http://shrwandeore.blogspot.in/

Thursday, October 17, 2019

OBC VJNT Menifesto Maharashtra Assembly 2019

ओबीसी  व्हीजेएनटी  संघर्ष  समितीचे मतदारांना आवाहन!
ओबीसींचा निवडणूक जाहीरनामा
मतदार बहिणीं बंधुंनो!
निवडणूका येतात आणी जातात, उमेदवार निवडतात आणी पडतातही! आणी आपण दर पांच वर्षांनी नियमितपणे वोटींग मशिनची बटणे दाबतच असतो. कोणी गाजर दाखवितो विकासाचं, तर कुणी आमिष दाखवितो पैशांचं! निवडून आल्यावर नेतेही गायब आणी विकासही गायब...!
आतापर्यंत 70 वर्षात अनेक राजकीय पक्ष सत्तेवर आलेत व गेलेत. बहुतेक सर्व पक्ष पेशवाई व भांडवलशाहीचे हस्तक होते व आहेत. त्यामुळे जातीव्यवस्थेने पिडलेल्या 85 टक्के जनतेचा विकास ते करू शकलेले नाहीत. आता आपल्यासमोर वंचित बहुजन आघाडी पक्षाचा पर्याय उपलब्ध आहे. हा पक्ष फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा पाईक आहे. या पक्षाला मोठ्या प्रमाणात दलित व कष्टकरी जनतेचा पाठिंबा आहे. जर 52 टक्के ओबीसींनी या पक्षाला मते देऊन सत्तेवर बसविले तर आपल्या ओबीसींसकट दलित-आदिवासी-मुस्लीम जनतेच्या व कष्टकर्‍यांच्या विकासाच्या योजना अमलात येतील. आजवर आपल्या मतांवर सरंजामदार-वतनदार व मनुवादी-पेशवे सत्ताधारी झालेत. आता पहिल्यांदाच आपण अशा पक्षाला सत्तेवर बसवू की ज्यांचे धोरण व कार्य मागास जनतेच्या व कष्टकर्‍यांच्या हिताचे आहे.
विविध जातींचा अभ्यास करून त्यांच्या विकासाच्या योजना आखण्यासाठी पुढीलप्रमाणे कृती कार्यक्रम राबवावा लागेल. नव-निर्वाचित विधान सभेत हा कृती कार्यक्रम अमलात आणण्यासाठी मोठ्याप्रमाणात वंचित बहुजनांचे व कष्टकर्‍यांचे प्रतिनिधी पाठवा. वंचित बहुजन आघाडीचे आमदार पुढीलप्रमाणे आपल्या हिताचे कृती-कार्यक्रम राबवतील.    
जाहीरनामा अर्थात कृती-कार्यक्रमः-
1)    जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय आपल्या जातीसाठी विकासाच्या योजना राबवीता येत नाहीत. ओबीसीं-व्हीजेएनटी यांची जातनिहाय जनगणना व ब्राह्मण-मराठासकट सगळ्याच जात-पोटजातींची जनगणना झाली पाहिजे, यासाठी ते विधानसभेत पहिल्याच आठवड्यात विधेयक मांडतील व ते मंजूर करून घेण्यासाठी जिवापाड प्रयत्न करतील.
2)    कॉंग्रेस-राष्ट्रवादी व भाजप-सेनेच्या गेल्या 15 वर्षांच्या काळात ओबीसी-भटके, दलित व आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आलेली आहे. ती पुन्हा सुरू करण्यासाठी विधानसभेत आवाज उठवतील.
3)    मेडिकल, इंजिनिअरींग, आय.आय.टी., आय.आय.एम. यासारख्या उच्च शिक्षणसंस्थांमधील ओबीसी विद्यार्थ्यांचे आरक्षण नगण्य केले गेले आहे. ओबीसी-दलित-भटके विमुक्त विद्यार्थी या उच्च शिक्षणसंस्थात प्रवेशच घेणार नाहीत, अशी वेगवेगळी षडयंत्रे रचली जात आहेत. याला कायमचा पायबंद घालण्यासाठी विधानसभेत संघर्ष करतील.
4)    समांतर आरक्षणाच्या नावाखाली व क्रिमी लेयरच्या गोंधळाखाली आपल्या तरूणांना मिळालेल्या नोकर्‍या नाकारल्या जात आहेत. हे षडयंत्र कायमचे हाणून पाडण्यासाठी स्पष्ट व कडक कायदा केला पाहिजे. त्यासाठी ते प्रयत्न करतील.
5)    मराठा समाजाला एस.ई.बी.सी. म्हणजेच ओबीसी दर्जा देऊन मूळ खर्‍या ओबीसी जातींचे आरक्षण धोक्यात आलेले आहे. ओबीसीं व बारा बलुतेदार जातींची लोकसंख्या 52 टक्के असून त्यांना तुटपुंजे 19 टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे. त्यात आता मराठा सारखी सत्ताधारी जात समाविष्ट झाली तर, खर्‍या ओबीसीला शिपायाची नोकरीसुद्धा मिळाणार नाही. ओबीसी व बारा बलुतेदार जातींना त्यांचे हक्काचे पूर्ण आरक्षण मिळावे, यासाठी विधानसभेत नवे विधेयक ते मांडणार आहेत.
6)    आतापर्यंत बारा बलुतेदार जातींचे व्यवसाय ‘सेवा-धर्मी’ होते. म्हणजे मोबदला (गवाही) कितीही कमी मिळाला, तरी सेवा म्हणून काम करीतच राहायचे. हे आता थांबले पाहिजे. सुतार काम, लोहार काम, कुंभारकाम आदि नव-सृष्टी निर्माण करणार्‍या व्यवसायांना ‘उद्योगाचा दर्जा’ देऊन त्यासाठी किमान दोन कोटींचे कर्ज विनातारण दिले पाहिजे. त्यासाठी ते प्रयत्न करतील.
7)    सहकार तत्वावर बारा बलुतेदार व्यवसायांचे वर्गीकरण करून त्यांचे एकत्रित भव्य वर्कशॉप्स ग्रामिण भागात निर्माण झाले पाहिजेत व तेथील उत्पादन विक्रीसाठी शहरात भव्य शॉपिंग मॉल्स उभारले पाहिजेत. असे झाले तरच बारा बलुतेदार जाती भांडवली लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात येतील. यासाठी ते विधानसभेत ऍक्शन-प्रोग्राम सादर करतील व तो शासनाकडून मंजूर करून घेतील.
8)    देशातील बड्या भांडवलदारांनी ओबीसी-बारा बलुतेदार व भटक्या-विमुक्त जातींच्या व्यवसायिकांना आपल्या कारखान्यांच्या आर्थिक उलाढालीतील किमान 10 टक्के सहभाग कायद्याने देण्यास भाग पाडले जाईल, यासाठी ते विधानसभेत विधेयक मांडणार व ते मंजूर करून घेणार.
9)    निती आयोग रद्द करून नियोजन आयोगाचे नव्या सुधारित नियमांसह पुनर्रज्जीवन करण्यासाठी संघर्ष करतील. देशातील सर्व मागास असलेल्या ओबीसी, व्हीजेएनटी, दलित, आदिवासी व अल्पसंख्य जाती-जमातींच्या विकासासाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या बजेटमध्ये तरतूद झाली पाहिजे, यासाठी ते संघर्ष करतील.
10)            मुसलमान समाजासाठी सच्चर आयोग, ओबीसींसाठी नचिअप्पन अहवाल, शेतकर्‍यांसाठी स्वामीनाथन आयोग व भटक्या-विमुक्तांसाठी रेंडके कमिशन रिपोर्ट अमलात आणण्यासाठी विधानसभेत आवाज उठवतील.
11)             ओबीसी-व्हिजेएनटी कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांना प्रमोशनमध्ये रिझर्वेशन मिळालेच पाहिजे, यासाठी विधानसभेत विधेयक सादर करतील.
12)             मराठी साहित्य संमेलनांच्या नावाखाली केवळ उच्चभ्रू जातींचे-वर्गांचे साहित्य लोकांसमोर मांडले जाते. आपले भटक्याविमुक्तांचे, ओबीसी व बारा बलुतेदारांचे, दलित-आदिवासींचे तसेच शेतकर्‍यांचे मूळ साहित्य दडपलेलेच राहते. आपल्या सर्व मागास व कष्टकर्‍यांचे साहित्य उजेडात आणण्यासाठी शासकीय पातळीवर एक स्वतंत्र ‘बळीराजा साहित्य महामंडळ’ स्थापन झाले पाहिजे व शासनाने त्यास कायमस्वरूपी अर्थसहाय्य केले पाहिजे, यासाठी ते प्रयत्न करतील.
13)             आपला भारत देश 70 टक्के कृषीव्यवस्थेचा आहे, असे आपण म्हणतो. परंतू शासनातर्फे असे सण साजरे केले जातात की जे अवैज्ञानिक देव-देवतांचे आहेत, ज्यांचा कृषी-संस्कृतीशी काहीही संबंध नसतो. कृषी संस्कृतीचे बैल-पोळा, मातृसत्ताक नवरात्र, बलिप्रतिपदा, बळीराजा-कानबाई महोत्सव आदि सण शासनाच्या पातळीवर व शाळा-कॉलेजमध्ये साजरे केले जातील, यासाठी ते प्रयत्न करतील.
14)            आदवासी जिल्ह्यातील जिल्हा परिषदांना स्वयत्ततेचा दर्जा देऊन त्यांना जल, जंगल व जमिन संपत्तीचे मालकी-अधिकार देण्यात यावे, जेणे करून बड्या भांडवलदारांच्या लुटमारीला आळा बसेल.
या सारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या सर्व प्रश्नांवर आवाज उठवून त्यांना शासनाच्या मुख्य अजेंड्यावर आणणे व ते मार्गी लावणे, यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनाच मते द्यावीत, असे आवाहन ओबीसी व्हिजेएनटी संघर्ष समिती करीत आहे.

