http://shrwandeore.blogspot.in/

Thursday, March 29, 2018

16 BahujanNama Lokmanthan 25 March 18

सोळावी खेप......! (दै. लोकमंथन रविवार – 25 मार्च 2018 च्या अंकासाठी)
बहुजननामा-16
जातीअंताच्या चळवळीतील एक टप्पाः ओबीसी जनगणना ...!

बहुजनांनो.... !
अत्यंत त्रासातून, मोठमोठे अडथळे पार करीत, गेल्या 7 महिन्यापूर्वी जाहीर केलेली
धुळ्याची ओबीसी जनगणना परिषद एकदाची 11 मार्चला संपन्न झाली. याचे सर्व श्रेय
अर्थातच मुख्य संयोजक दिलिप देवरे यांच्या टिमवर्कचे आहे. ओबीसी जातीतील बहुतेक सर्वच
कार्यकर्त्यांची धाव ‘वधू-वर सूचक’ मेळाव्यापर्यंतच असते. हा कार्यकर्ता जातीतून बाहेर पडून
व्यापक ओबीसीकरणापर्यंत यायला खूप उशीर करतो. परंतू तरीही त्याची मानसिकता मात्र
पूर्णपणे ओबीसी झालेली आहे. जातीचे वधू-वर मेळावे घेण्याईतके सोपे ओबीसी कार्यक्रम घेणे
नाही, हे एकदाचे त्यांच्याही लक्षात आलं.या ओबीसी जनगणना परिषदेला विविध राजकीय पक्षांचे आमदार, खासदारांनी यावेत
यासाठी आयोजकांकडून प्रयत्न करण्यात आलेत. मात्र सर्वच राजकीय पक्षांच्या ओबीसी
आमदार-खासदारांची ‘ओबीसी’ विषयक उदासिनता व त्याच पक्षाच्या उच्चजातीय नेत्यांची
‘ओबीसी’ विषयक ‘’सतर्कता’’ यामुळे अनेकवेळा भेटूनही हे नेते यायला तयार नव्हते. या
मेळाव्याला उपस्थित राहणे म्हणजे येत्या असेंब्ली-पार्लमेंटच्या अधिवेशनात ‘ओबीसी
जनगणनेसाठी ठराव मांडणे’, याची त्यांना पूर्णपणे कल्पना देण्यात आलेली होती. आणी
पक्षाचे उच्चजातीय नेते याला परवानगी देणार नाहीत याचीही पूर्ण कल्पना या ओबीसी
आमदार-खासदारांना होती. त्यामुळे ईकडे आड तिकडे विहीर अशा कचाट्यात सापडलेल्या या
धुर्त नेत्यांनी ओबीसी जनगणना परिषदेला उपस्थित न राहणेच पसंद केलं. त्यामुळे
आयोजकांनी निर्णय घेतला की विविध पक्षांच्या दुसर्‍या फळीतील स्थानिक नेत्यांच्या
उपस्थितीत ही परिषद घ्यावी. हे स्थानिक ओबीसी नेतेच हा विषय पुढे रेटतील व आपापल्या
लोकप्रतिनिधींना ओबीसी जनगणनेसाठीच्या ठरावासाठी तयार करतील.
या परिषदेला एकमात्र ब्राह्मण नेते संजय शर्मा होते. ते समाजवादी, कम्युनिस्ट व
पुरागामी असते तर, फारशी कुणाची हरकत नसती. मात्र ते भाजपाचे प्रवक्ते असल्याने
बर्‍याच (पुरोगामी) मित्रांनी प्रतिप्रश्न केलेत. अशावेळी आपले पुरोगामी मित्र सोयिस्करपणे
फुले-आंबेडकरी भुमिका विसरतात. तात्यासाहेब महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
ब्राह्मण मित्रांचे सहकार्य घेऊन आपली जातीअंताची चळवळ केली. हे ब्राह्मण मित्र कट्टर
पुरोगामी होते म्हणून ते फुले-आंबेडकरांचे मित्र होते, असे नाही. काही विशिष्ट परिस्थीतीच्या

