http://shrwandeore.blogspot.in/

Wednesday, June 26, 2019

76 BahujanNama Chemistry, EVM5, 25June2019



बहुजननामा-76
(सुधारितआवृत्ती)                                                    
(21-25 जून 2019)

मोदींची केमेस्ट्री विरोधकांचं अंकगणित
(EVM भाग-5)
बहुजनांनो.... !

                     --

आज सकाळीच (21 जून) माननीय न्यायमुर्ती कोळसे पाटील साहेबांचा फोन आला. म्हणाले, ‘मी तुमचे बहुजननामाचे बहुतेक सर्वच लेख वाचत असतो. ईव्हीएमचं विश्लेषण करणारे तुमचे मुद्दे वास्तव आहेत, परंतू आमच्या नेत्यांना हे का समजत नाही, हेच कळत नाही.’ वगैरे बरीच स्तुती त्यांनी केली. पाचवा लेखांक अजून आला नाही का? मी त्याची वाट पाहात आहे, अशी विचारणाही न्यायमुर्तींनी केली.

समकालीन लोक आपल्याबरोबरच्या व्यक्तीलामान्यतादेतांना आपलेपदईगोसांभाळूनच मान्यता देत असतात. अर्थात मान्यता देण्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत. समोरच्या व्यक्तीचं मेरीट आकलन करून ते योग्य असेल तर मान्यता देण्यात एक प्रकारचा मोठेपणा असतो. परंतू बर्याच नेत्यांना विचारवंतांना एकतर आकलन क्षमता नसते, ती थोडीफार असली तर दानत नसते आणी मोठेपणा तर अजिबातच नसतो. मात्र न्याय. कोळसे पाटील हे जाती-धर्माच्या पलिकडे जाउनव्यापकभुमिका घेऊन समाजकारण राजकारण करणारे असल्याने त्यांना जातीयवादी मराठा मोर्चा संयोजकांनी अपमानास्पदरित्या बैठकीच्या बाहेर काढले होते. त्यांनी माझ्या मराठा ओबीसीकरणाविरोधातील लढ्याला अनेकवेळा पाठींबाही दर्शविला आहे. समकालीनांमध्ये असे मान्यवर लोक बोटावर मोजण्याइतकेच असतात. बाकीचे आपल्याच ईगोत वा जात-प्रेमात अडकून स्वतःचेही नुकसान करतात चळवळीचेही नुकसान करतात. अशा ईगोईस्टांच्या दृष्टीने चळवळ दुय्यम असते. चळवळीचे नाव सांगून स्वतःचे सामाजिक करियर घडविणे त्यातून एखाद्या पक्षाचे तिकीट मिळवायचे, एवढाच त्यांचा उद्देश! त्यांनी आमदार-खासदार-मंत्री बनायला आमचा विरोध नाही. मात्र घोडा विकून नाल विकत घ्यायला आमचा विरोध आहे. कारण घोडा विकून नाल विकत घेणार्‍याला बेवकूफ म्हटले जाते, मात्र आमच्या दृष्टीने तो बिभीषणच!

तुमचे विचार वास्तवाचं सत्य कठोर विश्लेषण करणारे असतील तर, तुमच्याच काळात त्याला मान्यता मिळायला हवी त्यावर चळवळही उभी राहायला हवी. बाळ गंगाधर टिळक यांनी कॉंग्रेसच्या व्यासपीठावरून जे वैदिक-ब्राह्मणी विचार मांडलेत, त्या विचाराला समकालीन नेत्यांनी-कार्यकर्त्यांनी मान्यता दिली व ते अमलातही आणलेत. रानडेंच्या समता परिषदेचा मंडप जाळणे, गल्लो-गल्ली गणेश उत्सव साजरा करून हिंदू-मुस्लीम दंगली पेटविणे, यासारखे अनेक कार्यक्रम प्रदिर्घ काळापर्यंत राबवीले गेलेत. परिणामी आजही कॉंग्रेसचे तत्वज्ञान धोरणे वैदिक-ब्राह्मणीच आहेत. आजही कॉंग्रेसचे सर्चोच्च नेते जाणवे व रुद्राक्षांच्या माळा घालून फिरतात, मंदिरात जाऊन आडवे पडतात. हा टिळकांचा विजय आहे, आणी या विजयाचे शिल्पकार टिळकांचे समकालीन मित्र-कार्यकर्ते आहेत, ज्यांनी टिळकांचा विचार त्वरीत मान्यता दिली व अमलात आणला. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समकालीन मित्र कार्यकर्त्यांनी उचलून धरलेत. त्यामुळे त्याच काळात चळवळीने जोर धरला राखीव जागांचे फळहीतात्काळ त्यांच्या हयातीतच मिळाले. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुलेंचे विचार त्यांच्या हयातीत स्वीकारले गेले नाहीत. परिणामी अजूनही फारसे काहीफळहाती लागत नाही. टिळकांच्या ब्राह्मण अनुयायांजवळ बाबासाहेबांच्या दलित अनुयायांजवळ जी आकलन-क्षमता कार्य-क्षमता आहे, ती ओबीसी नेते-विचारवंतांमध्ये का येत नाही? ओबीसी नेते विचारवंत यांना अशी अक्कल येण्यासाठी 84 योन्याही कमी पडतील. ते नेहमीच उलट्या बुद्धीचे असतात. पुढील एका उदाहरणावरून तुमची खात्री पटेल---

