चाळीसावी खेप ......! (दै. लोकमंथन रविवार – 9 सप्टेंबर 2018 च्या अंकासाठी)
बहुजननामा-40
भू-सुरूंग पेरणी!
बहुजनांनो.... !
1981 ते 1990
पर्यंत मंडल आयोगासाठीचे आंदोलन करणारे ‘शुद्ध’
कार्यकर्ते होते. मी त्यांना शुद्ध यासाठी म्हणतो
की, ते कोणत्याही राजकीय व स्वार्थी प्रेरणेने काम करीत नव्हते.
आणी म्हणूनच ते आंदोलन यशस्वी झाले व त्याची फलनिष्पत्ती
1990 साली मसिहा व्हि.पी. सिंगांनी मंडल-अमलबजावणी सुरू करून सिद्ध केली.
या दशकात आम्ही व आमच्यासारख्या असंख्य गल्ली-बोळातील
ओबीसी कार्यकर्त्यांनी जी आंदोलने केलीत, त्यात कुठेही गर्दी
नसायची, प्रसिद्धी नसायची, दोन नंबरच्या
पैशांची उधळपट्टी नसायची, चमकोगिरी-नेतागिरी-पांडित्यगिरी-पोपटपंची नसायची, गवगवा नसायचा! असायचा तो फक्त दांडगा-अमाप उत्साह व जबरदस्त आशावाद! भू-सुरूंग पेरण्यासाठी आवश्यक असलेली मशागत व पेरणी या दशकात झाली.
सामाजिक-सांस्कृतिक युद्धात जमिनीच्या खालची लढाई जिंकल्यानंतरच जमिनीवरच्या
लढाईला सुरूवात होते. जमिनीखालची लढाई भू-सुरूंग पेरण्याची असते व ती सर्वात जास्त जोखमीची असते. खुद्द बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे कि, संतांनी
विचारांची लढाई करून जमिन तयार केली, म्हणून छत्रपती शिवराय पुढच्या
लढाया जिंकू शकलेत. या जमिनीखालच्या लढाईसाठी मार्गदर्शक तत्वज्ञान,
लढाईचे धोरण, डावपेंच व प्रत्यक्ष कृती कार्यक्रम
आदिंची सूत्रबद्ध मांडणी करावी लागते. परिस्थीतीचे आकलन करणारी
बुद्धिमत्ता लागते. मित्र-शत्रूची सामर्थ्य-स्थळे व वीक-पॉईंट्स ओळखावे लागतात. मंडल आयोगाची जमिनीखालची लढाई 1985 पर्यंत जोर धरायला
लागताच शत्रूपक्ष खळबळून जागा झाला व त्याने प्रतिक्रियात्मक प्रतिचढाईची तयारी सुरू
केली. 1985 पासून राम-बाबर नावाचे धार्मिक
सुरूंग जमिनीखाली पेरण्याचे काम शत्रूपक्षाने सुरू केले. 1990 पर्यंत हे भूसुरूंग कोणत्याही क्षणी जमिनीचे पोट फोडून बाहेर येऊ शकतात व जातीयुद्धाचा
भडका केव्हाही उडू शकतो, अशी शक्यता गतिमान होत होती.
जमिनीखालच्या पेटत्या निखार्याची धग अपरिहार्यपणे
जमिनीवर येत होती. तिच्या परिणामी राजकीय मैदानात जबरदस्त हालचाली
व कवायती सुरू झाल्या होत्या. युद्ध रेषेच्या दोन्ही बाजूला शत्रू
पक्षांची ‘पक्ष-बांधणी’ सुरू झाली होती.
मोरारजी कालीन (1980 ची) जनता पक्षाची ‘’सर्व-जाती-धर्म समभावी’’
संकरित गोधडी फेकून देऊन ‘’गांधीवादी समाजवाद’’
नावाची नवी ‘’शूद्ध ब्राह्मणी’’ झूल पांघरलेल्या भाजपा पक्षाची बांधणी सुरू झालेली होती. या पक्षाची स्थापना 1981 लाच झाली. मात्र बांधणी 1985 नंतर सुरू झाली. कारण 1985 ला हे स्पष्ट झाले होते की, आता यावेळी मंडल आयोगाचे जातीयुद्ध टाळता येणार नाही, ते
खेळावेच लागेल. 1947 पासून ओबीसी जनगणनाविरोधी कायदा करून ओबीसींना
लढाइच्या मैदानातून बाहेर काढून लढाई टाळली गेली. 1955 पासून ओबीसीशी लढाई टाळून कसाबसा ब्राह्मणवाद जीवन जगत होता. मात्र 1985 ला ओबीसी ने ब्राह्मणी शत्रूला मैदानात खेचून
आणलाच! 1985 पासूनच भाजपा-शिवसेनेसारख्या
शूद्ध ब्राह्मणी पक्षांनी ‘’ओबीसी-सैन्य
भरती’’ सुरू केली. त्यातून त्यांनी कमंडलच्या
बाजूने लढणारे लढवैय्ये हिंदू (ओबीसी) नेते
तयार केलेत. याच काळात ओबीसी-डॉमिनेटेड
जनता दल वेगाने आकार घेत होता. युद्ध रेषेच्या दोन्ही बाजूने
हरहर महादेवच्या युद्ध-गर्जना सुरू झालेल्या होत्या. दिल्लीत जनता दलाचे सरकार स्थापन करून (शूद्ध)
जागृत ओबीसींनी बाजू मारली व पहिली मोठी राजकीय चकमक जिंकली! या
राजकीय चकमकीत दोन्ही बाजूने ओबीसीच लढत होते. मंडल आयोगाच्या
बाजूने ‘’शूद्ध’’ ओबीसी कार्यकर्ते होते
व कमंडलच्या बाजूने भाजप-सेनेतील ओबीसी जातीत जन्मलेले ‘हिंदू-नेते’ होते.
