बहुजननामा-107
करोनाः व्हेज, नॉनव्हेज आणी केमिकल लोच्या
-1-
करोनाशी लढणार्या आरोग्य कर्मचारी अधिकार्यांना प्रत्यक्ष कृतीतून दिलासा देणारी आज देशात एकमेव व्यक्ती रतनजी टाटा आहेत. जी कामे शासनाने अत्यंत गांभीर्याने व वार्याच्या वेगाने केली पाहिजेत, ती सर्व कामे रतन टाटा करीत आहेत. हा माणूस केवळ प्रधानमंत्री निधीमध्ये पैसे देऊन 'धन्य' झाला नाही, तर आपली करोडो रुपये कमाईची फाईव्ह स्टारहॉटेल्स आरोग्य कर्मींना राहण्यासाठी देऊन टाकलेली आहेत. वास्तविक शासनाने स्वतःच पुढाकार घेऊन देशातील सर्व शासकीय व अशासकीय विश्रामगृहे,हॉटेल्स व वस्तीगृहे ताब्यात घेऊन तेथे प्रांतीय व परप्रांतीय कष्टकर्यांना ठेवता आले असते. पोलीस, डॉक्टर्स व इतर आरोग्य कर्मचारी तसेच कोरोंटाइन केलेल्यांची राहण्याची व्यवस्था अशा हॉटेल्समध्ये करू शकले असते. कारण करोनाग्रस्तांच्या सहवासात राहणारे आरोग्य कर्मचारी व पोलीस आपली ड्युटी संपवून घरी जातात, तेव्हा त्या घरातील सदस्यांचेही जीवन धोक्यात येते. देशातील सर्व रजिस्टर्ड डॉक्टर्स व नर्सेसना अगदी सुरूवातीपासूनच अशा हॉटेल्स व वसतीगृहात ठेवले असते तर निश्चितच ते मानवतावादी ठरले असते. कारण या हॉटेल्समध्ये व होस्टेल्समध्ये जेवण्याची व राहण्याची उत्तम सोय आधीपासूनच असल्याने नवीन काही व्यवस्था करण्याची गरजही नव्हती. घरातच कोरोंटाइन केलेल्या व हातावर शिक्के मारलेल्यांना अशा होस्टेल्समध्ये ठेवले असते तर ते कुठे पळून जाण्याचीही शक्यता नव्हती. कारण तथे पोलीस बंदोबस्त ठेवता आला असता. परंतू जे रतन टाटा सारख्या एका व्यक्तीला सुचते ते शासनव्यवस्थेच्या नियंत्यांना सूचत नाही, असे कसे होऊ शकते?
-2-
शासनव्यवस्थेचे प्रमुख असलेले प्रधानमंत्री आतापर्यंत देशाला 3 वेळा सामोरे आलेत, परंतू त्यांच्या एकाही भाषणात करोनाला नियंत्रित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय नव्हता. थाली ठोका, टाळी पिटा आणी आता अंधार करून दिवे लावा यासारख्या फालतू उपाययोजना वारंवार करायला लावणारे प्रधानमंत्री आजवर जगात कुठेच झाले नाहीत व पुढेही होऊ शकणार नाहीत. हे फक्त भारतातच घडू शकते कारण भारताची सर्वंकष सत्ता अशा 'एका' जातीच्या हातात गेली आहे, जी जात या देशाचे वाटोळे करण्यातच स्वतःचे 'अस्तित्व' पाहते. ही जात जेव्हा जेव्हा सत्तेवर येते, तेव्हा तेव्हा या देशाचे वाटोळे करण्यातच ती धन्यता