2

दबावाखाली काही गोष्टी घडत असतात. ब्राह्मण मित्राच्या हातून मनुस्मृती जाळून घेणे वा
ब्राह्मण मित्राच्या घरातच मुलींची पहिली शाळा सुरू करणे हा केवळ डावपेचाचा भाग नव्हता,
तो धोरणाचा भाग होता. अपादर्शक व कडेकोट भींतींच्या या जातीव्यवस्थेला छोटे-छोटे धक्के
मारणेही क्रांतिकारक ठरते. अशा घटनांमधून दोन कडक संदेश जातात. पहिला संदेश
ब्राह्मणांना जातो. ‘तुम्ही म्हणता तेवढी पक्की तुमची व्यवस्था नाही’, अशा संदेशातून
प्रतिगामी ब्राह्मणांचे नितीधैर्य खच्ची होते. दुसरा संदेश ब्राह्मणी दहशतीतील भित्र्या
शूद्रादिअतिशूद्रांना जातो. ब्राह्मणांच्या हातून एखादे जातीविरोधी कामाचे उद्घाटन करून घेतले
की, भित्र्या शूद्रादिअतिशूद्रांची भीड चेपते व त्यांचे मनोधैर्य उंचावते.
आमचे फुलेआंबेडकरी मित्र क्रांतीच्या खूप गप्पा करतील मात्र क्रांतीसाठी आवश्यक
केडरयुक्त पक्ष, तत्वज्ञान, धोरण, डावपेंच, कार्यक्रम व त्यांची शिस्तबद्ध अमलबजावणी वगैरे
गोष्टींचा त्यांना सुगावाही नसतो. निर्णय प्रक्रिया किती लोकशाहीवादी व किती मर्यादित
असावी, याचेही त्यांना भान नसते. जातीअंताच्या लढ्यात कोणत्या जातीचे काय स्थान आहे
व त्या स्थानाप्रमाणे त्या जातीला कसे क्रिया-प्रवण करावे, याचा मागमूस कोणाच्याही डोक्यात
नाही. जातीअंताच्या निर्णय प्रक्रियेत ब्राह्मण आला व ओबीसी बाहेर पडला तर, त्या पक्षाची
काय अवस्था होते, हे बसपाच्या उदाहरणावरून आजही कोणी शिकायला तयार नाही. सरसकट
सर्व ब्राह्मण प्रतिगामी व सरसकट सगळे बहुजन क्रांतीकारी अशी धोपट भुमिका तुम्हाला
काही काळानंतर दुसर्‍या टोकाला घेऊन जाते. शेवटी कोणत्या प्रसंगी काय करावे व ते
केल्याने पुढील परिणाम-दुष्परिणामांबद्दल सतर्क राहणे, हाच तर नेतृत्वाचा मोठा गुण असतो.
सर्वच प्रश्नांची उत्तरे महापुरूषांच्या पुस्तकात नसतात. अलिकडे संविधानाच्या पुजाअर्चा व
मिरवणुका सुरू झाल्या आहेत.
ओबीसी जनगणनेच्या परिषदा, सभा वगैरे देशभर सुरू झाल्या आहेत. 11 एप्रिलपासून
फुलेवाड्यापासून प्रेरणा घेऊन ओबीसी जनगणा अभियान राज्यभर जाणार आहे.
दिक्षाभुमीवरून ते चैत्यभुमीवर जाऊन त्याचा समारोप होणार आहे. या राज्यस्तरीय ओबीसी
जनगणना अभियानाला मोठ्याप्रमाणात सहभाग देऊन जातीअंताच्या चळवळीला बळ द्यावे,
असे आवाहन करून थांबतो.
सत्य की जय हो !!

-- -- -- - प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270
Email- s.deore2012@gmail.com

15 BahujanNama Lokmanthan 18 March 18



बहुजननामा पंधरावी खेप (दिनांकः- 18 मार्च च्या अंकासाठी)

अंबामाता मुक्ती आंदोलनः जातीअंताच्या दिशेने एक क्रांतिकारक पाऊल!