राजकीय सत्ता ओबीसी-वर्चस्वाखालील जनता दलाकडे असल्याने ब्राह्मणी-पक्ष बचावात्मक पावित्र्यात होते. याचा पुरेपूर फायदा
ओबीसी-पक्षाने घेतला. 7 ऑगस्ट
1990 रोजी हर हर महादेव सारखी युद्ध-गर्जना करीत
मंडल आयोगाच्या अमलबजावणीची घोषणा झाली व अध्यादेश काढून युद्ध जिंकल्याचे जाहीरही करण्यात आले. बचावात्मक
पावित्र्यात असलेल्या ब्राह्मणी पक्षाने मग पराभूत मानसिकता सिद्ध करीत सरकार पाडले.
‘’खिसियानी बिल्ली खंबा नोचे’’ या म्हणीप्रमाणे
बाबरी मशीदीचे खंबे नोचण्याची पाळी भाजपा-सेनेवर आली.
लोकशाहीत ‘’मर्दानगी’’ केव्हा व कशी सिद्ध करावी, याचा धडा सर्वप्रथम ओबीसी
कॅटिगिरीनेच लिहिला व प्रत्यक्षात कृतीने सिद्धही केला.
हे सर्व इथे आज का सांगत आहे?? कारण आज जाती-युद्धाची दुसरी लढाई सुरू
झालेली आहे. ‘’ओबीसी जातनिहाय जनगणना’’ या नावाचे हे दुसरे जातीयुद्ध पुन्हा पेटलेले आहे. येथेही
शूद्ध ओबीसी कार्यकर्तेच अग्रदल म्हणून काम करीत आहेत. मात्र
या युद्धाचा क्रम उलटा होता म्हणून ते पहिल्या टप्प्यात पराभूत झाले. मंडलच्या पहिल्या युद्धात ‘’शूद्ध’’ ओबीसींनी भूसुरूंग पेरून झाल्यावर जमिनीवरचे युद्ध भडकले होते, म्हणून ते यशस्वी झाले. मंडलची पहिली लढाई ‘’शूद्ध’’ ओबीसी कार्यकर्त्यांनी जिंकल्यानंतर तीचा मलिदा
खाण्यासाठी चढाओढ सुरू झाली. ओबीसी जातीत जन्मलेल्या हिंदू नेत्यांनी
हिंदूत्वाची ‘’झूल’’ अंगावरून न काढता तिच्यावरच ओबीसी-नेतृत्वाची दुसरी ‘’झूल’’ अंगावर घेतली. ज्या काळात मंडलच्या दुसर्या लढाईची तयारी सुरू करायची होती, त्याच काळात मंडलचा
मलिदा (व श्रेय) खाणार्या फुकट्यांची चढाओढ सुरू झालेली होती. दुसरीकडे मंडलच्या
बाजूने लढणारे नेतेही केवळ मलिदाच खाण्याच्या भरात राहीलेत. ओबीसींचे
पक्ष कौटुंबिक-पक्ष झालेत व ब्राह्मणी पक्षांच्या मदतीने प्रधानमंत्री
बनण्याची स्वप्ने पाहू लागलेत. ओबीसी जनगणनेच्या लढाईच्या पार्श्वभुमीवर
ब्राह्मणी पक्ष मजबूतीकडे सरकत होता व ओबीसी-पक्ष तुकडे तुकडे
होऊन कमजोर होत होता. त्यामुळे ओबीसी जनगणनेची सर्वात जास्त
जीवघेणी लढाई चूकीच्या मार्गाने लढली गेली व नंतर पाच ओबीसी नेत्यांचे बळी घेऊन पराभूत
झाली. पुन्हा सर्व शून्यावर आलं. त्यामुळे ‘’शूद्ध’’ ओबीसी कार्यकर्त्यांना
पुन्हा मैदानात उतरावे लागले.