प्रामाणिक ओबीसी कार्यकर्ते आपल्या ओबीसींच्या हितासाठी ब्राह्मण-क्षत्रियांशी नेहमीच लढत असतात. वैचारिक लढाई करणारे 100 कार्यकर्ते असतील तर, प्रत्यक्ष समोरा-समोरची मैदानी लढाई लढण्यासाठी चारच कार्यकर्ते मैदानात उतरतात. बाकीचे 96 कार्यकर्ते घरातच बसून राहिलेत तरी चालेल, परंतू त्यांनी लढणार्या चार कार्यकर्त्यांना चोरून-लपूनरसदपुरवीली पाहिजे, एव्हढीच छोटीशी अपेक्षा असते. मदत करण्याची दानत नसेल तर शांतपणे गोधळी अंगावर घेऊन घरात झोपून राहावे. ती सुद्धा एक प्रकारची मदतच असते. परंतू इतका शहाणपणा दाखवतील ते ओबीसी विचारवंत-कार्यकर्ते कसले? आपल्या उलट्या बुद्धीचा वापर करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असे ते समजतात. शत्रूशी सुरू असलेली लढाई ऐन भरात आली असतांना हे लोक शत्रूच्या नेत्यांना आपल्या ओबीसी स्टेजवर बोलावून सन्मानीत करतात बिभिषण असल्याचा आनंदही साजरा करतात. एक शहाणा ओबीसी नेता म्हणाला, या लढाईत थरार कुठेच दिसत नाही. म्हणजे हा शहाणा रोज घरातून निघतांनाएके 47’ घेऊनच बाहेर पडतो थरार निर्माण करतो, असे समजायचे काय? दुसर्‍या एका अतिशहाण्याने शत्रूच्या नेत्याला भावी ओबीसी प्रधानमंत्री म्हणून डिक्लेयर करून टाकले. तिसर्‍या एका महान ओबीसी नेत्याने त्याच शत्रूला महात्मा फुले पुरस्कार देऊन गौरवीले. या अशा ओबीसी-बिभीषणांमुळेआम्ही ‘‘मराठा-ओबीसीकरणाच्या विरोधातील’’ जीवघेणी मैदानी लढाई हरलो. दुःख महानायक रावण मरण्याचं नाही, तर दुःख आहे ब्राह्मणी षडयंत्रकारी राम जिंकण्याचं! कारण या -पराजित रामाची मिथ नंतरच्या पिढ्यातील हजारो शंबुकांचं शिरकाण करीत असते. आता हे -पराजितमराठा-ओबीसीलोक कितीतरी खर्‍या ओबीसी बांधवांच्या नोकर्‍या सवलती फस्त करीत राहतील, कितीतरी ओबीसी-शंबुकांचं शिरकाण करीत राहतील, याची थोडीही जाणीव या दलाल ओबीसींना नाही. आणी नंतर हेच दलाल-चोर ‘‘ओबीसी चळवळ नष्ट झाल्याच्या’’ उलट्या बोंबा ठोकत राहतात.