आमचे फेसबुक मित्र निरज धुमाळ व विशेष करून कॉ. भारत पाटणकर यांचे खास अभिनंदन केले पाहिजे कि, ते बहुजनसमाजाच्या सांस्कृतिक क्रांतीची मुहुर्तमेढ करीत आहेत. बहुजनसमाजाचे सर्वात मोठे अनन्य वैशिष्ट्य हे आहे की तो, मातृसत्ताक आहे. त्याच्या या अनन्य वैशिष्ट्याला नष्ट करण्याचा प्रयत्न इतिहास-पुराण काळापासून आर्य-भट करीत आलेले आहेत. किंबहुना हा प्रयत्न म्हणजे एक प्रदिर्घ संघर्ष परंपराच आहे. गेल्या 5 हजार वर्षांच्या काळातील हा सांस्कृतिक संघर्ष आजही सुरूच आहे.
ज्या प्रजेवर बिनधास्त राज्य करायचं असतं, त्या प्रजेचं सांस्कृतिक मुळ उखडून टाकायचं असतं, हे जगाच्या

ब्राह्मणवादाच्या विरोधात आपण बहुजनांनी अनेक लढाया करून पाहिल्या. राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रादेशिक असे सर्व संघर्ष केल्यावरही ते अपराजित आहेत. आर्यांच्या विजयाचे मुख्य गमक असलेले सांस्कृतिक युद्ध आपण केले तरच खर्‍या अर्थाने जातीअंताचा लढा पुढे जाईल. कॉ. भारत पाटणकर व त्यांचे सहकारी यांनी हा लढ केवळ अंबामाता पुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. त्याला व्यापक करीत तो सर्व कुलमाता व गणमातांची मुक्ती ब्राह्मण धर्मातून केली पाहिजे. हा लढा केवळ भावनिक न राहता शास्त्रशुद्धपणे वैचारिक व तात्विक असला तरच तो शेवटास जाईल. त्यासाठी पुढीलप्रमाणे मांडणी होणे आवश्यक आहे…..
तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांनी जो ऐतिहासिक द्वंदात्मक भौतिकवाद (Indian Materialism) सिद्ध केला त्याप्रमाणे- बळीपतनानंतरचा या देशाचा इतिहास ब्राह्मण-अब्राह्मण संघर्षाचा आहे.


परंतू प्राच्यविद्यापंडित कॉ. शरद् पाटील यांनी सिद्ध केल्याप्रमाणे हा संघर्ष बळीराजाच्या पतनापासून नव्हे तर, स्त्रिसत्ताक गणराज्यातील क्षत्र-ब्रह्मण या दोन ‘अशत्रूभावी’ वर्णांच्या संघर्षापासून सुरू होतो. परंतू हा संघर्ष वरकड उत्पादनविहीन असल्यामुळे अशत्रूभावी होता.


क्षत्रवर्णाचे सर्वंकष वर्चस्व असलेल्या स्त्रीसत्ताक गणराज्यात त्यांची स्वतःची तांत्रिकी श्रुती होती. त्यांचा स्वतःचा धर्मपूर्व धर्म ‘’कुलधर्म’’ होता.


नव्या उत्पादन साधनांच्या कारणास्तव उत्पादन शक्ती बदलल्यात व परिणामी उत्पादनसंबंधही बदललेत. त्यातून क्षत्र-ब्रह्मण संघर्ष अपरिहार्य होता. वर्णविभागणीचे मुख्य कारण असलेले क्षत्र-क्षेत्र-जमिन ही कसण्यासाठी परूषांकडे संक्रमित होत असतांना समाजाचेही धृवीकरण झाले. स्त्रिया वर्णहीन झाल्यात. ब्रह्मण वर्ण सर्वेसर्वा होऊन धार्मिक अधिकारही त्याच्याकडे आलेत. जित गणांना मारून टाकण्याऐवजी त्यांना ‘दास’ बनवून उत्पादन साधनांना जुंपून उत्पन्न वाढविले. हा संक्रमण काळ होता.


या काळात उत्पादनाची साधने जरी ‘पुरूष-ब्रह्मण’ वर्णाकडे असली तरी सांस्कृतिक सत्ता कुलधर्माच्या माध्यमातून स्त्रियांकडेच होती. जमिन गणाची मालमत्ताच राहिली. त्यामुळे पुर्ण पुरूषसत्ताक व्यवस्था आलीच नाही. स्त्रीसत्ता जरी गेली तरी मातृवंशकता तशीच राहिली. कुलधर्मही राहिला. आजही आपण कडकपणे कुलधर्म पाळतो.