23 व 24 मे
2015 रोजी यवतमाळमध्ये झालेल्या ओबीसी परिषदेत आम्ही ओबीसी जनगणना आंदोलनाचे
रणशिंग फुंकले. या आंदोलनाचे नेतृत्व ‘’शूद्ध’’ ओबीसी कार्यकर्तेच करणार याची आम्हाला खात्री
होती. कारण सर्वच राजकीय ओबीसी नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली
जेलमध्ये टाकले जातील, अशी दहशत सत्तेवर असलेल्या ब्राह्मणी पक्षाने
निर्माण करून ठेवलेली होतीच! त्यामुळे आम्हाला खात्री होती की
हे आंदोलन केवळ ‘’शुद्ध’’ ओबीसीच करतील
आणी तेच आमच्या यशाचे गमक ठरले आहे. आता 1981 ते 1990 च्या दशकातील जमिनीखालची सुरूंग-पेरणी जशी यशस्वी ठरली तशीच आमची 2015 ते
2018 दरम्यानची भू-सूरूंग लावणीही यशस्वी झाली.
ओबीसी जनगणना अभियान पूर्ण महाराष्ट्रभर
यशस्वी झाल्यानंतर पुढच्या जमिनी-युद्धाचे नेतृत्व
राजकिय ओबीसी नेत्यांनी हाती घ्यावे, यासाठी भुजबळसाहेबांना
‘’ओबीसी-योद्धा’’ म्हणून
जाहीर केले. आझाद मैदानावरील 11 मे
2018 रोजीच्या समारोपाच्या जाहीर सभेत अध्यक्ष म्हणून भुजबळसाहेबांना
व बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांना उद्घाटक म्हणून निमंत्रीत करण्यात आलेले होते.
पण हे दोघे नेते ‘’गर्दी’’ पाहून आलेच नाहीत. दलित-ओबीसी नेत्यांना
अजूनही कळत नाही की, गर्दी गोळा करून राजकीय सत्ता बळकावण्याचे
दिवस संपलेत! सरंजामशाही-हुकुमशाही-जातशाही मध्ये जातीची गर्दी करून दहशत निर्माण करता येत होती. अशा दहशतीच्या जोरावर साधन-संपन्न असलेल्या कष्टकरी जातींना
साधनहीन-संपन्नताहीन करण्यात आले. त्यातूनच
जातीव्यवस्था निर्माण झाली. स्वतः कष्ट न करता दुसर्याच्या कष्टावर डल्ला मारून ऐष-आरामी व रंडीबाजीचे जीवन
जगणार्या पुरोहित-जमिनदार-वतनदार जाती व व्यापारी जाती या मैदानात उतरून आपली ‘मर्दानगी’ सिद्ध करू शकत नाहीत, कारण त्यांनाही माहीत असते की आपण ‘’नामर्दच’’
आहोत. म्हणून मग ते ‘’जातीची
गर्दी’’ जमवून दहशत निर्माण करतात व कष्टकरी जातींचे मिळालेले
अधिकार नष्ट करतात. आजचा ऍट्रॉसिटी ऍक्टविरोधाचा भारत-बंद किंवा ओबीसी-आरक्षणाविरोधातील क्षत्रिय जातींच्या
कारवाया ही ‘’नामर्दपणाची’’ आदर्श उदाहरणे आहेत.
इंग्रजांच्या आगमनाने लोकशाही आली
आणी नामर्दांच्या ‘’दहशत-गर्दीला’’
लगाम बसला. लोकशाहीच्या काळात मर्दानगीची परिभाषाच
बदलली. आता गर्दीचे राजकारण गेले व शास्त्रशूद्ध तत्वज्ञान,
विचारधारा, प्रबोधन व कृतीकार्यक्रम या मार्गानेच
‘मर्दानगी’ सिद्ध करावी लागते. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले व बाबासाहेब आंबेडकर यांनी मुठभर जागृत लोकांना
सोबत घेऊन बलाढ्य शत्रूजातींना पराभूत केले व लोकशाहीतील आपल्या जातींची ‘मर्दानगी’ सिद्ध केली. फुले-आंबेडकर हे ‘’शुद्ध’’ कार्यकर्ते
होते, म्हणून ते जाती-युद्ध जिंकू शकलेत.
अशी सगळी उदाहरणे डोळ्यासमोर असूनही
आमचे आजचे दलित-ओबीसी नेते केवळ ‘’गर्दी’’ पाहून कार्यक्रमास उपस्थित राहात असतील तर,
त्यांना पुन्हा एकदा ‘’फुले-आंबेडकर’’ शिकविण्याची गरज आहे. अर्थात हे दोघे नेते आले नाहीत म्हणून आमचे ओबीसी जनगनना अभियान यशस्वी व्हायचे
राहून गेले काय? ते यशस्वी झालेच व त्याची पावती शत्रूपक्षाने
‘ओबीसी जनगणना घेण्याचे’ जाहीर करून दिली आहे.
आता या पुढील जमिनीवरची लढाई राजकीय पक्षांनी व नेत्यांनी करायची आहे.
ती पुरोगामी-क्रांतीकारक म्हणविणार्या पक्षांनी नाही लढवीली तर, त्याचे परिणाम काय होतील
व पुन्हा ‘’शुद्ध’’ ओबीसी कार्यकर्त्यांनी
काय केले पाहिजे, या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील बहुजननामाच्या
चावडी-चर्चेत शोधू या! तोपर्यंत सर्वांना जयजोती-जयभीम!!
-------
प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270

No comments:
Post a Comment