                                                                                                                         प्रा. श्रावण देवरे अध्यक्ष
ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समिती.
Mobile – 94227 88546

Saturday, October 12, 2019

Com. Jagan Huraji Gavit OBC Manifesto Assembly Election 2019

ओबीसी  व्हीजेएनटी  संघर्ष  समितीचे मतदारांना आवाहन!
कष्टकरी-बहुजनांचे नेते कॉम्रेड जगन हुरजी गावित यांनाच निवडून द्या!
ओबीसींचा निवडणूक जाहीरनामा
मतदार बहिणीं बंधुंनो!
निवडणूका येतात आणी जातात, उमेदवार निवडतात आणी पडतातही! आणी आपण दर पांच वर्षांनी नियमितपणे वोटींग मशिनची बटणे दाबतच असतो. कोणी गाजर दाखवितो विकासाचं, तर कुणी आमिष दाखवितो पैशांचं! निवडून आल्यावर नेतेही गायब आणी विकासही गायब...!
आतापर्यंत 70 वर्षात अनेक राजकीय पक्ष सत्तेवर आलेत व गेलेत. बहुतेक सर्व पक्ष पेशवाई व भांडवलशाहीचे हस्तक होते व आहेत. त्यामुळे जातीव्यवस्थेने पीडलेल्या 85 टक्के जनतेचा विकास ते करू शकलेले नाहीत. आता आपल्यासमोर वंचित बहुजन आघाडी व सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा पर्याय उपलब्ध आहे. हे पक्ष फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे पाईक आहेत. या पक्षांना मोठ्या प्रमाणात दलित व कष्टकरी जनतेचा पाठिंबा आहे. जर 52 टक्के ओबीसींनी या पक्षांना मते देऊन सत्तेवर बसविले तर आपल्या ओबीसीसकट दलित-आदिवासी-मुस्लीम जनतेच्या व कष्टकर्‍यांच्या विकासाच्या योजना अमलात येतील. आजवर आपल्या मतांवर सरंजामदार-वतनदार व मनुवादी सत्ताधारी झालेत. आता पहिल्यांदाच आपण अशा पक्षांना सत्तेवर बसवू की ज्यांचे धोरण व कार्य मागास जनतेच्या व कष्टकर्‍यांच्या हिताचे आहे.
विविध जातींचा अभ्यास करून त्यांच्या विकासाच्या योजना आखण्यासाठी पुढीलप्रमाणे कृती कार्यक्रम राबवावा लागेल. नव-निर्वाचित विधान सभेत हा कृती कार्यक्रम अमलात आणण्यासाठी मोठ्याप्रमाणात वंचित बहुजनांचे व कष्टकर्‍यांचे प्रतिनिधी पाठवा. कॉम्रेड जगन हुरजी गावित विधानसभेत पुढीलप्रमाणे आपल्या हिताचे कृती-कार्यक्रम राबवतील.     
जाहीरनामा अर्थात कृती-कार्यक्रमः-
1)    जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय आपल्या जातीसाठी विकासाच्या योजना राबवीता येत नाहीत. ओबीसीं-व्हीजेएनटी यांची जातनिहाय जनगणना व ब्राह्मण-मराठासकट सगळ्याच जात-पोटजातींची जनगणना झाली पाहिजे, यासाठी कॉ. जगन गावित विधानसभेत पहिल्याच आठवड्यात विधेयक मांडतील व ते मंजूर करून घेण्यासाठी जिवापाड प्रयत्न करतील.
2)    कॉंग्रेस-राष्ट्रवादी व भाजप-सेनेच्या गेल्या 15 वर्षांच्या काळात ओबीसी-भटके, दलित व आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आलेली आहे. ती पुन्हा सुरू करण्यासाठी विधानसभेत आवाज उठवतील.
3)    मेडिकल, इंजिनिअरींग, आय.आय.टी., आय.आय.एम. यासारख्या उच्च शिक्षणसंस्थांमधील ओबीसी विद्यार्थ्यांचे आरक्षण नगण्य केले गेले आहे. ओबीसी-दलित-भटके विमुक्त विद्यार्थी या उच्च शिक्षणसंस्थात प्रवेशच घेणार नाहीत, अशी वेगवेगळी षडयंत्रे रचली जात आहेत. याला कायमचा पायबंद घालण्यासाठी विधानसभेत संघर्ष करतील.
4)    समांतर आरक्षणाच्या नावाखाली व क्रिमी लेयरच्या गोंधळाखाली आपल्या तरूणांना मिळालेल्या नोकर्‍या नाकारल्या जात आहेत. हे षडयंत्र कायमचे हाणून पाडण्यासाठी स्पष्ट व कडक कायदा केला पाहिजे. त्यासाठी ते प्रयत्न करतील.