या संक्रमण काळात क्षेत्रधारी (जमिनधारी) वर्ण क्षत्रिय झाला, कर्मकांडाचे विधी करणारा (शुक्राचार्य, वसिष्ठ वगैरे)परूष ब्रह्मण वर्णाचा झाला. जित गणाचे लोक दास वर्णाचे झालेत. या गणसमाजात वर्चस्व मात्र क्षत्रियांचे होते.


त्रैवर्ण्य दासप्रथाक मातृवंशसत्ताक गणराज्याच्या अंतिक टप्प्यात आर्य टोळ्यांचे आगमन झाले. त्यांच्याशी झालेल्या जमिनी युध्दात बळीराजा पासून नरकासूरांपर्यंतचे राजे यशस्वीपणे लढले. नंतरच्या सहअस्तित्वमय संघर्ष व तडजोडींमधून आर्यांच्या प्रभावाखाली भारतीय समाज चातुर्वर्ण्यमय झाला. ब्रह्मण वर्णावर कब्जा करीत आर्य ‘ब्राह्मण’ झालेत. स्त्रीसत्ताक गणसामाजाच्या तांत्रिकी श्रुतिची तोडमोड करून वैदिक श्रुती तयार केली, त्यालाच आज ‘वैदिक श्रुती’ म्हटले जाते. कर्मकांडाला महत्व प्राप्त करीत ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ झाला.


या विश्लेषातून एक मुद्दा सिद्ध होतो की, भारतातील मुलभूत संघर्ष हा वैदिक-अवैदिक असा नसून तो ‘’ब्राह्मणी-अब्राह्मणी’’ असाच आहे. आजच्या संदर्भात व्याख्या करायची तर जात-वर्ण-वर्ग-स्त्रीदास्याचे समर्थन करणारा तो ब्राह्मणी छावणीचा सदस्य व या छावणीच्या विरोधात संघर्ष करणारा तो अब्राह्मणी छावणीचा सदस्य होय. राजवाडे सांगतात त्याप्रमाणे ब्राह्मणी छावणीचे नेतृत्व नेहमीच ब्राह्मण करीत राहीले आहेत व अब्राह्मणी छावणीचे नेतृत्व शूद्र व अस्पृश्य!


या ब्राह्मणी-अब्राह्मणी संघर्षात क्षत्रिय व वैश्य वर्ण-जाती आपल्या हितसंबंधांखातर कधी ब्राह्मणी छावणीत तर कधी अब्राह्मणी छावणीत जात होते.


आजही स्वतःला वैश्य व क्षत्रिय समजणारे लोक ब्राह्मणांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहेत. फक्त आरक्षणासारख्या स्वार्थी मागण्यांसाठी ते शूद्रांमध्ये येऊ इच्छितात.


कॉ. भारत पाटणकर व कॉ. निरज यांना अंबामाता मंदिराची सुटका केवळ वैदिक धर्मातून करून चालणार नाही तर, एकूणच ब्राह्मणी छावणीतून सुटका करावी लागेल. तरच तो संघर्ष मातृपरंपरेप्रमाणे समतावादी होईल निकरालाही जाईल. या लढ्यात त्यांना जात-अस्मिता बाजूला ठेवावी लागेल. छत्रपती शिवराय हे जोपर्यंत स्वराज्याला ‘भवानी मातेचे राज्य समजत होते तोपर्यंत मावळे हे गणबंधू म्हणून मित्र व सल्लागार होते. मात्र ब्राह्मण नोकर सल्लागार बनताच गणमाता जाऊन गणपती आला व स्वराज्य जाऊन ‘पेशवाई’ आली. या पासून धडा घेऊन अंबामाता मुक्तीचे आंदोलन मर्यादित न ठेवता समस्त स्त्री-शुद्रादिअतिशुद्रांचे करावे. त्यामुळे हे आंदोलन कोल्हापुरातून बाहेर येऊन समस्त कुलमाता-गणमातांच्या मुक्तीचे आंदोलन होईल व जातीअंताच्या सांस्कृतिक युद्दाला सुरूवात होईल. या सांस्कृतिक युद्धाची मांडणी करणारी पुस्तिका लवकरच प्रकाशित करण्यात येईल.


सत्य की जय हो!!


