सदुसष्ठावी खेप ......!
( दै. लोकमंथन, रविवार – 21 एप्रिल 2019 च्या अंकासाठी)
बहुजननामा-67
लोकसभा-2019 ची फलश्रुतीः
जातीअंताचे स्वतंत्र अस्तित्व
बहुजनांनो!
या लोकसभा निवडणूकीत कोण उमेदवार निवडून येईल किंवा कोणत्या पक्षाची सत्ता
येईल हा मुद्दाच नाही. या निवडणूकीत एकमेव महत्वाचा मुद्दा हा आहे की, दलित,
आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक या 85 टक्के जनतेचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध होणार
की नाही! जातीअंताची चळवळ नेहमीच ‘याच्या-त्याच्या’ पाठींब्यावर चालत असते.
वर्णांताची चळवळ बहुजनांनी स्वबळावर लढली व जिंकली. महामानव बुद्ध व त्यांच्या
धम्माने जी क्रांतीकारक वर्णांतक चळवळ अडीच हजार वर्षांपूर्वी सुरू केली, तीचा
आश्रय घेऊन अनेक राजांनी व सम्राटांनी ती यशस्वी केली. मात्र वर्णव्यवस्थेपेक्षा
हजार पटींनी चिवट व क्रूर असलेल्या जातीव्यवस्थेला नष्ट करण्यासाठी आपल्याला आपलेच
स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करावे लागणार आहे.
जातीव्यवस्था कायम रहावी म्हणून आरक्षण-व्यवस्था खतम केली जात आहे. त्यासाठी
वेगवेगळे षडयंत्र रचण्यात येत आहेत. महाराष्ट्रात गेल्या 70 वर्षांपासून
राज्यकर्त्या असलेल्या मराठा जातीला ‘ओबीसी’ म्हणून आरक्षण देण्यात आले आहे.
त्यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे. 52 टक्के ओबीसींच्या निर्णायक मतांवर
निवडून येणार्या भाजप-सेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी या चारही पक्षांनी संगनमाने
षडयंत्र करून मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण दिले आहे. धोबी, लोहार, सुतार,
नाभिक, कुंभार, अन्सारी, पिंजारी यासारख्या बलुतेदार-विश्वकर्मा जाती व वंजारा,
वडार, पाथरवट, धनगर यासारख्या भटक्या जमातींना म्हणजे खर्या ओबीसींना देशोधडीला
लावण्याचे काम केले आहे.
13 पॉईंट रोस्टरच्या
माध्यमातून दलित, आदिवासींचे आरक्षण नष्ट करण्यात आले आहे. 10 लाख आदिवासींना
जंगलातून हद्दपार करण्याचा आदेश सुप्रिम कोर्टाने दिलेला आहे. एट्रॉसिटी ऍक्ट
शिथील करणे, गोरक्षकांकडून मुसलमानांना होणारी मारहाण व लिंचींग करणे, असे असंख्य
अन्याय व अत्याचार कॉंग्रेस-भाजपाच्या राजवटीत होत असतांना जागृत बहुजनांनी आता
वंचितांचे सरकार आणण्यासाठी चंग बांधला पाहिजे.
भाजप-सेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी या चारही पक्षांतर्फे आपला सख्खा भाऊ किंवा
सख्खा बाप जरी निवडणूकीला उभा असेल तरी त्यांना मतदान करू नका. कारण या पक्षातर्फे
निवडणूक लढविणार्या उमेदवारांचे मालक एकतर मराठा आहेत किंवा ब्राह्मण आहेत. 29
नोव्हेंबर 2018 रोजी सर्वपक्षातील ओबीसी आमदारांनी आपल्या ‘‘मराठा वा ब्राह्मण’’ मालकांच्या आदेशाप्रमाणे मराठा
आरक्षण बीलाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे
आताही तुम्ही जर या चार पक्षांचे ओबीसी खासदार निवडून दिलेत तर ते उद्याच्या
लोकसभेत मांडल्या जाणार्या ‘जाट-पटेल-मराठा आरक्षण बीलाच्या’ बाजूनेच
मतदान करतील. 29 नोव्हेंबर 2018 रोजी जे महाराष्ट्र विधानसभेत घडले, त्याचीच
पुनरार्वृत्ती उद्याच्या लोकसभेत हे सर्व खासदार करणार आहेत. राज्यातलं ओबीसी
आरक्षण तर गेलेच आहे. उद्या देश पाळीवरचं ओबीसी आरक्षण (27 टक्के) सुद्धा खतम
होईल. या देशाचा 52 टक्के ओबीसी वाचवायचा असेल तर, कोणत्याही परिस्थितीत भाजप-सेना
व कॉंग्रेस-राष्ट्रवादी या चारही पक्षांना अजिबात मतदान करू नका.
