http://shrwandeore.blogspot.in/

Wednesday, November 16, 2016

30ऑक्टे2016-

पद्वीधर मतदारसंघ निवडणूक....... !!!???

पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी काही ओबीसी मित्र निवडणूक लढविण्यासंदर्भात माझ्याशी चर्चा करीत आहेत. मी यापुर्वीही शिक्षक मतदारसंघातील ओबीसी उमेदवारांचा प्रचार केला आहे.. त्यावेळी जी माझी भुमिका होती,  जी महाराष्ट्र टाईम्स ने छापली होती......(म.टा. 1 जून 2000).... तीच आजही कायम आहे....
1) पद्वीधर मतदार व शिक्षक मतदार हे सुशिक्षित असतात असे गृहीत धरूनच मी पुढील विवेचन करीत आहे..... लोकशाही व्यवस्था ही विविध गट, वंश, जात, धर्म, वर्ग यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या (निवडून आलेल्या) लोकांकडून चालविली जाते. सर्वसामान्य मतदारसंघातील जनता निरक्षर असते व तिच्यावर जात, धर्म, पैसा वगैरेंचा निगेटिव्ह प्रभाव असल्याने एकाच जातीचे आमदार-खासदार मोठ्या प्रमाणात निवडून येतात. त्यात अतिअल्प संख्या असलेल्या जाती-धर्माचे लोक चुकुनही निवडून येत नाहीत. सर्व धर्मातील धोबी, गुरव, सुतार, विणकर, कोळी या जातीची व्यक्ती गावात पंचायत सदस्य म्हणूनही निवडून येऊ शकत नाहीत. आमदार-खासदार होणे फार लांबची गोष्ट.....!!! निवडणूक प्रक्रियेत धोबी, गुरव वगैरेसारख्या जातींना जाणीपूर्वक आणायचे असल्यास हे काम शिक्षक वा पद्वीधर मतदारच करू शकतो. म्हणून या वेळच्या पदवीधर निवडणूकीत जर कोणी धोबी, न्हावी, सुतार, पिंजारा, कासार, पाथरवट, वडार, वगैरे सारखी अतीअल्पसंख्य व्यक्ती उमेदवार म्हणून उभी राहली असेल तर पक्षभेद, जातीभेद, धर्मभेद वगैरे विसरून या अल्पसंख्य व्यक्तीला निवडून आणा व आपले ‘प्रातिनिधिक’ लोकशाहीचे कर्तव्य पार पाडा....
2) या वेळच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीला  ''मराठा मुक मोर्चा''  ची फार मोठी पार्श्वभूमी आहे. पदवीधर मतदार ज्यांना आपण ''सुशिक्षीत'' समजून चर्चा करतो आहे... त्या मतदारांना मी जाहीर आवाहन करतो की, त्यांनी उमेदवाराच्या जातीची बहुसंख्यांकता लक्षात न घेता केवळ ‘प्रातिनिधिक’ लोकशाहीचा विचार केला पाहीजे. लोकशाहीचे म्हणणे हे आहे की, ‘’कोणतीही बहुसंख्यांक जात आपल्या संख्येच्या जोरावर दुसर्‍याचे घटनात्मक हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर, ते लोकशाही मार्गाने हाणून पाडले पाहीजे. मात्र मराठा मोर्च्यांनी ऍट्रॉसिटी ऍक्ट रद्द करण्याची मागणी करून दलित-आदिवासींचा घटनात्मक हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे व मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याची मागणी करून ओबीसींचे आरक्षणाचे ताट हिसकावन्याच्या  प्रयत्न करीत आहेत.’’
3) मराठा मोर्च्यांच्या या संविधानविरोधी मागण्या लोकशाहीची चेष्टा करण्यासारख्या आहेत. म्हणून पदवीधर मतदारांना मी आवाहन करतो की, त्यांनी अशा उमेदवाराला चूकूनही मतदान करू नका की, जो उमेदवार ‘जातीसाठी माती खाऊन’ या मोर्च्र्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठींबा देणारा आहे.’’
4) ज्या अल्पसंख्य ओबीसी उमेदवारांना शक्य असेल त्यांनी वरील पहिल्या दोन्ही मुद्दयांचा आशय असलेलले फ्लेक्स बोर्ड तयार करून ते शाळा कॉलेजच्या चौकात लावावेत. असे फ्लेक्स बोर्ड लावल्याने त्या शाळा कॉलेजात काम करणार्‍या तेली, कोळी, शिंपी न्हावी धोबी, सुतार, पिंजारा, पाथरवट, सारख्या अल्पसंख्य जातींच्या कर्मचार्‍यांच्या मनातील जातीय न्युनगंड नाहीसा होईल व ते उघडपणे जातदांडग्या संस्थाचालकांना न जुमानता आपल्या ओबीसी-भटक्या उमेदवाराला मतदान करतील...

धन्यवाद.......!!!

No comments:

Post a Comment