5)    मराठा समाजाला एस.ई.बी.सी. म्हणजेच ओबीसी दर्जा देऊन मूळ खर्‍या ओबीसी जातींचे आरक्षण धोक्यात आलेले आहे. ओबीसीं व बारा बलुतेदार जातींची लोकसंख्या 44 टक्के असून त्यांना तुटपुंजे 19 टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे. त्यात आता मराठा सारखी सत्ताधारी जात समाविष्ट झाली तर, खर्‍या ओबीसीला शिपायाची नोकरीसुद्धा मिळाणार नाही. ओबीसी व बारा बलुतेदार जातींना त्यांचे हक्काचे पूर्ण आरक्षण मिळावे, यासाठी विधानसभेत नवे विधेयक ते मांडणार आहेत.
6)    आतापर्यंत बारा बलुतेदार जातींचे व्यवसाय ‘सेवा-धर्मी’ होते. म्हणजे मोबदला (गवाही) कितीही कमी मिळाला, तरी सेवा म्हणून काम करीतच राहायचे. हे आता थांबले पाहिजे. सुतार काम, लोहार काम, कुंभारकाम आदि नव-सृष्टी निर्माण करणार्‍या व्यवसायांना ‘उद्योगाचा दर्जा’ देऊन त्यासाठी किमान दोन कोटींचे कर्ज विनातारण दिले पाहिजे. त्यासाठी ते प्रयत्न करतील.
7)    सहकार तत्वावर बारा बलुतेदार व्यवसायांचे वर्गीकरण करून त्यांचे एकत्रित भव्य वर्कशॉप्स ग्रामिण भागात निर्माण झाले पाहिजेत व तेथील उत्पादन विक्रीसाठी शहरात भव्य शॉपिंग मॉल्स उभारले पाहिजेत. असे झाले तरच बारा बलुतेदार जाती भांडवली लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात येतील. यासाठी ते विधानसभेत ऍक्शन-प्रोग्राम सादर करतील व तो शासनाकडून मंजूर करून घेतील.
8)    देशातील बड्या भांडवलदारांनी ओबीसी-बारा बलुतेदार व भटक्या-विमुक्त जातींच्या व्यवसायिकांना आपल्या कारखान्यांच्या आर्थिक उलाढालीतील किमान 10 टक्के सहभाग कायद्याने देण्यास भाग पाडले जाईल, यासाठी ते विधानसभेत विधेयक मांडणार व ते मंजूर करून घेणार.
9)    निती आयोग रद्द करून नियोजन आयोगाचे नव्या सुधारित नियमांसह पुनर्रज्जीवन करण्यासाठी संघर्ष करतील. देशातील सर्व मागास असलेल्या ओबीसी, व्हीजेएनटी, दलित, आदिवासी व अल्पसंख्य जाती-जमातींच्या विकासासाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या बजेटमध्ये तरतूद झाली पाहिजे, यासाठी ते संघर्ष करतील.
10)           मुसलमान समाजासाठी सच्चर आयोग, ओबीसींसाठी नचिअप्पन अहवाल, शेतकर्‍यांसाठी स्वामीनाथन आयोग व भटक्या-विमुक्तांसाठी रेंडके कमिशन रिपोर्ट अमलात आणण्यासाठी विधानसभेत आवाज उठवतील.
11)            ओबीसी-व्हिजेएनटी कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांना प्रमोशनमध्ये रिझर्वेशन मिळालेच पाहिजे, यासाठी विधानसभेत विधेयक सादर करतील.
12)            मराठी साहित्य संमेलनांच्या नावाखाली केवळ उच्चभ्रू जातींचे-वर्गांचे साहित्य लोकांसमोर मांडले जाते. आपले भटक्याविमुक्तांचे, ओबीसी व बारा बलुतेदारांचे, दलित-आदिवासींचे तसेच शेतकर्‍यांचे मूळ साहित्य दडपलेलेच राहते. आपल्या सर्व मागास व कष्टकर्‍यांचे साहित्य उजेडात आणण्यासाठी शासकीय पातळीवर एक स्वतंत्र ‘बळीराजा साहित्य महामंडळ’ स्थापन झाले पाहिजे व शासनाने त्यास कायमस्वरूपी अर्थसहाय्य केले पाहिजे, यासाठी ते प्रयत्न करतील.
13)            आपला भारत देश 70 टक्के कृषीव्यवस्थेचा आहे, असे आपण म्हणतो. परंतू शासनातर्फे असे सण साजरे केले जातात की जे अवैज्ञानिक देव-देवतांचे आहेत, ज्यांचा कृषी-संस्कृतीशी काहीही संबंध नसतो. कृषी संस्कृतीचे बैल-पोळा, मातृसत्ताक नवरात्र, बलिप्रतिपदा, बळीराजा-कानबाई महोत्सव आदि सण शासनाच्या पातळीवर व शाळा-कॉलेजमध्ये साजरे केले जातील, यासाठी ते प्रयत्न करतील.
या सारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या सर्व प्रश्नांवर आवाज उठवून त्यांना शासनाच्या मुख्य अजेंड्यावर आणणे व ते मार्गी लावणे, यासाठी कॉ. गावित कोणतीही कसूर ठेवणार नाहीत.
     वरीलप्रमाणे जाहीर अभिवचन देणार्‍या कॉ. गावित यांनाच मते द्यावीत, असे आवाहन ओबीसी व्हिजेएनटी संघर्ष समिती करीत आहे.