असो, मी कितीही प्रेमाने सांगीतले तरी, आणीकडकशिव्या देऊन कितीही आसडू ओढले तरी, यांच्या कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच राहाणार! मी का म्हणून वारंवार दगडावर डोकं आपटत राहतो?

                
-

आता आपण ईव्हीएम च्या शेवटच्या टप्प्यावरील चर्चेपर्यंत आलो आहोत. यात लक्षणीय मुद्दा हा आहे की, कॉंग्रेस वगळता सर्वच विरोधक ईव्हीएम ला पराभवासाठी दोषी धरीत आहेत. परंतू हे 100 टक्के खरे नाही. 23 मेच्या ईव्हीएमप्रणीत अभूतपुर्व विजयानंतर मोदींनी जे भाषण कार्यकर्त्यांसमोर केले, त्यात त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला.विरोधी लोग मॅथेमॅटिक्स करते रहे और हम केमेस्ट्री करके जीत गये.’ आता या वाक्याचे दोन अर्थ होतात. ‘केमेस्ट्री करणेया शब्दाचा एक अर्थजादूकरणे असाही होतो. परंतू मोदीजी जेव्हा केमेस्ट्रीच्या आधी गणित विषयाबद्दल बोलतात तेव्हा केमेस्ट्री केवळ जादू राहात नाही, तो खरोखर केमेस्ट्री विषयच असतो. केमेस्ट्री विषय काही गणिती समिकरणाच्या अगदी विरोधात आहे. म्हणजे गणितात दोन संख्यांची बेरीज सहजपणे करता येते, त्याच सहजपणे त्यांची वजाबाकी करून मूळ संख्या मिळविता येतात. ज्या दोन मूळ संख्यांचा गुणाकार करून सहजपणे तीसरी संख्या मिळविता येते, तेवढ्याच सहजतेने त्यांचा भागाकार करून दोन्ही मूळ संख्या परत मिळविता येतात. मात्र केमेस्ट्रीमध्ये तसे नाही. तुमच्या घरातले मीठ ज्या दोन मूलद्रव्यांपासून तयार होते ते मूल घटक सहजपणे वेगळे करता येत नाहीत, कारण ते रासायनिक प्रक्रियेतून तयार झालेले आहेत. सोडियम क्लोराईड हे मीठाचे केमिकल नाव आहे. सोडियम मेटल क्लोरिन वायु या दोन मुलद्रव्यापासून हे मीठ तयार झालेले आहे. पृथ्वी तप्त गोळ्यापासून थंड होतांना एका विशिष्ट तपमानाला रासायनिक प्रक्रियेमुळे हा क्षार तयार झाला. संयुगीकरण (molecularisation / Compound Forming) ही रासायनिक प्रक्रिया प्रचंड कीचकट, तापदायक कधी कधी  धोकादायक सुद्धा असते. याच मीठाचे विघटन (Dissociation / Electrolysis of NaCl) करतांना त्याचे द्रवीकरण करावे लागते. त्यात एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे दोन ईलेक्ट्रोड सोडावे लागतात बाहेरून ईलेक्ट्रीसिटी दिल्यावर त्याचे विघटन सुरू होते. अशी ही  किचकट गुंतागुंतीची प्रक्रिया असते. आणी हे कार्य फक्त आवश्यक सामुग्री, साधने तंत्रज्ञान असलेल्या सुरक्षित प्रयोगशाळेतच करता येते, घरात, मैदानात किंवा रस्त्यावर नाही.

