते, हे आम्हाला शाळेत शिकवतील, पण त्यांच्या ब्राह्मण गल्ली-चौकात एकाचाही पुतळा दिसणार नाही घरात फोटो पण सापडणार नाही. महापुरूषांच्या जयंत्या मयंत्या साजरे करून त्यांचे नेतृत्व निर्माण होत नाही. त्यांचं नेतृत्व ते चोखंदळपणे निर्माण करतात. एक कवीकेवळ ब्राह्मण जातीत जन्मला प्रधानमंत्री झाला. आणी दुसरा एक दंगलखोरकेवळ बहुजन-ओबीसी होता म्हणून प्रधानमंत्री बनविला. प्रतिनिधिक लोकशाहीच्या दडपणाखाली बहुजन-ओबीसीतील एखाद्या नेत्याला उरावर घ्यावेच लागत असेल तर तो गुंड, दंगलखोरम्हणून भरपूर बदनाम झालेला पाहिजे तरच त्याला नेतृत्वाचे वरदान मिळते. आणी आम्ही सारे बहुजन आंधळेपणे त्यावर प्रेम करतो. हे केवळ जागृतीच्या अभावी होते. जागृत झालेले समाजही अशाप्रकारे पुन्हा झोपी जात आहेत.
      अशा -जागृतीचे एक मोठे कारण हे आहे की, बहुजन समाज हा नेहमीराजकीयसत्तेला प्राथमिक अंतिम मानतो. परंतूराजकीय सत्ताही समाजव्यवस्थेतील इतर सत्तेच्या परिणामी मिळत असते, हे सत्य जो समाज समजून घेतो त्याप्रमाणे काम करतो तोच समाज खर्या अर्थानेसर्वंकष सत्ताधारीअसतो. ‘’जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी’’ ही घोषणा किती फसवी होती आहे, हे अलिकडच्या काळातील घडामोडींनी सिद्ध केले आहे. संख्येच्या बळावर कधीच सत्ता मिळत नसते. तसे असते तर मुठभर साडेतीन टक्के लोक कधीच सत्तेवर येऊ शकले नसते. पण येथे तर साडेतीन टक्केच गेल्या 3-4 हजार वर्षांपासूनसत्ताधारीआहेत. त्याची कारणे शोधली पाहिजेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की, मोक्याच्या मार्याच्या जागांवर आपली माणसं असलीत तर निर्णय प्रक्रिया आपल्यासाठी राबविता येते. त्यासाठी आरक्षणाचा कार्यक्रम त्यांनी घटनासंमत करून राज्यकर्त्यांना राबविण्यास भाग पाडले. त्यामुळे आपली बरीच मंडळी मोक्याच्या मार्याच्या जागांवर गेलीत परंतू त्यांनी आपलं व्यक्तीगत भलं करून घेण्याचा एकहीमोकासोडला नाही. बाबासाहेब जेव्हामोका माराची भाषा वापरतात तेव्हा त्यांनासामाजिक युद्धाचीभुमिका मांडायची होती. सामाजिक युद्धात जिंकल्याशिवाय खरीखुरी राजकीय सत्ता मिळत नसते. सामाजिक युद्ध करता तहाची भाषा करणे म्हणजे भीख म्हणून काही दुय्यम सत्तापदे मिळविणे. सामाजिक युद्ध हे चळवळीतूनच उभे राहू शकते. चळवळ करण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज असावी लागते. या फौजेला बौद्धिक जैवीक रसद पुरवावी लागते. त्यासाठी संस्था उभ्या कराव्या लागतात. त्यातून पैसा वेळ देणारा वर्ग उभा राहतो. या सर्व गोष्टी आम्हाला माहीतच नाहीत.
आमच्या दृष्टीने चळवळ म्हणजे जयंती-मयंती साजरी करणे, रिडल्स, नामांतर, खैरलांजीसारख्या तात्कालिक प्रतिक्रियात्मक चळवळी करणे, फुलेवाडा (समताभुमी), चैत्यभुमी, दिक्षाभुमीच्या वार्या करणे. ब्राह्मणांना शिव्या देतो, परंतू त्यांच्यापासून काही शिकायचे नाही. ब्राह्मण बौद्धक्रांतीपासून बरेच काही शिकलेत. त्यामुळेच ते प्रतिक्रांती करू शकलेत. बौद्ध विद्यापीठांनी प्रशिक्षित स्वयंभू अशी बौद्ध भिक्खुंची फौज निर्माण केली. या फौजेने ब्राह्मणी वर्णव्यवस्थेविरूद्धचे सामाजिक युद्ध जिंकले, म्हणून बौद्धक्रांती झाली. ब्राह्मणांनी हे रहस्य जाणले आणी कामाला लागलेत. त्यांनी कोणती कामे केलीत ते आता पुढच्या भागात पाहू या!

प्रा. श्रावण देवरे,
मोबाईल- 88 301 27 270
ईमेल- s.deore2012@gmail.com