                                                                                                                              प्रा. श्रावण देवरे
अध्यक्ष
ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समिती.
Mobile – 94227 88546

Kiran Bhaiyya Chavan OBC Manifesto Assembly Election 2019

ओबीसी क्रांती परीषद, राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशन 
ओबीसी  व्हीजेएनटी  संघर्ष  समितीचे संयुक्त उमेदवार
किरण भेय्या चव्हाण यांचा निवडणूक जाहीरनामा

मतदार बहिणीं-बंधुंनो!
निवडणूका येतात आणी जातात, उमेदवार निवडतात आणी पडतातही! आणी आपण दर पांच वर्षांनी नियमितपणे मते देण्यासाठी बटणे दाबतच असतो. कोणी गाजर दाखवितो विकासाचं, तर कुणी आमिष दाखवितो पैशांचं! निवडून आल्यावर नेतेही गायब आणी विकासही गायब...!
परंतू आता नवे परिवर्तन येत आहे. नव्या पिढीचा, नव्या दमाचा तरूण मोठ्यासंख्येने राजकारणात येतो आहे! या नव-तरूणांचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे.
मी यापूर्वी कोणत्याही पक्षात नव्हतो. मी आजवर कोणतीही निवडणूक लढविलेली नाही. आजवर मी केवळ सामाजिक कार्य करीत आलेलो आहे. आर्थिक संस्था उभ्या करून तरूणांना रोजगार दिला आहे. हेच कार्य मला आयुष्यभर करायचे आहे.
परंतू आज राजकारणाचे व राजकीय लोकांचे जे अधःपतन सुरू आहे, ते पाहून मला तीव्र दुःख होत आहे. असेच राजकारण जर पुढे सुरू राहिले तर संपूर्ण समाजच खोल खड्ड्यात पडणार आहे. समाजाला वाचविण्यासाठी माझ्यासारख्या कार्य-प्रिय तरूणालाच पुढे यावे लागणार आहे. गेल्या वर्षभरात जे अनेक सामाजिक कार्यक्रम आम्ही संपन्न केलेत, त्यातून अनेक तरूणी-तरूणांनी मला आग्रह केला की, समाजाला वाचविण्यासाठी आपण राजकारणात सक्रिय झालेच पाहिजे. अशा असंख्य तरूणी व तरूणांचा आदेश शिरसावंध्य मानून मी आज तुमच्या समोर उमेदवार म्हणून आलेलो आहे.
जर आपण मला आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिले, तर पुढील कार्य पार पाडण्यासाठी मी आपल्याला बांधील आहे.
जाहीरनामा अर्थात कृती-कार्यक्रमः-
1)     जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय आपल्या जातीसाठी विकासाच्या योजना राबवीता येत नाहीत. ओबीसीं-व्हीजेएनटी यांची जातनिहाय जनगणना व ब्राह्मण-मराठासकट सगळ्याच जात-पोटजातींची जनगणना झाली पाहिजे, यासाठी मी विधानसभेत पहिल्याच आठवड्यात विधेयक मांडून ते मंजूर करून घेण्यासाठी जिवापाड प्रयत्न करीन.
2)     कॉंग्रेस-राष्ट्रवादी व भाजप-सेनेच्या गेल्या 15 वर्षांच्या काळात ओबीसी-भटके-दलित व आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आलेली आहे. ती पुन्हा सुरू करण्यासाठी मी विधानसभेत आवाज उठवील.
3)     मेडिकल, इंजिनिअरींग, आय.आय.टी., आय.आय.एम. यासारख्या उच्च शिक्षणसंस्थांमधील ओबीसी विद्यार्थ्यांचे आरक्षण नगण्य केले गेले आहे. ओबीसी-दलित-भटके विमुक्त विद्यार्थी या उच्च शिक्षणसंस्थात प्रवेशच घेणार नाहीत, अशी वेगवेगळी षडयंत्रे रचली जात आहेत. याला कायमचा पायबंद घालण्यासाठी मी विधानसभेत संघर्ष करीन.
4)     समांतर आरक्षणाच्या नावाखाली व क्रिमी लेयरच्या गोंधळाखाली आपल्या तरूणांना मिळालेल्या नोकर्‍या नाकारल्या जात आहेत. हे षडयंत्र कायमचे हाणून पाडण्यासाठी स्पष्ट व कडक कायदा केला पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करीन.
5)     मराठा समाजाला एस.ई.बी.सी. म्हणजेच ओबीसी दर्जा देऊन मूळ खर्‍या ओबीसी जातींचे आरक्षण धोक्यात आलेले आहे. ओबीसीं व बारा बलुतेदार जातींची लोकसंख्या 44 टक्के असून त्यांना तुटपुंजे 19 टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे. त्यात आता मराठा सारखी सत्ताधारी जात समाविष्ट झाली तर, खर्‍या ओबीसीला शिपायाची नोकरीसुद्धा मिळाणार नाही. ओबीसी व बारा बलुतेदार जातींना त्यांचे हक्काचे पूर्ण आरक्षण मिळावे, यासाठी मी विधानसभेत मी नवे विधेयक मांडणार आहे.
6)     आतापर्यंत बारा बलुतेदार जातींचे व्यवसाय ‘सेवा-धर्मी’ होते. म्हणजे मोबदला (गवाही) कितीही कमी मिळाला तरी सेवा म्हणून काम करीतच राहायचे. हे आता थांबले पाहिजे. सुतार काम, लोहार काम, कुंभारकाम आदि नव-सृष्टी निर्माण करणार्‍या व्यवसायांना ‘उद्योगाचा दर्जा’ देऊन त्यासाठी किमान दोन कोटींचे कर्ज विनातारण दिले पाहिजे.
7)     सहकार तत्वावर बारा बलुतेदार व्यवसायांचे वर्गीकरण करून त्यांचे एकत्रित भव्य वर्कशॉप ग्रामिण भागात निर्माण झाले पाहिजेत व तेथील उत्पादन विक्रीसाठी शहरात भव्य शॉपिंग मॉल्स निर्माण झाले पाहिजेत. असे झाले तरच बारा बलुतेदार जाती भांडवलशाहीच्या मुख्य प्रवाहात येतील. यासाठी मी विधानसभेत ऍक्शन-प्रोग्राम सादर करीन व तो शासनाकडून मंजूर करून घेईन.
8)     देशातील बड्या भांडवलदारांनी ओबीसी-बारा बलुतेदार व भटक्या-विमुक्त जातींच्या व्यवसायिकांना आपल्या कसारखान्यांच्या आर्थिक उलाढालीतील किमान 10 टक्के सहभाग कायद्याने देण्यास भाग पाडले जाईल, यासाठी मी विधानसभेत विधेयक मांडणार व ते मंजूर करून घेणार.
9)     निती आयोग रद्द करून नियोजन आयोगाचे नव्या सुधारित नियमांसह पुनर्रज्जीवन करण्यासाठी संघर्ष करीन. देशातील सर्व मागास असलेल्या ओबीसी, व्हीजेएनटी, दलित, आदिवासी व अल्पसंख्य जाती-जमातींच्या विकासासाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या बजेटमध्ये तरतूद झाली पाहिजे, यासाठी मी संघर्ष करीन.
10) मुसलमान समाजासाठी सच्चर आयोग, ओबीसींसाठी नचिअप्पन अहवाल, शेतकर्‍यांसाठी स्वामीनाथन आयोग व भटक्या-विमुक्तांसाठी रेंडके कमिशन रिपोर्ट अमलात आणण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार.
11)  ओबीसी-व्हिजेएनटी कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांना प्रमोशनमध्ये रिझर्वेशन मिळालेच पाहिजे, यासाठी विधानसभेत विधेयक सादर करीन.
12)  मराठी साहित्य संमेलनांच्या नावाखाली केवळ उच्चभ्रू जातींचे-वर्गांचे साहित्य लोकांसमोर मांडले जाते. आपले भटक्याविमुक्तांचे, ओबीसी जाती व बारा बलुतेदारांचे, दलित-आदिवासींचे तसेच शेतकर्‍यांचे मूळ साहित्य दडपलेलेच राहते. आपल्या सर्व मागास व कष्टकर्‍यांचे साहित्य उजेडात आणण्यासाठी शासकीय पातळीवर एक स्वतंत्र ‘बळीराजा साहित्य महामंडळ’ स्थापन झाले पाहिजे व शासनाने त्यास कायमस्वरूपी अर्थसहाय्य केले पाहिजे, यासाठी प्रयत्न करीन
13)  आपला भारत देश 70 टक्के कृषीव्यवस्थेचा आहे, असे आपण म्हणतो. परंतू शासनातर्फे असे सण साजरे केले जातात की जे अवैज्ञानिक देवांचे आहेत, ज्यांचा कृषी-संस्कृतीशी काहीही संबंध नसतो. कृषी संस्कृतीचे बैल-पोळा, मातृसत्ताक नवरात्र, बलिप्रतिपदा, बळीराजा महोत्सव आदि सण शासनाच्या पातळीवर व शाळा-कॉलेजमध्ये साजरे केले जातील, यासाठी प्रयत्न करीन.
या सारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या सर्व प्रश्नांवर आवाज उठवून त्यांना शासनाच्या मुख्य अजेंड्यावर आणणे व ते मार्गी लावणे, हे माझे आद्य कर्तव्य आहे. आणी ते पार पाडण्यासाठी मी कोणतीही कसूर ठेवणार नाही. आजवर मी करीत असलेल्या सामाजिक कार्यातून तुम्ही माझी पारख केलीच आहे. आता मला फक्त तुमचे ‘मत’ द्या व मला अधिक सेवा करण्यासाठी प्रोत्साहन द्या.

