सहावी खेप......! (दै. लोकमंथन रविवार –14
जानेवारी 2018साठी)
बहुजननामा
एकमेव
स्वराज्य संस्थापक मातृवंशक शिवराय
बहुजनांनो....
!
देशात अनेक
राजे महाराजे होऊन गेले असतांना व त्यांनीही लढाया करून राज्ये स्थापन केलेली
असतांना मी केवळ शिवाजी राजालाच एकमेव स्वराज्य संस्थापक का म्हणतो आहे, असा
प्रश्न उपस्थित होऊ शकतो. राज्य आणी स्वराज्य यात आपल्याला फरक करता आला पाहिजे.
राज्य कुणीही स्थापन करू शकतो. सैन्य बलवान व साधनांसह संख्यावान असेल तर कुणीही
राजा होतो. मात्र स्वराज्य स्थापन करण्याठी जी एक वेगळी गुणवत्ता लागते ती केवळ
लढाया जिंकणार््या व हरणार्या राजांजवळ नसते. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य
स्थापनेचे दोन टप्पे आहेत, ते समजुन घेतल्याशिवाय आपणास त्यांचे
स्वराज्यसंस्थापकत्व लक्षात येणार नाही. त्यांनी केलेल्या संघर्षाचा पहिला टप्पा
हा भुगोलासाठीचा राजकीय लढा होता. असा लढा प्रत्येक राजा करतो. प्रदेश जिंकणे व
राज्य स्थापन करणे किंवा राज्याच्या सीमा वाढविणे हे प्रत्येक राज्याचे कामच असते.
त्याप्रमाणे त्यांनी केले. मात्र हा लढाईचा पहिला टप्पा पार करीत असतांना
शिवरायांना ज्या अनपेक्षितपणे स्वकियांच्या संघर्षाला सामोरे जावे लागत होते
त्यावरून त्यांच्या मनात केवळ ‘राज्य’ नव्हे तर स्वराज्यच हवे असा पक्का निर्धार
होत गेला.
शिवरायांना
राजे मानायला कुणीही ब्राह्मन तयार नव्हता. जावळीचे मोरेंसारखे अनेक
वतनदार-जमिनदार शिवरायांना शूद्रच मानीत होते. अकबराला ईश्वराचा अंश मानणारे
ब्राह्मण ‘’दिल्लीश्वरौ वा जगदीश्वरौ वा’’ असे आवाहन करून अकबराकडून दक्षिणेची भीख
मागत होते. मात्र हेच ब्राह्मण शिवाजी राजास शूद्र समजून त्यांच्या राजाभिषेकाला
विरोध करीत होते. हे सर्व अनुभवत असतांना ‘राजा व राज्य’ ही संकल्पनाच शिवरायांना
गुलामीचे प्रतिक वाटत होते. स्वराज्यच हवे. केवळ एका परधर्मिय राजाकडून मुक्ती
मिळविणे म्हणजे ‘स्वराज्य’ नव्हे! परधर्मिय राजाकडून मुक्ती मिळविल्यावरही राजा
आपल्या प्रजेसकट स्वधर्मिय असलेल्या तथाकथित उच्च वर्णीयांची गुलामगिरी करीत असेल
तर असले राज्य काय कामाचे? केवळ राज्य स्थापन करणे म्हणजे परकिय राजाच्या
अन्याय-अत्याचारातून मुक्त होणे होय! परंतू स्वधर्मिय म्हणविणार्या तथाकथित
उच्चवर्णीयांचे अन्याय-अत्याचार चालूच आहेत. स्वतः राजाच अशा जातीय
अन्याय-अत्याचाराला बळी पडतो आहे, तर माझ्या आई भवानीच्या 96 कुळी शुद्रादिअतिशूद्र
प्रजेचं काय? म्हणून केवळ राज्य नव्हे तर, स्वराज्यच हवे, असा निर्धार पक्का झाला.
राज्य
स्थापना ते स्वराज्य निर्मिती हा प्रवास तसा खडतर होता. तो मैदानी लढाईचा भाग
नव्हता. म्हणून येथून सुरू होतो शिवरायांच्या जीवन संघर्षाचा दुसरा टप्पा!