अशा पक्षांच्या उमेदवाराला मत द्या की, त्या पक्षाचे चालक-मालक-नियंत्रक
‘ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य’ नाहीत. देशातील तथाकथित राष्ट्रीय पक्ष म्हणविणारे
कॉंग्रेस-भाजपा हे मूठभर सवर्ण जातीचे हित पाहणारे पक्ष आहेत. अर्थात हे सत्य
फुले-आंबेडकरांनी अनेकवेळा सिद्ध केले आहे. त्यामूळे ते जातीअंताचे आश्वासन आपल्या
पक्षाच्या ध्येय-धोरणात व निवडणूक जाहीरनाम्यात देऊच शकत नाहीत. वरवरच्या
मलमपट्ट्या लावाव्यात, तशा ते पुरोगामी सुधारणा व घोषणा करतात. मात्र मनापासून अमलात कधीच आणीत नाहीत.
मला निवडणूक प्रचारासाठी काही उमेदवारांनी बोलावले. मात्र माझी निवडणूक प्रचार
करण्याची पद्धती मी त्यांना सांगताच, त्यांची बोलती बंद झाली. माझी प्रचार-पद्धत
अशीः ‘‘जर तुम्ही खासदार म्हणून निवडून गेलेत तर
तुम्ही पहिल्याच अधिवेशनात ओबीसी व ब्राह्मण-मराठासकट सर्व जाती-पोटजातींची जनगणना
करायला लावणारे सरकारी वा खाजगी विधेयक मांडणार आहात. 200 पॉईंट रोस्टरचे विधेयक
मांडून त्याला घटनात्मक मान्यता मिळवून देणे, नियोजन आयोगाचे पुनरूज्जीवन
करण्यासाठी व त्या द्वारा दलित, आदिवासी, ओबीसी वगैरे समाजघटकांना त्यांच्या
लोकसंख्येच्या प्रमाणात निधी वाटप व्हावे म्हणून संविधानातच कायदा करणे. दलित,
आदिवासी व ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी होणार नाही, त्यासाठी कडक कायदा करण्यासाठी
मी संसदेत संघर्ष करीन वगैरे अशी काही
विधेयके खासदार स्वतः मांडणार आहात व जर
हे काम तुम्ही करू शकले नाहीत तर तुम्ही ताबडतोब खासदारकीचा राजीनामा देऊन घरी परत
येणार आहात, असे निवेदन लिहीलेले
जाइल व त्या खाली तुमची सही छापली जाईल!’’ आज (19 एप्रिल रोजी) डॉ. अरूणा माळी या महिला उमेदवाराने मला प्रचारासाठी बोलावण्याची
हिम्मत केली. माझी प्रचार-पद्धत सांगीतली. एखाद-दुसरी बाब शिथिल करीत मी त्यांच्या
प्रचारासाठी जात आहे.
शेवटी कळकळीचे आवाहन करतो की, ही लोकसभा निवडणूक जात्यंतक चळवळीसाठी निर्णायक
ठरणार आहे. कोण उमेदवार निवडून येतो व कोणता पक्ष सत्तेवर येतो, हा मुद्दाच नाही.
आपल्या ओबीसींसमोर व दलित-आदिवासींसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की, ‘आपण
आपली स्वतःची स्वतंत्र ‘शक्ती’ सिद्ध करतो आहे की नाही.’ या निवडणूकीत दलित, आदिवासी व ओबीसी
कॅटेगिरींनी आपले अस्तित्व सिद्ध केले नाही तर, तुम्ही पुन्हा एकदा अखिल भारतीय
पेशवाईच्या मरणांतक मगरमिठीत चिरडले जाणार व तुमच्या पुढच्या अनेक पिढ्या
जीवघेण्या नरकात ढकलले जाणार!
------- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27 270
Lokmanthan Links…….

No comments:
Post a Comment