आपला कार्य-प्रिय उमेदवार                                                                                                                   
किरण भैय्या चव्हाण
बीड मतदारसंघ,
विधानसभा निवडणूक-2019

Dr. Karad OBC Manifesto Assembly Election2019

ओबीसी  व्हीजेएनटी  संघर्ष  समितीचे मतदारांना आवाहन!
कष्टकर्‍यांचे व बहुजनांचे नेते डॉ. डी.एल. कराड यांनाच निवडून द्या!
निवडणूक जाहीरनामा
मतदार बहिणीं बंधुंनो!
निवडणूका येतात आणी जातात, उमेदवार निवडतात आणी पडतातही! आणी आपण दर पांच वर्षांनी नियमितपणे वोटींग मशिनची बटणे दाबतच असतो. कोणी गाजर दाखवितो विकासाचं, तर कुणी आमिष दाखवितो पैशांचं! निवडून आल्यावर नेतेही गायब आणी विकासही गायब...!
आतापर्यंत 70 वर्षात अनेक राजकीय पक्ष सत्तेवर आलेत व गेलेत. बहुतेक सर्व पक्ष पेशवाई व भांडवलशाहीचे हस्तक होते व आहेत. त्यामुळे जातीव्यवस्थेने पीडलेल्या 85 टक्के जनतेचा विकास ते करू शकलेले नाहीत. आता आपल्यासमोर वंचित बहुजन आघाडी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पर्याय उपलब्ध आहे. हे पक्ष फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे पाईक आहेत. या पक्षांना मोठ्या प्रमाणात दलित व कष्टकरी जनतेचा पाठिंबा आहे. जर 52 टक्के ओबीसींनी या पक्षांना मते देऊन सत्तेवर बसविले तर आपल्या ओबीसीसकट दलित-आदिवासी-मुस्लीम जनतेच्या व कष्टकर्‍यांच्या विकासाच्या योजना अमलात येतील. आजवर आपल्या मतांवर सरंजामदार-वतनदार व मनुवादी सत्ताधारी झालेत. आता पहिल्यांदाच आपण अशा पक्षांना सत्तेवर बसवू की ज्यांचे धोरण व कार्य मागास जनतेच्या व कष्टकर्‍यांच्या हिताचे आहे.
विविध जातींचा अभ्यास करून त्यांच्या विकासाच्या योजना आखण्यासाठी पुढीलप्रमाणे कृती कार्यक्रम राबवावा लागेल. नव-निर्वाचित विधान सभेत हा कृती कार्यक्रम अमलात आणण्यासाठी मोठ्याप्रमाणात वंचित बहुजनांचे व कष्टकर्‍यांचे प्रतिनिधी पाठवा. डॉ. डी. एल. कराड विधानसभेत पुढीलप्रमाणे आपल्या हिताचे कृती-कार्यक्रम राबवतील.     
जाहीरनामा अर्थात कृती-कार्यक्रमः-
1)    जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय आपल्या जातीसाठी विकासाच्या योजना राबवीता येत नाहीत. ओबीसीं-व्हीजेएनटी यांची जातनिहाय जनगणना व ब्राह्मण-मराठासकट सगळ्याच जात-पोटजातींची जनगणना झाली पाहिजे, यासाठी डॉ. कराड विधानसभेत पहिल्याच आठवड्यात विधेयक मांडतील व ते मंजूर करून घेण्यासाठी जिवापाड प्रयत्न करतील.
2)    कॉंग्रेस-राष्ट्रवादी व भाजप-सेनेच्या गेल्या 15 वर्षांच्या काळात ओबीसी-भटके, दलित व आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आलेली आहे. ती पुन्हा सुरू करण्यासाठी विधानसभेत आवाज उठवतील.
3)    मेडिकल, इंजिनिअरींग, आय.आय.टी., आय.आय.एम. यासारख्या उच्च शिक्षणसंस्थांमधील ओबीसी विद्यार्थ्यांचे आरक्षण नगण्य केले गेले आहे. ओबीसी-दलित-भटके विमुक्त विद्यार्थी या उच्च शिक्षणसंस्थात प्रवेशच घेणार नाहीत, अशी वेगवेगळी षडयंत्रे रचली जात आहेत. याला कायमचा पायबंद घालण्यासाठी विधानसभेत संघर्ष करतील.
4)    समांतर आरक्षणाच्या नावाखाली व क्रिमी लेयरच्या गोंधळाखाली आपल्या तरूणांना मिळालेल्या नोकर्‍या नाकारल्या जात आहेत. हे षडयंत्र कायमचे हाणून पाडण्यासाठी स्पष्ट व कडक कायदा केला पाहिजे. त्यासाठी ते प्रयत्न करतील.
5)    मराठा समाजाला एस.ई.बी.सी. म्हणजेच ओबीसी दर्जा देऊन मूळ खर्‍या ओबीसी जातींचे आरक्षण धोक्यात आलेले आहे. ओबीसीं व बारा बलुतेदार जातींची लोकसंख्या 44 टक्के असून त्यांना तुटपुंजे 19 टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे. त्यात आता मराठा सारखी सत्ताधारी जात समाविष्ट झाली तर, खर्‍या ओबीसीला शिपायाची नोकरीसुद्धा मिळाणार नाही. ओबीसी व बारा बलुतेदार जातींना त्यांचे हक्काचे पूर्ण आरक्षण मिळावे, यासाठी विधानसभेत नवे विधेयक ते मांडणार आहेत.