श्रावण देवरे,
मोबाईल- 88 301 27 270
ईमेल- s.deore2012@gmail.com

14 BahujanNama Lokmanthan 11 March 18


चौदावी  खेप......!              (दै. लोकमंथन रविवार – 11 मार्च 2018 च्या अंकासाठी) बहुजननामा-14
ओबीसी जनगणना आंदोलनातून पर्यायी राजकीय आघाडी ...!

बहुजनांनो.... !
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काल शहाद्यात राज्यस्तरीय अधिवेशन सुरू झाले. कॉं. भालचंद्र कांगो यांनी मला चर्चेसाठी तेथे उपस्थित राहायला सांगीतल्याने दिवसभर अधिवेशनात हजेरी लावली. ओबीसी जनगणनेच्या विषयावर सविस्तर चर्चाही केली. त्या आधी गेल्या रविवारी त्यांच्या मुंबई येथील विभागीय अधिवेशनात कॉ. श्रीकांत तारकर यांनी मांडलेल्या ओबीसी जनगणनेच्या ठरावाला एकमताने मंजूरी मिळाली होती. स्वतः कॉ. कांगो यांनी माझा ‘परिवर्तनाचा वाटसरू’मधील लेख वाचला असल्याने त्यांनी या ठरावाला जाहीर पाठींबा दिला. कॉ. रेड्डी यांच्याशी यावर चर्चा झाली. लवकरच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षही यावर भुमिका घेईल, अशी आशा करू या!
केवळ पार्लमेंट्री प्रयत्नातून ‘ओबीसी जनगणना होऊ दिली जाणार नाही, त्यासाठी राष्ट्रव्यापी आंदोलनच
उभे करावे लागेल’ या भुमिकेवर ठाम असलं पाहिजे. याचे साधे कारण हे आहे की, ओबीसी जनगणनेचा मुद्दा हा मंडल आयोगापेक्षाही जास्त क्रांतिकारक आहे. मंडल आयोग हा केवळ सामाजिक हिस्सा मागतो. मात्र ओबीसी जनगणना हा मुद्दा सरळ सरळ देशाच्या तिजोरीलाच हात घालतो आहे.  ओबीसी जनगणना झाली तर ओबीसींच्या संख्येच्या प्रमाणात म्हणजे किमान 50 टक्के हिस्सा सरकारी तिजोरीतून मागायला सुरूवात होईल. त्यामुळे सरकारी तिजोरीवर डल्ला मारून मौजमस्ती करणार्‍या ‘भटजी-शेठजी-लाटजीं’ची पुरती वाट लागेल. त्यांच्या फायद्याची असलेली जातीव्यवस्था धोक्यात येईल. कारण सरकारी तिजोरीवरचे त्यांचे वर्चस्व नष्ट झाले तर जातीव्यवस्थेची ‘अर्थव्यवस्थाच खतम होते.
ओबीसी जनगणनेचा विषय डाव्या पक्षसंघटनांनी लावून धरावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. कारण जातीअंताच्या चळवळीत ओबीसी हा घटक निर्णायक आहे. आजचा शोषक-शासक हा उच्चजातवर्गीय-पुरूषी असेल त्याची सर्वंकष सत्ता खिळखिळी करून त्याला बॅकफुटवर आणणे आवश्यक आहे. जातीअंताच्या धोरणातील निर्णायक घटक असलेल्या ओबीसी समाजघटकाने ते करून दाखविले आहे. 1985 नंतर ओबीसी जागृतीचा राजकीय परिणाम हळू हळू आकार घेऊ लागला होता. उत्तरेत लालू-मुलायम यांचा दबदबा वाढत असतांना दक्षिणेत तर ते आधीपासूनच आक्रमक होते. त्याच्या परिणामी 1989 ला जे व्हि. पी. सिंग सरकार स्थापन झाले ते ओबीसी-वर्चस्वाचे होते. 1977 सालचे सरकार हे ‘ओबीसी-प्रभावी’ होते, त्यामुळे आयोगाची अमलबजावणी टाळण्यासाठी ते पाडावे लागले. हा अनुभव गाठीशी असलेल्या ओबीसी वर्चस्वाच्या सिंग सरकारने (घाई-घाईतच!) मंडल आयोगाची अंशतः अमलबजावणी सुरू केली. ही लढाई समोरासमोरची असल्याने रास्वसंघाच्या भाजपालाही लगेच (घाई-घाईतच!)रामरथ यात्रा काढावी लागली व सरकार पाडावे लागले.