                 
--

आता राजकारणात मॅथेमॅटिक्स करणे म्हणजे काय केमेस्ट्री करणे म्हणजे काय, हे आता समजून घेऊ या! एखादा पक्ष वा नेता निवडणूकांच्या रिंगणात उतरला की, तो जिंकण्यासाठीच उतरतो, हा पहिला सिद्धांत आहे. त्यासाठी तो आपले मतदार तयार करतो. आता हे मतदार तयार करणे म्हणजे काय? त्याचा पहिला प्रकार असतो वैचारिक कृती-कार्यक्रम देण्याचा! उदाहरण देऊन स्पष्ट करतो. राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक आंदोलने केलीत. अनेक नेते जेलमध्ये गेलेत, काही शहिद झालेत. या कृती कार्यक्रमातून त्यांनी जनतेवर जो प्रभाव निर्माण केला होता, त्याच्या परिणामी कॉंग्रेस पक्ष (अपवाद वगळता) 70 वर्षे सत्तेवर होता. परंतू प्रदिर्घ काळ सत्तेवर येण्यासाठी केवळ स्वातंत्र्य लढा हेच एकमेव कारण होते काय? तसे असते तर मग निवडणूकीत प्रचार करण्याचीही गरज नव्हती. आम्ही स्वातंत्र्य लढा लढलो जिंकलो म्हणून आम्हालाच निवडून द्या, केवळ एव्हढेच सांगून कॉंग्रेसवाले थांबत नव्हते, तर त्यांना आवर्जून सांगावे लागायचे की, आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, आम्ही समाजवादी आहोत, आम्ही जातविरोधी आहोत, हे सर्व ठळकपणे निवडणूक जाहीरनाम्यात लिखित स्वरूपात सांगावे लागे. सत्ता आल्यावर तसे असल्याचे दाखवावे लागे. असे का करावे लागत होते?

कोणताही समाज एकजिनसी नसतो. वर्गभेद, वंशभेद, जातीभेद, धर्मभेद, भाषिक-प्रादेशिक भेद, सांस्कृतिक भेद वगैरे! हे भेद परस्परविरोधी (शत्रूभावी) असल्याने त्यांचे हितसंबंधही परस्परविरोधी असणार! या प्रत्येक समाजघटकाचे आपापले पक्ष आहेत. किसान-कामगारांचा कम्युनिस्ट पक्ष, मुसलमानांचा मुस्लीम लीग, कट्टर हिंदूत्ववाद्यांचे हिंदू महासभा जनसंघ, ओबीसींचे शेकाप, डीएमके वगैरे, दलितांचा शेकाफे रिपब्लीकन! असे अनेक देशव्यापी राज्यस्तरीय पक्ष होते. आपापल्या समाजघटकांचे हितसंबंध दृढ साध्य करण्यासाठी ते आपापल्या वोटबँका तयार करून निवडणूका लढवीत होते काही प्रमाणात आपापल्या पॉकेट्समध्ये जिंकतही होते. या सर्व व्होटबँका म्हणजे रसायन शास्त्रातील स्वतंत्र मुलद्रव्ये (Elements) होत. एका विशिष्ट सामाजिक-सांस्कृतिक घडामोडीत (क्रांती वा प्रतिक्रांतीत) हे समाजघटक (Elements) तयार होतात ते आपल्यासोबत स्वतःचे गुणधर्म हितसंबंधही आणतात. उदाहरणार्थ जमिनदारशाही-सरंजामशाहीव्यवस्था नष्ट करण्यासाठी भांडवली लोकशाही क्रांती करावी लागते. या क्रांतीकारी घडामोडीत कामगार वर्ग भांडवलदार वर्ग हे दोन मूलद्रव्ये (Elements) तयार होतात. त्यांच्या संयुगीकरणातून  लोकशाही जन्म घेते. परंतू या दोन्ही Elements चे हितसंबंध वेगळे असल्याने त्यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू होतो, तेव्हा त्यांच्या वेगवेगळ्या वोटबॅंका बनतात राजकीय पक्षही वेगवेगळे बनतात. कामगारांचामजूर पक्ष भांडवलदारांचाहुजुर पक्ष’! (Labour patry & Conservative Party) या व्यतिरिक्त धार्मिक, प्रादेशिक हितसंबंधांचे पक्ष ब्रिटनमध्ये आहेत.