6)    आतापर्यंत बारा बलुतेदार जातींचे व्यवसाय ‘सेवा-धर्मी’ होते. म्हणजे मोबदला (गवाही) कितीही कमी मिळाला, तरी सेवा म्हणून काम करीतच राहायचे. हे आता थांबले पाहिजे. सुतार काम, लोहार काम, कुंभारकाम आदि नव-सृष्टी निर्माण करणार्‍या व्यवसायांना ‘उद्योगाचा दर्जा’ देऊन त्यासाठी किमान दोन कोटींचे कर्ज विनातारण दिले पाहिजे. त्यासाठी ते प्रयत्न करतील.
7)    सहकार तत्वावर बारा बलुतेदार व्यवसायांचे वर्गीकरण करून त्यांचे एकत्रित भव्य वर्कशॉप्स ग्रामिण भागात निर्माण झाले पाहिजेत व तेथील उत्पादन विक्रीसाठी शहरात भव्य शॉपिंग मॉल्स उभारले पाहिजेत. असे झाले तरच बारा बलुतेदार जाती भांडवली लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात येतील. यासाठी ते विधानसभेत ऍक्शन-प्रोग्राम सादर करतील व तो शासनाकडून मंजूर करून घेतील.
8)    देशातील बड्या भांडवलदारांनी ओबीसी-बारा बलुतेदार व भटक्या-विमुक्त जातींच्या व्यवसायिकांना आपल्या कारखान्यांच्या आर्थिक उलाढालीतील किमान 10 टक्के सहभाग कायद्याने देण्यास भाग पाडले जाईल, यासाठी ते विधानसभेत विधेयक मांडणार व ते मंजूर करून घेणार.
9)    निती आयोग रद्द करून नियोजन आयोगाचे नव्या सुधारित नियमांसह पुनर्रज्जीवन करण्यासाठी संघर्ष करतील. देशातील सर्व मागास असलेल्या ओबीसी, व्हीजेएनटी, दलित, आदिवासी व अल्पसंख्य जाती-जमातींच्या विकासासाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या बजेटमध्ये तरतूद झाली पाहिजे, यासाठी ते संघर्ष करतील.
10)           मुसलमान समाजासाठी सच्चर आयोग, ओबीसींसाठी नचिअप्पन अहवाल, शेतकर्‍यांसाठी स्वामीनाथन आयोग व भटक्या-विमुक्तांसाठी रेंडके कमिशन रिपोर्ट अमलात आणण्यासाठी विधानसभेत आवाज उठवतील.
11)            ओबीसी-व्हिजेएनटी कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांना प्रमोशनमध्ये रिझर्वेशन मिळालेच पाहिजे, यासाठी विधानसभेत विधेयक सादर करतील.
12)            मराठी साहित्य संमेलनांच्या नावाखाली केवळ उच्चभ्रू जातींचे-वर्गांचे साहित्य लोकांसमोर मांडले जाते. आपले भटक्याविमुक्तांचे, ओबीसी व बारा बलुतेदारांचे, दलित-आदिवासींचे तसेच शेतकर्‍यांचे मूळ साहित्य दडपलेलेच राहते. आपल्या सर्व मागास व कष्टकर्‍यांचे साहित्य उजेडात आणण्यासाठी शासकीय पातळीवर एक स्वतंत्र ‘बळीराजा साहित्य महामंडळ’ स्थापन झाले पाहिजे व शासनाने त्यास कायमस्वरूपी अर्थसहाय्य केले पाहिजे, यासाठी ते प्रयत्न करतील.
13)            आपला भारत देश 70 टक्के कृषीव्यवस्थेचा आहे, असे आपण म्हणतो. परंतू शासनातर्फे असे सण साजरे केले जातात की जे अवैज्ञानिक देव-देवतांचे आहेत, ज्यांचा कृषी-संस्कृतीशी काहीही संबंध नसतो. कृषी संस्कृतीचे बैल-पोळा, मातृसत्ताक नवरात्र, बलिप्रतिपदा, बळीराजा-कानबाई महोत्सव आदि सण शासनाच्या पातळीवर व शाळा-कॉलेजमध्ये साजरे केले जातील, यासाठी ते प्रयत्न करतील.
या सारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या सर्व प्रश्नांवर आवाज उठवून त्यांना शासनाच्या मुख्य अजेंड्यावर आणणे व ते मार्गी लावणे, यासाठी डॉ. कराड कोणतीही कसूर ठेवणार नाहीत.
     वरीलप्रमाणे जाहीर अभिवचन देणार्‍या डॉ. कराड यांनाच मते द्यावीत, असे आवाहन ओबीसी व्हिजेएनटी संघर्ष समिती करीत आहे.

                                  प्रा. श्रावण देवरे,  अध्यक्ष,  
ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समिती.
Mobile – 94227 88546

