http://shrwandeore.blogspot.in/

Wednesday, March 28, 2018

7 BahujanNama Lokmanthan 21 Jan 2018

सातवी खेप......! (दै. लोकमंथन रविवार –21 जानेवारी 2018साठी)

बहुजननामा

संतांच्या पुण्य-भूवर स्वराज्याचा वटवृक्ष!

बहुजनांनो.... !
सुरूवातीच्या काळातील सुप्त संघर्ष हे कळत नकळतपणे भूसुरूंग पेरत असतात. खरे म्हणजे
तो संघर्ष नसतोच! एकतर्फी जळफळाट असतो. प्रत्येकजण आपआपल्या परंपरेनुसार वागत
असतो. पण विरोधी परंपरावाले नकळतपणे आपले शत्रू बनत असतात. म्हणजे जर का
शिवरायांनी आपल्या राज्याला भवानीराज्याऐवजी रामराज्याची उपमा दिली असती, तर
ब्राह्मणांशी वादविवाद होण्याचा प्रश्नच नव्हता. 1990 साली जर का व्हिपी सिंगांनी मंडल
आयोगाची अमलबजावणी सुरू केलीच नसती तर, विरोधकांचे राममंदिरासाठीचे आंदोलन
झालेच नसते, बाबरी मशीद पडलीच नसती व व्हिपी सिंगांचेही सरकारही पडले नसते. केवळ
व्हिपी सिंगच नव्हे तर त्यांची पूर्ण फॅमिली आज तुम्हाला राजकारणात प्रभाव गाजवितांना
दिसली असती. एक क्षत्रिय राजा जो नंतर लोकशाही पध्दतीने देशाचा खराखुरा राजा झाला,
त्याची पूर्ण फॅमिलीच बरबाद करून टाकण्याइतकी ताकद दीड टक्क्यांच्या ब्राह्मणी छावणीत
आहे.
तेच शिवरायांचे! त्यांनी देशातल्या इतर क्षत्रिय राज्यांप्रमाणे ब्राह्मणी-पुरूषसत्ताक प्रेरणा
न घेता मातृसत्ताक प्रेरणा घेऊन राज्य उभारणी केली. आणी इथेच ब्राह्मणी छावणीचा
जळफळाट सुरू झाला. मातृसत्ताक संस्कृती ही ब्राह्मणांच्या पुरूषसत्ताक संसकृतीच्या कट्टर
विरोधातील बाब आहे. शिवराय हे शूद्र असल्याने ते कूलसंस्कृती मानीत होते. ब्राह्मण-आर्य हे
भटके-पशूपालक असल्याने गोत्र संस्कृतीचे होते. कूल हे कूलमातेकडून येते. गोत्र हे पुरूष
ऋषींकडून येते. लग्न जुळवितांना शूद्रादिअतिशूद्र लोक हे आईचे (मामाचे) कूळ विचारतात,
ब्राह्मण गोत्र विचारतात. शूद्र कमर-दोरा घालतात, ब्राह्मण जाणवे घालतात. शूद्र पांढरी टोपी
घालतात, ब्राह्मण हे काळी टोपी घालतात. शूद्र हे सरळ जिभेने बोलतात, ब्राह्मण हे नाकाने
बोलतात. ब्राह्मणांनी ज्यांना अस्पृश्य ठरविले, त्यांच्या दर्शनाशिवाय शूद्र शेतकरी पेरा
करायला जात नाही.
आपल्या मातृसत्ताक प्रेरणा घेऊन शूद्र शिवराय स्वराज्याची उभारणी करीत होते. त्यात
ब्राह्मणविरोध वा ब्राह्मणशत्रूत्व हा विषयच नव्हता. तसे असते तर, त्यांनी सचिव-कारकून
म्हणून मोरोपंत पिंगळेंसारखे 7 कट्टर ब्राह्मण आपल्या दरबारात नेमलेच नसते. त्यामुळे
शिवरायांचे शत्रूत्व ब्राह्मणांशी असण्याचा प्रश्नच येत नाही. पण परकीय असूनही, अल्पसंख्य
असूनही व आपल्या लायकीचा विचार न करता केवळ षडयंत्रांच्या साहाय्याने सत्तेच्या वा