भारतातही असे पक्ष त्यांच्या वोटबँका आहेत. कॉंग्रेसला आपली सत्ता टिकविण्यासाठी या मूलद्रव्यांच्या व्होटबँकेत रासायनिक प्रक्रिया करून संयुग (Compound formation) घडवून आणावा लागला. या भेदाभेदमध्ये जे समाजघटक अधिक जागृत होते, त्यांना झुकते माप दिले जायचे. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर कम्युनिस्टांच्यामुळे कामगारवर्ग शेतकरीवर्ग जागृत संघटित झालेला होता. तो देशव्यापी व्होटबँक बनून कम्युनिस्टांकडे गेला तर दिल्लीची सत्ता जाईल, या भीतीपोटी कामगार-शेतकर्‍यांना सामावून घेण्यासाठी कामगार-शेतकर्‍यांच्या हिताचे कायदे करावे लागत होते. आपल्या पक्षाच्या मार्फत स्वतंत्र कामगार युनियन व शेतकर्‍यांच्या संघटना काढाव्या लागत होत्या. मुसलमानांना त्यांच्या मुस्लीम लीग पक्षाकडून तोडण्यासाठी कॉंग्रेसला त्यांचा अनुनय करावा लागतो. त्यांना संरक्षण देण्याच्या नावाखाली धर्मनिरपेक्ष सिद्धांत मांडावा लागला. आरक्षणांचं तत्व स्वीकारून दलित-आदिवासींना सामावून घेण्यात आलं. वैदिक हिंदूत्व सिद्ध करण्यासाठी प्रधानमंत्री नेहरूंना सरकारी पातळीवर सोरटी सोमनाथ मंदिराचा पुनर्उद्धार करावा लागला कुंभमेळा सारख्या धार्मिक यात्रा-जत्रांना सरकारी तिजोरीतून कोट्यावधी रुपये खर्च करावे लागले. याला रसायन शास्त्रातसंयुगीकरण’ (Compound formation) म्हणतात. निरनिराळी मूलद्रव्ये एकत्र आणून त्यांचे संयुगीकरण केल्यावरच कॉंग्रेसची व्होटबँक तयार होत होती. कधी कधी ही वोटबँक ढासळायला लागली की, गरीबी हटाव सारख्या घोषणा द्याव्या लागायच्या. बँकाचं राष्ट्रीयकरण जमिनदार-सरंजामदारांच्या गाद्या-सिंहासने उध्वस्त करून वर्ग-जातविरोधी निर्णय घ्यावे लागायचे.

शांततामय सहअस्तित्व कायम ठेऊन आपापल्या हितसंबंधांना साध्य करण्याचा प्रयत्न करणे, हे मानव प्राण्याचेमाणूसअसल्याचे एक महत्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. हे लक्षण संयुगीकरणासाठी उत्तम वातावरण निर्माण करते. त्यातून एक राजकीय व्होटबँक तयार होते. रासायनिक प्रक्रियांच्या असंख्य साखळ्यांमधून चराचर सृष्टीची निर्मिती-नवनिर्मिती गती कायम ठेवली जाते. एका विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट काळानंतर सहअस्तित्वाचे संतूलन बिघडते रासायनिक साखळी प्रक्रियाही आमुलाग्र बदलते. मानवी समाजातही शांतता सहअस्तित्वाची उत्तम स्थिती कायमस्वरूपी राहात नाही. काही समाजघटक काही कारणास्तव अचानक प्रभावी होतात नियम तोडून बदमाषी करायला लागतात. ते दुसर्‍या समाजघटकांचे हितसंबंधांना धक्का लावून आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. परंतू तरीही कॉंग्रेसने वेगवेगळ्या रासायनिक साखळी प्रक्रिया करून सत्ता टिकविण्याचा प्रयत्न 1990 पर्यंत केला.
                
 --

याच्या उलट कॉंग्रेसचे बहुजन विरोधक सत्ता मिळविण्यासाठी मॅथेमॅटिक्स चा वापर करीत असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 1977 चा जनता पक्ष होय! जनता पक्षाच्या सरकारला खिचडी सरकार का म्हणत होते, हे मी वेगळे सांगण्याची गरज नाही. तांदूळ दाळ एकत्र करून पाण्यात शिजवीले की झाली खिचडी! परंतू खिचडी तयार झाल्यावरही त्यातून दाळ तांदूळ सहजपणे वेगळे करता येतात. बेरीज आणी वजाबाकी एकदम सोपी प्रक्रिया! आणीबाणीतील एकाधिकार हुकूमशाही नष्ट करण्याच्या उदात्त हेतूने एकत्र आलेले हे घटकपक्ष दिड वर्षांच्या आतच वेगळे झाले पुन्हा एकमेकांशी भांडू लागलेत. मायावतीजी अखिलेशजी यांच्या बाल-अंकगणिताचे उदाहरण ताजे आहेच.