90 BahujanNama MssOss 6Oct2019

बहुजननामा-90
भुमिका व कृती-कार्यक्रमः
मराठा सेवा संघ व ओबीसी सेवा संघ

बहुजनांनो.... !
-1-
माननीय प्रदिप ढोबळेंच्या नेतृत्वाखाली जेव्हा ओबीसी सेवा संघाची स्थापना झाली, तेव्हा आम्ही दोन धोरणात्मक निर्णय घेतलेत. पहिला निर्णय- आपल्या ओबीसी सेवा संघाच्या प्रत्येक अधिवेशनाचे उद्गाटक बौद्ध वा दलित विचारवंत-अधिकारी असतील. दुसरा धोरणात्मक निर्णय- जर कमवलेली ‘एक भाकर वाटप करायची असेल तर, सर्वात आधी पहिला वाटेकरी असेल आदिवासी, त्यानंतर दुसरा वाटेकरी दलित व ‘खर-ओबीसी तिसरा वाटेकरी असेल! आणी सर्वात शेवटी शिल्लक असलेली भाकरी ब्राह्मण-क्षत्रिय-सरंजाम वगैरे जातींसाठी असेल. हे आहे संवैधानिक वाटप...!
अशी जात्यंतक भुमिका आजवर एकाही संघटनेने घेतलेली नाही. आमच्या या भुमिकेप्रमाणे आतापर्यंत किशोर गजभिये, कुलदिप रामटेके, सुरेश माने, दैठणकर असे अनेक विचारवंत व प्रशासकीय अधिकारी उद्घाटक म्हणून आमच्या ओबीसी सेवा संघाच्या स्टेजवर आलेत व मुख्य मार्गदर्शक म्हणून सन्मानीत झालेत. प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष माननीय पुरूषोत्तम खेडेकर अनेकवेळा ओबीसी सेवा संघाच्या स्टेजवर सन्मानीत झालेले आहेत. दुसरे तेवढेच दिग्गज मराठा विचारवंत प्रा. मा. म. देशमुख यांनाही ओबीसी सेवा संघाच्या अधिवेशनात पुरस्कार देऊन गौरवान्वीत केले आहे. ही दिशा आहे फुले-शाहू आंबेडकरप्रणित जात्यंतक क्रांतीची. या उलट मराठा सेवा संघाचे धोरणच असे आहे की, आपल्या स्टेजवर सन्माननीय व मार्गदर्शक व्यक्ती फक्त मराठा व ब्राह्मणच असेल, दुसरे कुणीही नाही. मराठा सेवा संघाचे दुसरे धोरण असे आहे- माझ्या ताटातली भाकरी माझीच आहे आणी दुसर्‍याच्या ताटातली भाकरीही माझीच आहे. मराठ्यांनी ओबीसीच्या ताटातली भाकरी चोर मार्गाने व नंतर अवैध मार्गाने कशी फस्त केली, हे 29 नोव्हेंबर 2018 रोजी विधानसभेत झालेल्या ‘राड्यावरून’ सिद्ध झालेले आहे. या राड्याची बीजे मराठा सेवा संघाच्या वरील धोरणांमध्ये आहेत. तामिळनाडूतील ओबीसी गेल्या 50 वर्षांपासून सत्तेवर आहे. ब्राह्मणवादी कॉंग्रेस-भाजपची गुलामी न करता, हा ओबीसी आजही ताठ मानेने पेरियार-फुले-शाहू-आंबेडकरप्रणित समतेचे राजकारण करीत आहे. याचे एकमेव कारण हे आहे की, त्यांना मिळालेली सत्तेची भाकरी ते दलित-आदिवासींसोबत वाटून खात आहेत. याला म्हणतात संवैधानिकता, नैतिकता व ताठ कणा! महाराष्ट्रातील मराठे 70 वर्षांपासून ब्राह्मणी कॉंग्रेसचे ‘मांडलिक राजे’ म्हणून काम करीत होते, आता पेशवाइचे ‘हुजरे’ बनण्यासाठी त्यांच्यात शर्यत सुरू आहे. याला म्हणतात          अ-संवैधानिता, अ-नैतिकता व तुटलेला कणा!  मराठा जातीची ही वाईट अवस्था होण्याचं एकमेव कारण हे आहे की, त्यांच्या पोटात पेशवाई व ओठावर सरंजामशाही आहे! लोकशाही कुठेही अस्तित्वात नाही. मराठा सेवा संघ (म.से.सं.) मराठा समाजाला फुले शाहू आंबेडकर शिकवेल, समस्त मराठा जात पुरोगामी बनवेल, या अपेक्षेपोटी महाराष्ट्राच्या तमाम दलित व ओबीसी संघटनांनी मराठा सेवा संघाला अक्षरशः डोक्यावर घेतले. पण हाती काय पडलं, पेशवाई? म.से.सं.च्या मूळ धोरणातच पुरोगामित्व नाही, तर ते संघटनेत व जातीत कसे येणार? आडातच नाही, तर पोहर्‍यात कसे येईल?
-2-
मराठा सेवा संघ आपले जातीयवादी धोरण बदलून, पुरोगामी धोरण आजही स्वीकारू शकतो. चांगले कार्य करायला मुहूर्त लागत नाही. माळी समाजाप्रमाणे त्यांनीही बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम सुरू करावे. महाराष्ट्रातील पेशवाई सरकारला बाहेरून पाठिंबा देऊन, ब्राह्मणशाहीचे पुनरूज्जीवन करणार्‍या राष्ट्रवादी कॉंग्रेसपेक्षा ‘वंचित बहुजन आघाडी’ निश्चितच पुरोगामी आहे. मी जेव्हा बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांचे नांव घेतो, तेव्हा ते ‘व्यक्ती’ म्हणून घेत नाही. जात्यंतक लोकशाही क्रांतीचे अग्रदल असलेल्या ‘दलित-शक्ती’चे ते एक प्रतिनिधी आहेत. तुम्हाला बाळासाहेब आंबेडकर नको असतील, तर माननीय सुरेश माने, प्रा. जोगेंद्र कवाडेसर, विचारवंत सुनिल खोब्रागडे यांच्यापैकी कोणाच्याही एका रिपब्लीकन पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करता येईल. त्यापूर्वी माननीय रामदास आठवलेंसोबत काम करण्याची फार मोठी संधी होती. कारण ते आजही कट्टर ‘मराठा-आरक्षणवादी’ आहेत. पण तुम्हीच ती संधी घालवली. मराठा वर्चस्व असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनी आठवलेसाहेबांची ज्या नीच-वृत्तीने फरफट केली, त्याच्या परिणामी आठवले भाजप-सेनेत गेले आहेत. त्याचवेळेस जर मराठा सेवा संघाने रामदास आठवलेंना नेता मानून सामाजिक-राजकीय कार्य केले असते तर, आठवलेंना हीन वागणूक देण्याची हिम्मत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मराठ्यांनी केली नसती. मराठासकट सर्वच जातींना पुरोगामी दिशा देण्याची क्षमता मराठा सेवा संघात आजही आहे. परंतू त्यासाठी त्यांना गडकरी-फडणवीसांच्या नेतृत्वाला जाहीरपणे त्यागावे लागेल. पेशवाईचे कर्ते-मुखंड म्हणून गडकरी-फडणवीसांना घोषित करावे लागेल. तुमच्या मराठा सेवा संघाच्या अधिवेशानात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुरेश माने, बाळासाहेब आंबेडकर, प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रा. माधव सरकुंडे व प्रदिप ढोबळेंसारखे आदिवासी-दलित-ओबीसी नेते सन्मानाने बोलावावे लागतील. तुमच्या अधिवेशनाच्या स्टेजवर छत्रपती शिवरायांसोबत फुले-आंबेडकरांचे फोटो लावावे लागतील. आणी सर्वात महत्वाचे म्हणजे ओबीसीत घुसखोरीची भुमिका त्यागून संवैधानिक मार्गाने ‘भाकरीचे वाटप’ स्वीकारावे लागेल. यासारखे अनेक कृती कार्यक्रम आहेत, ते मनापासून अमलात आणावे लागतील. हा कृतीकार्यक्रम मराठा सेवा संघाने प्रामाणिकपणे प्रत्यक्षात आणला, तर मी गॅरंटी देतो की,तुम्हाला 2024 च्या लोकसभा व विधासभेत पेशवाई खतम झालेली दिसेल व खर्‍या अर्थाने महाराष्ट्रात तामिळनाडूप्रमाणे ओबीसी-बहुजन सरकार स्थापन झालेले दिसेल. पण हे होणे नाही, त्याचे आतील व बाहेरील कारण हे आहे की, आमचे सर्व ओबीसी-दलित-मराठा नेते जेलमध्ये जायला घाबरतात. पुरूषोत्तम खेडेकरसाहेबसुद्धा ईडीच्या पिडला घाबरतात. परंतू ‘‘भित्यापोटी ब्रह्म-सैतान’’ हे लक्षात घेतले पाहिजे. तुम्ही जोवर काठावर आहात, तोवरच पाण्याची भीती वाटते. पाण्यात उडी मारा, तुमच्या मनातील भीती नष्ट होईल. जो भीतीवर मात करतो, त्याला हात लावण्याची हिम्मत पेशवा कधीच करीत नाही, असे इतिहास सांगतो. पहिल्या पेशवाईच्या काळात मराठा सरंजामदार पेशव्यांना खूप घाबरत होते, कारण पुण्यातील पेशवे मराठा सरंजामदारांना जेलमध्ये टाकून छळत होते. परंतू एक धनगर (ओबीसी) जातीतील यशवंतराव होळकर या मर्दाने आपल्या मनातील पेशवा-दहशत एका झटक्यात संपवीली व बाजीराव पेशव्याला पुण्यातून पळता भूई थोडी केली. यशवंतराव होळकरांच्या भीतीने बाजी पेशवा जीव मुठीत घेऊन अक्षरशः कुत्र्यासारखा रस्त्यांवरून पळत-फिरत होता. ज्या दिवशी मराठा सेवा संघ एक धोरण म्हणून सुनिल खोब्रागडे, सुरेश माने, कवाडे सर किंवा प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू करेल, त्याच दिवशी मराठ्यांच्या मनातील पेशव्यांची भीती नष्ट होईल व आधुनिक पेशवाईवर निर्णायक घाव घालण्याची पात्रता मराठा समाजात निर्माण होईल.
-3-
माननीय शरद पवारांनी माननीय सुरेश मानेंना तिकीट देऊन काही चांगली सुरूवात केली आहे, असे बर्‍याच पुरोगामी लोकांना वाटते. परंतू पवारांनी सुरेश मानेंच्या पक्षाला त्यांच्या निवडणूक चिन्हासह सन्मानाने आघाडीत घेऊन, त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सीट दिल्या असत्या, तर ते न्यायाचे झाले असते. ‘एक तिकीट’ देउन तुम्ही 14 टक्के दलितांची मते मिळविण्याची अपेक्षा ठेवता, हे योग्य नाही. आठवलेसाहेबांशी तुम्ही याच पद्धतीने वागलेत म्हणून ते भाजप-सेनेत गेले.
मराठा सेवा संघाला आणखी एक विनंती आहे. त्यांनी ‘मराठाद्वेष्टा’सारखे शिक्के मारणे बंद करावे. तात्यासाहेब महात्मा जोतीरावांना ब्राह्मणांनी ‘ब्राह्मणद्वेष्टा’ म्हणून बदनाम केले. भटांच्या मानसिक गुलामीत जखडलेल्या तत्कालीन बहुजनांना ते खरे वाटले व त्यांनी तात्यासाहेब महात्मा जोतीरावांचे म्हणणे ऐकूनही घेतले नाही. आज हेच बहुजन तात्यासाहेबांची पुस्तके विकत घेऊन वाचतात. ‘बैल गेला नि झोपा केला’ या म्हणीप्रमाणे आता पेशवाई डोक्यावर बसल्यानंतर तात्यासाहेब महात्मा फुलेंची आठवण आली आहे. मराठाद्वेष्टा म्हणून शिक्के मारल्याने मराठा समाजाचेच फार मोठे नुकसान होत आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.
दलित नेतृत्वाखाली काम केले तरच जात्यंत होणार, असा आग्रह धरणारा मी पहिलाच नाही. माझे वैचारिक गुरू असलेल्या फुले-शाहू-आंबेडकरांचाच असा आग्रह आहे. आणी कॉ. शरद पाटलांनी फुले-शाहू-आंबेडकरांच्या या जात्यंतक सिद्धांताला तत्वज्ञानाच्या पातळीवर नेऊन मांडणी केली आहे! जात-वर्ग-स्त्रीदास्यअंतक ‘सौत्रान्तिक मार्क्सवादी’ तत्वज्ञानाचे जनक कॉ. शरद पाटील यांनी हा आग्रह धरलेला आहे. त्याही पुढे जाउन सांगतो की, जागतिक वर्गांताचे तत्वज्ञान सिद्ध करणारे कार्ल मार्क्स यांनीसुद्धा असाच सिद्धांत मांडलेला आहे. वर्गव्यवस्थेतील सर्वात जास्त शोषित असलेला कामगारवर्गच वर्गांताच्या क्रांतीचे नेतृत्व करू शकतो. चीनमध्ये सर्वात जास्त शोषित शेतकरी होता, म्हणून चीनमध्ये क्रांतीचे नेतृत्व शेतकरीवर्ग करीत होता. त्याचप्रमाणे भारतातील जातीव्यवस्था नष्ट करणारी क्रांती सर्वात जास्त शोषित असलेल्या ‘अस्पृश्य’ जातींच्या नेतृत्वाखालीच होऊ शकते. (बाबासाहेब आंबेडकर राईटिंग्ज ऍन्ड स्पीचेस, खंड-5, पान 112-116 व कॉ शरद पाटील, ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ वर्षः8, जुलै-89, पानः26-27)
     1994 पासून मराठा जात स्वतःला ‘शूद्र’ म्हणून सिद्ध करायचा प्रयत्न करीत आहे. जर मराठा जात खरोखर शूद्र असेल व या शूद्रत्वाची दिशा पुरोगामी असेल तर त्याची पहिली कसोटी ही आहे की, ‘मराठा जातीच्या नेत्यांनी घटनातज्ञ सुरेश माने, विचारवंत सुनिल खोब्रागडे, कवाडेसर, प्रकाश आंबेडकर यासारख्या दलित नेत्यांच्या नेतृत्वाखाली समाजकारण-राजकारण केले पाहिजे.’ अन्यथा नेहमीप्रमाणे ‘लग्नासाठी देशमुख(D), राजकारणासाठी मराठा(M) व सवलतींसाठी कुणबी(K), हा तुमचा DMK-रंगबदलूपणा तुम्हाला गडकरी-फडणवीसी पेशवाईच्या छावणीकडे नेतो, असे इतिहास सिद्ध करतो.
कॅटेगिरीच्या पातळीवर ओबीसी सेवा संघाने व जातीच्या पातळीवर माळी जातीने दलित नेतृत्वाखाली काम सुरू केले आहे. मराठा जातीला मार्गदर्शक ठरेल, असे जात्यंतक धोरण व कार्य मराठा सेवा संघसुद्धा सुरू करेल, या अपेक्षेसह येथेच थांबतो. पुढील बहुजननामात भेटीला येईलच, तोपर्यंत जयजोती, जयभीम...सत्य की जय हो....!!!
(लेखन 4-5 ऑक्टो 19 व प्रकाशनः 6 ऑक्टोंबर 2019)
 ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog ब्लॉग
 Email-

(महत्वाची सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात व वेब पोर्टलवर प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात येत आहे. माझे सर्व लेख https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर मिळतील)