सांस्कृतिक संघर्ष ऐसे त्याचे नाव! स्वराज्य निर्मितीची लढाई स्वतःच्या दरबारापासून
सुरू झाली. शिवरायांनी आपल्या पार्लमेंटमध्ये पहिले विधेयक मांडले. विधेयकाचे नाव
होते, ‘ब्राह्मन म्हणून कोण मुलाहिजा करतो?’ दरबारात चर्चा होऊन या विधेयकाचं
रूपांतर कायद्यात होणार होतं. हा कायदा मंजूर झाला तर शिवराज्यात कोणालाही
‘ब्राह्मण’ म्हणून ज्यादा अधिकार वा सवलती मिळणार नाहीत. सर्व प्रजा एकसमान.
ब्राह्मणाने चोरी केली तर, त्याला तीच शिक्षा होईल जी शिक्षा शूद्राला होते.
ब्राह्मणाने खून केला तर त्याला शूद्राप्रमाणे फासावर लटकावेच लागेल. ब्राह्मण
म्हणून त्याला विशेष अधिकार वा संरक्षण मिळणार नाही. मनुस्मृती नावाच्या
संविधानावर ही कुर्हाडच पडत होती. कारण मनस्मृतीतील कायदा स्पष्टपणे सांगतो की,
शूद्राने खून केला तर त्याला फाशीची शिक्षा व ब्राह्मणाने खून केला तर त्याला द्रव्य
देऊन सन्मानाने राज्याबाहेर हद्दपार करावे. आतापर्यंचे भारतातले सर्व मध्ययुगीन
राजे राज्यकारभार चालवितांना मनुस्मृतीला राज्यघटना मानून काम करीत होते. ब्राह्मण
आहे तर तो मुलाहिजा करणारच, असे मान्य करूनच राज्यकारभार चालत होता. मात्र
शिवरायांना ते मान्य नव्हतं कारण त्यांना केवळ राज्य नव्हे तर ‘स्वराज्य’ स्थापन
करायचे होतं. आई भवानी गणमातेचं 96 कुळी मराठा गणराज्य स्थापन करायचं होतं.
ब्राह्मण
म्हणून कोण मुलाहिजा करतो, या नावाचं विधेयक शिवरायाच्या पार्लमेंटमध्ये सादर
होताच जणू काय आकाशच कोसळलं! पार्लमेंटमधील शिवरायांचा नोकर असलेला मुख्य सचिव
मोरोपंत पिंगळे कडाडला, ‘’ महाराज तुम्ही राजे असलात तरी वैदिक धर्मशास्त्रानुसार
शूद्र आहात. एक शूद्र माणूस ब्राह्मणाला शिक्षा करू शकत नाही.’’ मनुस्मृतीच्या
कायद्याप्रमाणे शूद्र माणूस ब्राह्मणाला शिक्षाच काय ‘आर-कारे’ सुद्धा करू शकत
नाही. ब्राह्मण वयाने कितीही लहान असला तरी तो दिसताच शूद्र म्हातार्यानेही
त्याला झुकून नमस्कार केला पाहिजे. मग यावर उपाय काय? उपायासाठी ताबडतोब दुसरे
विधेयक मांडले गेले. वैदिक धर्मशास्त्रानुसार राजाभिषेक करून क्षत्रिय बनता येतं.
क्षत्रियत्व प्राप्त झाल्यावर ब्राह्मणालाही शिक्षा करता येते. शिवराजाने
राजाभिषेकाचा निर्णय घेताच महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मणांनी बहिष्कार घातला. वैदिकी
राजाभिषेकाचा विधी करण्यासाठी ब्राह्मण लागतोच. या वैदिकी राजाभिषकाचा संतापजनक
इतिहास पुढील खेपेत पाहू या!
तोपर्यंत
जयजोती! जयभीम!!
-------
प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270
Email- s.deore2012@gmail.com
No comments:
Post a Comment