मानीत आली आहे. त्यांनी या देशाची फाळणी खूप आधीपासूनच करून ठेवलेली आहे. आर्य-अनार्य, सूर-असूर, वैदिक-अवैदिक, ब्राह्मण- अब्राह्मण, अवर्ण-सवर्ण, हिंदू-मुस्लीम अशा अनेक सामाजिक विभागणीतून त्यांनी या देशाच्या धृवीकरणाची प्रक्रिया शतकांनुशतकांपासून सुरू ठेवलेली आहे. याला केमिकल लोच्या करणारी प्रक्रिया म्हणता येईल. अशा प्रकारे मेंदूंचा सामुदायिक रासायनिक लोच्या करणार्या प्रक्रियांमधून ते आज 'ब्राह्मण भारत' व 'अब्राह्मण भारत' बनवू शकलेले आहेत. अब्राह्मण भारत म्हणजे शूद्रादिअतिशूद्रांचा (SC+ST+OBC) भारत व ब्राह्मण भारत म्हणजे ब्राह्मण+क्षत्रिय+वैश्य यांचा ब्राह्मण-वैदिक भारत होय! ब्राह्मण भारतात ब्राह्मणांचे एकतर्फी निर्विवाद वर्चस्व असते व बाकीच्या जाती व व्यक्ती त्यांच्या-त्यांच्या जातीय व व्यक्तिगत हितसंबंधांना कायम ठेवीत व्यापक
ब्राह्मणी हितासाठी काम करीत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगीतलेली ही दोन राष्ट्रे प्रत्येक गावाच्या विभागणी सीमेपासून सुरू होतात. ही दोन्ही राष्ट्रे प्राचिन काळापासूनच शत्रू-राष्ट्रे म्हणून एकाच भूप्रदेशात नांदत आलेली आहेत, असेही बाबासाहेब स्पष्टपणे सांगतात. जेव्हा सम्राट बळीराजा, जैन चंद्रगुप्त सम्राट, बौद्ध अशोक सम्राट, जैन-ओबीसी बिज्जल राजा, शाक्त ओबीसी शिवाजी-संभाजी-शाहू राजे, जातीयवादविरोधी व्हि.पी.सिंग, ओबीसीवादी देवेगौडा यांच्यासारखे राजे होतात, तेव्हा (SC+ST+OBC) भारत-राष्ट्राची समतावादी शासनव्यवस्था, समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था मजबूत होते. परिणामी ब्राह्मणांच्या विषमतावादी भारतराष्ट्राचे अस्तित्व धोक्यात येते. परंतू प्रदिर्घ सांस्कृतिक प्रति-क्रांतीतून ते आपल्या ब्राह्मण-भारत राष्ट्राला पुन्हा-पुन्हा जीवदान देण्यात यशस्वी होतात. तेव्हा या प्रतिक्रांतीतून ब्राह्मणी-वैदिकी राम, चाणक्य-शिष्य चंद्रगुप्त, ब्राह्मण पुश्यमित्र शृंग, ब्राह्मण-शशांक राजा, ब्राह्मण हेमाद्री पंडित, ब्राह्मण नेहरू घराणे, ब्राह्मण अटलबिहारी व ब्राह्मणी-वैदिकी नरेंद्र मोदी सारखे राजे राज्यकर्ते होतात व ते त्यांच्या ब्राह्मण-भारत राष्ट्राची अर्थव्यवस्था, शासनव्यवस्था व समाजव्यवस्था मजबूत करतात. म्हणजेच (SC+ST+OBC) भारत-राष्ट्राची शासनव्यवस्था, समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था खिळीखिळी करतात.