त्यानंतर जागृत झालेल्या ओबीसीने बाबरीभंजनामुळे नाराज झालेल्या मुस्लिमांना सोबत घेऊन या देशाच्या उच्चजातवर्गीय-पुरूषी सत्ताधार्‍यांची राजकीयसत्ता खिळखिळी केली 2014 पर्यंतच्या 25 वर्षात एकाही राष्ट्रीय म्हणविणार्‍या पक्षाला बहुमताने सत्ता स्थापन करता आली नाही. देशभर अनेक राज्यात ओबीसी मुख्यमंत्री करणे भाग पडू लागले. देशाच्या केंद्रीय राजकारणात ओबीसींचा दबदबा वाढू लागला. देशाच्या इतिहासात 25 वर्ष हा फार मोठा काळ असतो. रशियातील कामगारांनी 1917 साली झारची राजवट अस्थिर करताचा केरेन्स्कीचं भांडवली लोकशाहीवादी सरकार आलं. परंतू हे सरकार अस्थिर असल्याचा फायदा घेत कॉ. लेनिन यांनी रिव्होल्युशनचा कॉल दिला आणी साम्यवादी क्रांती यशस्वी केली. 1985 पासूनच मुख्यतः वाढत्या ओबीसीच्या जागृतीच्या पायी या देशातील उच्चजातवर्गीय-पुरूषी सत्ता खिळखिळी होत होती. 13 दिवसही सरकार न टिकवू शकणारे हे उच्च..सत्ताधारी किती अस्थिर होते याची कल्पना येते. त्या काळच्या ओबीसी मुखंडांनी कॉ. जोती बसूंना प्रधानंमंत्री बनवून समस्त पुरोगामी चळवळीचं नेतृत्वही देऊ केलं होतं. त्यावेळी कम्युनिस्ट पक्षांनी समस्त दलित-बहुजन चळवळ सोबत घेऊन सरकार स्थापन केलं असतं व क्रांतिकारी निर्णय घेऊन संघ-भाजपाला कायमचं गाडलं असतं, तर आजची जातीय-वर्गी-पुरूषी हुकुमशाही आलीच नसती. त्यावेळी केलेला कामचुकारपणा आज पुन्हा करू नये, अशीच माझी आजच्या डाव्यांना विनंती आहे.
2010-2011 ला पार्लमेंटमध्ये ओबीसी जनगणनेची मागणी करणारे सर्व प्रतिगामी-परोगामी पक्षातील ओबीसी खासदार आज जेलमध्ये आहेत. काहींना पार्लमेंटमधुन हद्दपार केलेलं आहे. आज पार्लमंटमध्ये ओबीसी जनगननेवर बोलणारा एकही खासदार शिल्लक ठेवण्यात आलेला नाही. अशावेळी कम्युनिस्ट पक्षांनी ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जात-वर्ग-स्त्रीदास्यअंतासाठी समस्त शेतकरी-कामगार वर्गीय व दलित-बहुजन-ओबीसींची एक सामाजिक-राजकिय आघाडी स्थापन करून आंदोलन छेडलं पाहिजे. त्यात ओबीसी जनगणना हा मुद्दा प्रथम क्रमांकावर घ्यावा. अशा कार्यक्रमांवर आधारित आघाडीच 2019 च्या निवडणूकीत संघ-भाजपच्या हुकुमशाही सत्तेला तोंड देऊ शकते. डाव्यांनी यावर विचारमंथन करावे ही अपेक्षा! भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मुंबई अधिवेशानात ओबीसी जनगणनेचा ठराव मंजूर करून या दिशेने आशादायी सुरूवात केलेली आहेच! माकप ती पुर्णत्वास नेईल, ही अपेक्षा!!
सत्य की जय हो !!
------- प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270

