http://shrwandeore.blogspot.in/

Monday, July 23, 2018

Fadanvis and Maratha reservation

https://abpmajha.abplive.in/maharashtra/cm-fadnavis-cancels-his-plan-to-go-to-pandharpur-for-ashadhi-565288
राजकिय सत्तेच्या लालसेपाई प्रस्थापित पक्ष कसे दिशाभूल करतात व नंतर स्वतःवर बीतल्यानंतर कसे पोपटासारखे खरे बोलू लागतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे कालची फडणवीसाची फजिती व त्यानंतर त्यांनी दिलेली मुलाकात.......
1) कालच्या पंढरपूर दौर्‍यात दगडं खावी लागतील याची खात्री झाल्यावर मुख्यमंत्री पोपटासारखे खरे बोलू लागलेत.... ''मला दगडं मारून मराठा्यांना आरक्षण मिळत असेल तर माझी तयारी आहे दगडं खायची.... '' या स्टेटमेंटचा साधा-सरळ अर्थ असा होतो की, मराठा जातीला आरक्षण देणं माझ्या हातात नाही....'' मग प्रश्न असा उपस्थित होतो की, 2014 च्या निवडणूक प्रचारात व जाहीरनाम्यात असे का सांगण्यात आलं की, ''मराठा, धनगर समाजाला सरकार आरक्षण देऊ शकतं व आमचं सरकार स्थापन होताच दोन महिन्याच्या आत आम्ही आरक्षण देऊ.''
2) आम्ही गेल्या 15 वर्षांपासून ओरडून सांगतो आहोत की,
संविधानप्रमाणे मराठा, जाट, पटेल या क्षत्रिय वतनदार-जमिनदार व राज्यकर्त्या जातीला आरक्षण दिले जाउ शकत नाही. संविधानात बदल करून 50 टक्के आरक्षणाची मर्यादा नष्ट करणे व क्षत्रियांचा एक स्वतंत्र प्रवर्ग बनवूनच मराठा-जाट-पटेलसारख्या क्षत्रिय जातींना आरक्षण मिळू शकतं. त्यासाठी आमदार-खासदारांच्या घरी जाउन आंदोलने केली पाहिजेत व त्यांना विधानसभेत-लोकसभेत तसे संविधान-बदलाचे विधेयक मांडण्यास व भांडण्यास सांगीतले पाहिजे. त्यासाठी 'नचिअप्पन समितीच्या अहवालाचा फार मोठा आधार मिळतो.''
3) आता ही भुमिका आम्ही गेल्या 15 वर्षांपासून भाषणातून, पुस्तकातून व टिव्ही चर्चांतून वारंवार मांडतो आहोत. पुरूषोत्तम खेडेकरसाहेब प्रविणदादा यांच्याशी झालेल्या खाजगी चर्चांमधून अनेकवेळा सांगीतले गेले. आजही सांगतो आहोत.
4) कोणत्याही जातीला-घटकाला आरक्षण देण्याची क्षमता व पात्रता मुख्यमंत्री, राष्ट्रपती, प्रधानमंत्री व न्यायालयाला नाही. अजून सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे देशाच्या कोणत्याही सर्वोच्च व्यक्तीला, सर्वोच्च संस्थेला व कोणत्याही सुपर-डुपर ही-मॅनला आरक्षण देण्याचे अधिकार नाहीत.किंवा दिलेले आरक्षण काढून घेण्याचेही कोणाला अधिकार नाहीत.
5) आरक्षण देण्याचे व काढून घेण्याचे अधिकार फक्त ''मागासवर्गीय आयोगांना'' असतात.
...... पण आम्ही अशी मांडणी केली की, प्रस्थापित नेते व शासकीय दलाल आम्हाला '''मराठा-द्वेष्टा'' असा पुरस्कार देतात. त्याचे आम्हाला कधिच वाईट वाटले नाही.... पण अशा पुरस्काराने आनंदही झाला नाही...
......... परंतू काल जे सत्य फडणवीसांनी मांडलं तेच सत्य आम्ही 15 वर्षांपासून मांडतो आहोत. पण फडणवीसांनी मराठा समाजाची दिशाभूल करून मराठा समाजाला फसविले व पूर्ण 5 वर्षांची सत्ता मिळविली. ते एवढेच करून थांबले नाहीत, मराठा समाजाला फूस लावून. चिथावणी देऊन दलित-आदिवासी-ओबीसींविरोधात लाखांचे मोर्चे काढायला लावले व त्यांची आर्थिक व मानवी उर्जा अक्षरशः वाया घालविली. ही शक्ती व उर्जा जर संविधान बदलण्यासाठी लावली असती तर सर्व ब्राह्मणेतर जाती-जमातींची एकजूट होऊन संविधान बदलले गेले असते व आतापर्यंत मराठा-जाट-पटेल वगैरे जातींना आरक्षण प्राप्तही झाले असते.
........ हेच सत्य न्यायधिशद्वय कोळसे-पाटील व सावंत साहेब सांगत होते, परंतू सत्य सांगण्याची किंमत त्यांनाही चूकवावी लागली. आर.एस.एस.च्या मराठा जातीतील दलालांनी या ''प्रबुद्ध मराठा'' बुद्धीमानांना समाजाच्या बैठकीतून अत्यंत अपमानास्पद पद्धतीने हाकलून लावले आणी फेबु-व्हाट्सपवर सूज्ञपणाच्या बाता मारणार्‍या एकही ज्ञानी(?) मराठ्याने या घटनेचा साधा निषेधही व्यक्त केला नाही. सगळे कसे आर.एस.एस.ची भांग खाऊन गुंगले आहेत.
...गूंगत राहा, डुलत राहा व ब्राह्मणांच्या तालावर नाचत राहा..... फार मजा असते अशा गुंगण्यात
.... पाहा.. फडणवीस काय म्हणतात ते.......

No comments:

Post a Comment