-3-
करोनासारख्या जागतिक महासंकटात मोदीजी प्रधानमंत्री म्हणून काही धोरणात्मक निर्णय घेतील, पॅकेज जाहीर करतील वा काही सुखद निर्णय घेतील अशी अपेक्षा घेऊन मोदीजींचे प्रत्येक भाषण कान देऊन ऐकले जाते, मात्र प्रत्येकवेळी पदरी निराशाच येते. अशाप्रकारे वारंवार निराशा का येते याच्या मुळाशी कोणी जाण्याचे प्रयत्न करीत नाहीत. खरे म्हणजे प्रयत्न करण्याचाही प्रश्न नाही. फक्त बाबासाहेब आंबेडकर यांनी समजावून सांगीतलेल्या दोन शत्रू राष्ट्रांचा सिद्धांत नव्या संदर्भात विस्तारून मांडला गेला पाहिजे. तेही काम आजचे पुरोगामी म्हणविणारे लोक करीत नाहीत. यांना बाबासाहेब फक्त राखीव जागांपुरतेच पाहिजे आहेत. आणी बाबासाहेबांच्या ज्या संविधानाचा हे उदो उदो करतात, ते संविधान ब्राह्मण-भारतराष्ट्र व SC+ST+OBCचे अब्राह्मणी भारत-राष्ट्र यांच्यात लोकशाही समन्वय साधणारे एक तात्पुरते 'साधन' होते. विशिष्ट काळानंतर ते या बाजूने वा त्याबाजूने निकामी होणारच होते, त्याप्रमाणे ते साधन निकामी झालेच आहे! जर SC+ST+OBC भारत-राष्ट्राचे नेते खरोखर पुरोगामी राहिले असते तर त्यांनी हे ‘समन्वयक संविधान’ नष्ट करून नवे आक्रकम समतावादी संविधान अस्तित्वात आणले असते. मात्र SC+ST+OBC भारत-राष्ट्राचे नेते बदमाष व ब्राह्मण-भारत राष्ट्राचे नेते प्रामाणिक असल्याने त्यांनी भारताचे ‘समन्वयक संविधान’ नष्ट करून नवे आक्रमक विषमतावादी संविधान अस्तित्वात आणले आहे.
ब्राह्मणी-भारत राष्ट्राच्या संविधानाचा पहिला फतवा हा आहे की, प्रत्येक संकटात वा प्रत्येक आनंदी प्रसंगात समाजाचे धृवीकरण घडवून आणले गेले पाहिजे. मागील महिन्यातील दिल्लीतील दंगल भडकाविणारे मिश्रा-ठाकूर सारखे ब्राह्मण-क्षत्रिय होते. ते उघडपणे पिस्तूल ताणून फिरत होते, पोलीसांच्या साक्षीने भडकाऊ भाषणे देत होते. तरीही या दंगलीचा मिडियामधील वृतातं आळणा म्हणजे कोणतीही चव नसलेला होता. मात्र आप पक्षाचा मुसलमान नेता ताहीर हुसेन त्याच्याच घराच्या टेरेसवर काठी घेऊन फिरतांना टिपला गेला आणी तेव्हापासून दंगलीचा वृतांत खमंग-मसालेदार चविष्ट झाला. हिंदू-मुस्लीम मसाला नसेल तर या देशात कशातही राम नाही. करोनाचे तेच झाले. जनता कर्फ्युनंतरही संसद चालू होती. संसद चालू असणे याचा अर्थ 800 सांसद, त्यांचे प्रत्येकी 5 स्टाफ व 5 कार्यकर्ते मिळून 8,000 लोकांचा हा जमावडा रोज संसद अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत एकत्र येत होता व नंतर देशभरात आपापल्या मतदारसंघात विखूरला जात होता. त्याचवेळी मध्यप्रदेशातील कॉंग्रेसी कमलनाथांचे सरकार पाडण्यासाठी व वाचविण्यासाठी शेकडो आमदार व त्यांचे हजारो कार्यकर्ते राजस्थान ते बंगळूरू वगैरे राज्यातुन फिरून आलेत व नंतर भाजपाई चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. त्याच काळात कर्नाटकच्या भाजपाच्या आमदाराच्या घरी शाही थाटात लग्न-समारंभ पार पडला. यातही 4-5 हजार लोक देशभरातून एकत्र आलेत व एकाच्याही तोंडावर मास्क नसतांना पुन्हा देशभर पसरलेत, महाराष्ट्रात एका धार्मिक यात्रेत 3-4 हजार भाविक जमलेत, त्यांना विरोध करणारे पोलीस मार खाऊन पळून आलेत, अयोध्येतील एक संत रामनवमीला करोनाकडे दुर्लक्ष्य करायला सांगून लाखोंच्या संख्येने अयोध्येत येण्याचे आवाहन करीत होता. या सर्व बातम्या मिडियाला धार्मिक द्वेषाचा मीठ-मसाला नसल्याने आळणी म्हणजे कोणतीही चव नसलेल्या वाटत होत्या. मात्र निजामुद्दीनचे तबलीगी सापडताच करोनाच्या बातम्या चवदार झाल्यात आणी सर्व मिडिया एकदम तुफान बनून तुटूनच पडला. युद्ध करोनाशी आहे की मुसलमानाशी? अर्थातच मुसलमानाशीच आहे, करोना निमित्त मात्र आहे! काय ईराण-इराकमध्ये हिंदू अल्पसंख्य राहात नाहीत? काय ब्रिटन-अमेरिकेत मुसलमान राहात नाहीत? तेथील मिडिया अशा मसालेदार चटपटीत बातम्या का देत नाही? कारण तेथील जनतेच्या मेंदूंचा केमिकल लोच्या झालेला नाही. कारण त्या देशात अजून आर्य-वैदिक-ब्राह्मण सत्तेत आलेले नाहीत.