13 BahujanNama Lokmanthan 4 March 18


तेरावी  खेप......!                      (दै. लोकमंथन रविवार – 4 मार्च 2018 बहुजननामा-13
ब्राह्मण-ब्राह्मणेतर द्वेष व प्रज्ञा शिल करूणामय बळीराज्य...!

बहुजनांनो.... !
आज रमेश भीडे नावाच्या एका अभ्यासू फेसबुकीची पोस्ट वाचण्यात आली. अत्यंत अभ्यासपूर्ण व संयमाने रमेश भीडेंनी आपल्या ब्राह्मण महापुरूषांवर होत असलेल्या अन्याला वाचा फोडण्याचे काम केलेले आहे. प्रत्येक जातीच्या विद्वानाने आपापल्या जातीचे दुःख वेशीवर टांगावे, असे तात्यासाहेबही सांगून गेलेच आहेत. रमेश भीडेंसारख्या विद्वानांनी तेच केले तर त्यात त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. खरे म्हणजे ‘जात’ ही संकल्पना कोणाचे भले करण्यासाठी निर्माण झाली नाही. तिचा पायाच मुळी द्वेषावर उभा आहे. ख्रिश्चन सारख्या मिशनरी धर्मांनी दुसर्‍या धर्मातील लोकांचे भले करण्यासाठी शाळा, दवाखाने काढलेत. मुस्लीम धर्मानेही हिंदू धर्मातील जातीय गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी काहींना मुस्लीम धर्मात सामावून घेतले. तसे जातीव्यवस्थेत वा ब्राह्मणी-हिंदू धर्मात होणे शक्य नाही. बाबासाहेब ठाम पुराव्यासह सांगून गेलेत की, हिंदू हे मिशनरी होऊ शकत नाहीत. याचे साधे कारण हे आहे की, कोणतीही एक जात दुसर्‍या जातींचा द्वेष करण्यातूनच निर्माण झाली आहे. जातीव्यवस्था ही उतरंडीची असल्याने द्वेषाच्या प्रमाणालाही उतरंड वा चढण असते. म्हणजे सर्वात वरच्या स्थानावर बसलेल्या ब्राह्मण जातीला खालच्या सर्वच जातींचा द्वेष करावा लागतो, म्हणजे द्वेषाचे भरगच्च असे कोठारच सोबत घेऊन फिरावे लागते. जातीव्यवस्थेच्या उतरंडीत सर्वात खाली असलेल्या ‘अस्पृश्य’ जातींना आपसातच द्वेष करावा लागतो. कारण द्वेष करण्यासाठी आणखीन खाली कोणतीच जात नाही, मग द्वेष करणार तरी कोणाचा?
रमेश भीडे यांची तक्रार वाचून आश्चर्य फक्त याचेच वाटते की, त्यांनी या जाती-द्वेषाच्या उतरंडी-चढणीचा अभ्यास न करताच ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर’ द्वेषाबद्दल लिहिलेले आहे. जातीव्यवस्थेच्या भरभराटीच्या काळात ब्राह्मण-ब्राह्मणेतर द्वेषाची उतरंड ही वरून खाली  होती, आज ही उतरंड ‘चढण’ बनून खालून वर म्हणजे उल्टी झालेली आहे एवढेच! द्वेषाची उतरंड उल्टी झालेली आहे याचा अर्थ आता जातीव्यवस्थेची ‘उल्टी गिणती’ सुरू झाली आहे.    पण असा अभ्यास रमेश भीडेच काय पण ब्राह्मणातील क्रांतीकारक म्हणविणारे श्रीपाद अमृत डांगे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींसारखेही करू शकलेले नाहीत. या विद्वानांनी तर स्पष्टपणे लिहून ठेवले आहे कि, महाराष्ट्रात ‘जोतीराव फुले’ हेच ब्राह्मण-ब्राह्मणेतर द्वेषाचे जनक आहेत. अर्थात हा काही त्यांनी मांडलेला ‘सिद्धांत’ नाही. सिद्धांत असता तर त्याला ऐतिहासिक विश्लेषणाचा आधार वा संदर्भ दिला असता. डांगे वगैरेंनी जाताजाता मारलेला तो ‘शेरा’ होता. शेर्‍याला कोणतीही कारणमिमांसा नसते. शिवाय शेरा मारण्याचा अधिकार वरिष्ठालाच असतो. कनिष्ठाला तो कितीही चुकीचा वाटत असला तर ‘जाब’ कोणाला विचारणार?