2

मोक्याच्या जागा शोधणारा ब्राह्मण समाज कोणालाही शत्रू म्हणून अंगावर घेतो. बरं, तो हे
शत्रुत्व उघडपणे, सरळपणे व निती-नियमाने अंगावर घेत असेल तर आपले काही म्हणणे
नाही. म्हणजे मुसलमान व इंग्रज हे प्रामाणिकपणे आपले शत्रू म्हणून आलेत व त्यांनी
आपल्याला मैदानात पराभूत करून आपल्यावर राज्य केले. हे समाजशास्त्राच्या नियमाने व
नितीनियमाने झाले. याच नितीनियमाने आम्ही शुद्रादिअतिशूद्र जनतेने त्यांना पराभूत केले व
देश स्वतंत्र केला. पण या ब्राह्मण-परकियांचे निती-नियमच अनितिकारक. तुमच्या सोबत
राहतील, तुमचे मित्र राहतील, तुमच्या धर्माचे सांगतील. तुमच्या ताटात जेवण्याचे नाटकही
करतील व संधी मिळताच तुमच्या ताटात ‘हागून’ मोकळे होतील.
मातृसत्ताक समातावादी व विज्ञानवादी शूद्र शिवरायांचे राज्य ‘’स्वराज्य’’ म्हणून
स्थापन होऊ नये, म्हणून याच ब्राह्मणांनी ‘शतकोटी चंड यज्ञ’ वाईला केला. औरंजेबचा
सेनापती मिर्झा राजे जयसिंगला पुरंदर किल्ला जिंकून देण्यात मदत केली. तत्कालीन क्षत्रिय
म्हणून मिरविणार्‍या मराठा सरंजामदारांनी ब्राह्मणांशी युती करून शूद्र-शिवरायांना पुरते
जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. परंतू शिवराजे डगमले नाहीत. त्यांच्या पाठीशी मां जिजाऊ
भक्कमपणे उभ्या होत्या. आई भवानीचे साक्षात रूप घेऊन जिजाऊ स्वराज्य उभारणीसाठी
कष्ट उपसत होत्या. पण त्याहीपेक्षा मोठी साथ तुकोबांच्या अभंगांची होती. संतश्रेष्ठ
तुकोबाराय यांच्या पाईकीच्या अभंगांनी जी प्रेरणा शूद्रादिशूद्र मावळ्यांमध्ये निर्माण केली तीला
जगात तोड नाही. तुकोबाच्या सामाजिक अभंगांनी ‘शूद्र-कुणबी’ म्हणून जी अस्मिता निर्माण
केली, तीने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. केवळ तुकोबाच नाही, अकराव्या
शतकापासून आद्य संत नामदेव, स्वामी चक्रधर, संत ज्ञानेश्वर, ज्येष्ठ संत सावता महाराज,
लेखणी-बहाद्दूर संत जगनाडे महाराज, मातीलाही आकार देणारे संत गोराजी, संत सेना अशा
एक ना दोन, असंख्य संतांनी पूर्ण भारतभर महाप्रबोधनाची लाट निर्माण केली. युरोपातील
Renascence Movement त्यापुढे फिकी पडावी. अशाप्रकारे जवळपास 500 वर्षे असंख्य
साधू-संत आपला जीव धोक्यात घालून राज्य क्रांतीसाठी जमिन तयार करीत होते. त्या सुपीक
जमिनीवर ‘स्वराज्या’ चा वटवृक्ष डोलत होता. या वटवृक्षाची गोड-गोमटी फळे शूद्र जनतेने
चाखलीत. परंतू या वटवृक्षाला विषवल्लींनी कसे कसे वटोळे घातले ते पुढच्या भागात पाहू या!
तोपर्यंत जयजोती! जयभीम!!

-- -- -- - प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270
Email- s.deore2012@gmail.com

No comments:

Post a Comment