कॉंग्रेसने आपली वोटबँक तयार करण्यासाठी रासायनिक प्रक्रियेतीलसंयुगीकरणपद्धत वापरली. याच्या अगदी उलट संघ-भाजपाने रासायनिक प्रक्रियेतील पृथक्करण (Dissociation / Electrolysis) पद्धत वापरली. पृथक्करण करणे म्हणजे विघटन! भारताची जनता अशा संयुगीकरणाच्या अवस्थेत राहिली तरपेशवाईयेईल कशी? म्हणून त्यांनी विघटनाची रासायनिक प्रक्रिया वापरली. राखीव जागांविरोधी दंगली करून दलित-दलितेतर जातींमध्ये विघटनाची प्रक्रिया घडवून आणत होते. हिंदू मिस्लीम दंगली करून धार्मिक विघटन घडवून आणण्यात संघ-भाजपाचा हातखंडा होता आहे. परंतू केवळ दंगली करून वा विघटन करून सत्ता मिळविता येत नाही. त्यात सांस्कृतीकरण ही एक वेगळी रासायनिक प्रक्रिया करावी लागली. सांस्कृतीकरण ही एक प्रचंड गुंतागुंतीची रासायनिक प्रक्रिया आहे. ती क्रांतीकारी असते, तशी प्रतिक्रांतीकारीही असते. मी नंतर कधीतरी तीच्यावर विस्ताराने लिहीन. फक्त एक उदाहरण देऊन पुढे जाऊ. राममंदिर आंदोलन हे सांस्कृतीकरणाची एक रासायनिक प्रक्रिया होती. ज्यामुळे संघ-भाजपाची एक बेसिक वोटबँक तयार होत होती.

                 
--

 
परंतू संघ-भाजपाच्या या रासायनिक प्रक्रियेत अडथळा आणणारी दुसरी एक मोठी रासायनिक प्रक्रिया वेगाने घडत होती. त्या रासायनिक प्रक्रियचे नाव आहे ‘‘मंडल आयोग चळवळ’’. खरे म्हणजे मंडलच्या रासायनिक प्रक्रियेला नष्ट करण्यासाठीच रामंदिराची रासायनिक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मनुवाद्यांच्या दृष्टीने मंडल आयोग म्हणजे मीठाचा खडाच! आणी ओबीसींच्या दृष्टीने अमृत (पाणी)! मंडल आयोगाचा संबंध सर्वात मोठा समाजघटक असलेल्या (52 टक्के) ओबीसीशी आहे. ओबीसी हा केवळ संख्येने मोठा आहे असे नव्हे, तर तो जात्यंतक लोकशाही क्रांतीतील सर्वात निर्णायक घटक आहे. जात्यंतक लोकशाही क्रांती ही एक देशव्यापी क्रांतीकारी रासायनिक प्रक्रिया आहे. तीच्यात एकाच वेळेस संयुगीकरण विघटन अशा प्रक्रिया स्फोटक स्वरूपात घडून येतील. अशा क्रांतीकारी ओबीसी घटकाशी समोरा-समोर दोन हात करून लढण्याची हिम्मत संघ-भाजपामध्ये नाही. म्हणूनच ते धर्माच्या पडद्याआड उभे राहून ओबीसींना दडपण्याचा प्रयत्न करतात. रामायणातील बालीशी युद्ध करतांना भित्रा राम झाडाआड लपून बाण मारतो बालीचा खून करतो. राममंदिराच्या आड उभे राहून मंडलआयोगाचा खून करण्यात आला. त्याचे हे आधुनिक उदाहरण!

शब्दमर्यादा संपून बरीच पाने लिहून झालीत. पुढील मुद्दे पुढील लेखांकात चर्चेला घेऊ या! तो पर्यंत अभ्यासू वाचक https://shrwandeore.blogspot.in/ या ब्लॉगवर जाऊन माझे ‘‘ईव्हीएम-2019’’ हे पुस्तक वाचण्याची तसदी घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत कडकडीत जयजोती जयभीम घालतो आणीसत्य की जय होघोषित करून थांबतो.
(
दिनांक- 21-25 जून 2019)
                                                       ------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270

 Blog
ब्लॉग

 Email-

(
महत्वाची सूचनाः- माझे ‘‘बहुजननामा’’ साठी लिहिलेले लेख कोणत्याही दैनिकात, मासिकात वेब पोर्टलवर प्रकाशित करण्याची परवानगी देण्यात येत आहे.)