इंग्रजांनी टिळकांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ अशी शिवी देऊन तुरुंगात टाकले. स्वातंत्र्य चळवळीच्या शिलेदारांना ती शिवी ‘पद्वी’ वाटते. परंतू ब्राह्मण-ब्राह्मणेतर द्वेषाचे जनक अशी शिवी जर ब्राह्मण विद्वान तात्यासाहेबांना देत असतील तर ती गौरवास्पद वगैरे मानण्याचे काम ब्राह्मणेतर करणार नाहीत. मात्र या शिवीचे विष्लेषण जरूर करतील. बाबासाहेबांनी जातीव्यवस्थेच्या निर्मितीचे रहस्य उलगडतांना स्पष्ट केले आहे की, सर्वात आधी ब्राह्मण वर्गाने स्वतःला बंदिस्त करून ‘जात’ निर्माण केली. म्हणजे द्वेषाचा पहिला दगड पायाभरणीत टाकण्याचे महापुण्य ब्राह्मणांनीच केले. 21 वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करून जगभर द्वेषाचा भंडाराच उधळला. त्यानंतर जसजसे नवे वर्ण वा जाती उतरत्या भांजणीत निर्माण होत गेल्या तसतसे चढत्या भांजणीचा द्वेष ब्राह्मणांना करावाच लागला. कारण इमारतच द्वेषाच्या पायावर उभी केली गेली. चूकून एखाद्या जातीबद्दल प्रेम निर्माण झाले तर इमारतीचा डोलाराच कोसळायचा!
हेच काम तात्यासाहेबांनी व बाबासाहेबांनी केले. चूकून नाही तर जाणीवपुर्वक त्यांनी ‘जाती जातींमध्ये भाईचारा’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एकूणच द्वेषाच्या पायावर उभ्या असलेल्या इमारतीला सुरूंग लावण्यासाठी जातीअंताचे तत्वज्ञान निर्माण केले व क्रांतीकारक कृतीकार्यक्रमही दिला. ‘’भिल्ल महार ब्राह्मणाशी! धरावे पोटाशी!! जोती म्हणे.....’’ असा सिद्धांत मांडून ब्राह्मणांवरही प्रेम करण्याचा संदेश दिला. बाबासाहेबांनी मनुस्मृतीला ‘काडी’ लावण्याचे काम एका ब्राह्मणाकडून करवून घेतले. याचा अर्थ ब्राह्मण आमचे मित्रच आहेत, असा संदेश त्यांना द्यायचा होता. शाहू महाराज ‘राजे’ असूनही त्यांनी कधीच सूडबुद्धीने ब्राह्मणांना दंडित केले नाही. त्यांच्या जातीअंताच्या धोरणावर जेव्हा जेव्हा ब्राह्मण आडवे पडलेत तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांचे वैचारिक प्रबोधनच केले. एकाला तर ते चक्क घोड्याच्या पागेत घेऊन गेलेत. वकील असलेल्या ब्राह्मण विद्वानाला मानवी सिद्धांत समजावून सांगतांना घोड्याचा वापर करावा लागतो. यावरून जातीव्यवस्था ही किती रानटी आहे, याची कल्पना यायला हवी. आणी तरीही ‘तीला’ निर्माण करणार्‍यांना आजही ‘सुसंस्कृत’ समजले जाते.
तात्यासाहेब, बाबासाहेब व शाहू महाराज यांनी ब्राह्मणांसकट सर्वच जातींवर प्रेम करायला शिकविले. कारण जातीव्यवस्था नष्ट करायची तर द्वेषाचा पाया मुळातून उखडून फेकावा लागेल. परंतू त्यासाठी काही व्यापकता, उदारता, त्याग, बलिदान वगैरे ओघानेच येते. पण समाजात असाही एक वर्ग असतो की त्याला असे काही न करता शॉर्टकटने बरेच काही मिळवायचे असते. महापुरूषांच्या क्रांतिकारक सिद्धांतांना सुधारणावादी बनवून मुरळ घालतात, सोपेकरणाच्या नावाखाली विकृत करतात, आपल्या सोयीचे तेवढे स्विकारतात व गैरसोयिचे तेवढे गाडून टाकण्याचा प्रयत्न करतात. अशा स्वार्थी वर्गाला ओळखून बाजूला ठेवले तरच तात्यासाहेब, बाबासाहेब व शाहूराजेंसारख्या असंख्य महापुरूषांचे स्वप्न असलेले ‘प्रज्ञा शिल करूणामय’ बळीराज्य साकारणार आहे.
जयजोती! जयभीम!!