-4-
भारतात आता प्रत्येक करोनाग्रस्त हा कसा तबलीगी वा तबलिगीच्या सहवासात आला आहे, याचे रसभरीत वर्ण सुरू आहे. ब्राह्मणभारत राष्ट्राचे जावडेकर-सितारमण यांनी जाहीर केलेले एक लाख सत्तर हजार कोटी रूपयांचे पॅकेज किती गरीबांपर्यंत पोहोचले, किती राज्यांना किती निधी दिला, केंद्र शासनाने किती अन्नछत्रे सुरू केलीत, आणी तरीही या कष्टकरी लोकांचे लोंढे गावाकडे का जात आहेत, आतापर्यंत किती भूकबळी गेलेत, टाटांनी दिलेले पैसे कुठे वापरलेत, मदत करण्यासाठी अंबानीला अजून मुहुर्त का सापडत नाही, अजीम प्रेमजी मदत करतांना शासकीय यंत्रणेवर अविश्वास का दाखवितात, करोनाच्या संकटकाळात संसद अधिवेशन चालू ठेवणार्यांवर पोलीस कारवाई केव्हा करणार, कर्नाटकचा लग्नाळू आमदार जेलमध्ये केव्हा डांबणार, ऐन करोना संकटात देशहिताकडे दुर्लक्ष्य करणारया व एक राज्य सरकार पाडून तेथे नवे सरकार आणणार्यांवर कारवाई केव्हा करणार वगैरे प्रश्न ब्राह्मण-भारत राष्ट्रात गैरलागू आहेत. कारण या प्रश्नांना धार्मिक-जातीय द्वेषाचा मीठ-मसाला नाही. हे सगळे प्रश्न व्हेज आहेत. त्यामुळे असे प्रश्न विचारण्याचे धाडस कुणी करू नये. निजामुद्दीनच्या मीठ-मसाल्यातून करोना फ्रायच्या तबलीगी नॉन-व्हेज बातम्या मिडियातून घरोघरी परोसल्या जात असतांना निव्वळ आळणी व व्हेज बातम्या पाहिजेतच कशाला तुम्हाला? मोठमोठे पुरोगामी म्हणविणारे नेते, विचारवंत इतिहास-संशोधक बगैरे लोक केमिकल लोच्याला बळी पडतात, तेव्हा या देशाची चिंता निश्चितच जीवघेणी ठरते.आज भलभले पुरोगामी केमिकल लोच्याला बळी पडत आहेत. या केमिकल लोच्या विरोधात संघर्ष करायचा म्हणजे तुम्हालाही तेवढाच प्रदिर्घ व सखोल असा परिणामकारक सांस्कृतिक संघर्ष करावा लागणार आहे. परंतू त्याआधी केमिकल लोचा झाला आहे, हे तर मान्य करावे लागेल. तो मान्य होणे कठीणच ! त्यामुळे असा संघर्ष सुरू होणे आतातरी कठीण वाटते. परंतू तरीहि या ब्राह्मणी केमिकल लोच्याविरोधात लढण्याची प्रेरणा कधीतरी पुरोगाम्यांना मिळेल या अपेक्षेत सर्वांना जयजोती, जयभीम,
सत्य की जय हो!

(लेखनः 4 एप्रिल 2020)
------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270
Mobile – 88 301 27 270
No comments:
Post a Comment