http://shrwandeore.blogspot.in/

Tuesday, August 14, 2018

36 BahujanNama Lokmanthan 12 Aug 18 Action-reaction


छत्तीसावी खेप ......!   (दै. लोकमंथन रविवार – 12 ऑगस्ट 2018 च्या अंकासाठी)
 बहुजननामा-36
ऍक्शन-रिऍक्शन संविधान डिरेक्शन!
बहुजनांनो.... !
  तात्यासाहेब महात्मा फुले, राजर्षी शाहू व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे हजारो लोक कधीच उभे नव्हते, मात्र तरीही ते ऍक्शन प्रोग्राम राबवित राहीलेत व तत्कालीन ब्राह्मण त्यांना रिऍक्शन देत राहीलेत, हेच फुले-शाहू-आंबेडकरांच्या यशाचे रहस्य आहे. त्या काळात जागृती नव्हती, त्यामुळे या महापुरूषांच्या पाठीशी शेकड्यातही लोक नव्हते. आज सर्वत्र जनजागृती आहे. हजारो नव्हे लाखोंनी लोक एकत्र येऊन ऍक्शन करू शकतात व ब्राह्मणवाद्यांना रिऍक्शनमध्ये टाकून पराभूत करू शकतात. पण लाखोंची ही बहुजन जागृती वांझोटी आहे. म्हणून ती ब्राह्मणांच्या संविधान जाळण्याला व भगवद्गीता वाटपाला केवळ ‘’शिव्या-शापांची’’ रिऍक्शन देऊन आपली पराभूत मानसिकता उघड करीत आहेत.
आर्य समाजाच्या स्वामीजींची मिरवणूक पुण्यातील आर्यसमाजी (पुरोगामी) ब्राह्मणांनी काढण्याचे
ठरविले, तेव्हा पुण्यातील सनातनी ब्राह्मणांनी त्यांना विरोध केला व मिरवणूक उधळण्याची धमकी दिली. त्यावेळी आर्यसमाजी (पुरोगामी) ब्राह्मणांनी तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुलेंकडे गेले व संरक्षणाची मागणी केली. तात्यासाहेब या मिवणूकीत एकटेच शूद्र म्हणून समिल झालेत. मिवणूकीत सर्वात पुढे तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले चालत होते. तात्यासाहेबांना पाहताच सनातनी ब्राह्मण ढूंगणाला पाय लावून पळालेत, ते नंतर आलेच नाहीत. याला म्हणतात ऍक्शन की ज्यामुळे ब्राह्मण पराभूत मानसिकतेमुळे रिऍक्शनमध्ये गेलेत व पराभूत झालेत. तात्यासाहेबांनी असे अनेक कार्यक्रम राबविलेत की ज्यामुळे सनातनी ब्राह्मण वारंवार रिऍक्शनमध्ये गेलेत व पराभूत होत राहीलेत.
असेच कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेत व शत्रूला वारंवार रिऍक्शनमध्ये टाकले. बलाढ्य कॉंग्रेस व त्यांच्या बलाढ्य असलेल्या नेत्यांना (महात्मा गांधीजींना) कितीतरी वेळा रिऍक्शनमध्ये टाकून पराभूत केले. गांधीजींचे पुणे कराराविरोधातील प्राणांतिक उपोषण ही सर्वात मोठी पराभूत मानसिकतेची रिऍक्शन होती, त्यात बाबासाहेब कागदावर हारलेत परंतू नीतीमत्तेत जिंकलेत. शाहु महाराजांनी तर वेदोक्तचे व राखीव जागांचे आव्हान उभे करताच महाराष्ट्रातील तमाम ब्राह्मण व त्यांचे टिळकांसारखे दिग्गज(?) नेते कडमलेच! या पराभूत मानसिकतेतून त्यांनीकेसरीतूनजे तारे तोडले, ते आजही ऐतिहासिक कु-दाखले म्हणून वापरले जातात.
ब्राह्मणेतर चळवळीचे ब्राह्मणी-कॉंग्रेसमध्ये विलिनीकरण होताच सत्यशोधक चळवळीचा
दबदबा कमी झाला व ब्राह्मण उत्तरोत्तर मुजोर होत गेलेत. राजकीय सत्ता मराठा समाजाकडे सोपवून प्रशासनाचा कब्जा ब्राह्मणांनी केला. शासनाच्या पातळीवर गणेश-उत्सवासारखे अनेक ब्राह्मणी सण शाळा-कॉलेसमधून धुमधडाक्यात होऊ लागलेत. त्यातून ब्राह्मणी कु-प्रबोधन वाढले. महाराष्ट्र शिव-छत्रपतींचा, मात्र शाळा-कॉलेजमधून कधीही शिव-जयंती महोत्सव साजरा झाला नाही. मंत्रालयात मराठा मंत्र्यांकडूनच सत्यनारायन सुरू झालेत. शाळेच्या पुस्तकातून-गणपतीचा’, ‘-भटजीचाआमच्या मुलांच्या डोक्यात भिनविला. हे सर्व कुप्रबोधन जनतेत विषासम एवढे भिनले की ज्यातून ब्राह्मण सनातनी मुख्यमंत्रीच निपजला. आणी मग सुरू झाला पेशवाईचा नंगानाच! जागृत झालेल्या जाती ज्या जातीअंताकडे जात होत्या, त्या आज आर.एस.एस. च्या इशार्यावर आपसात नॉन-इश्युंवर भांडत आहेत. उघडपणे भगवद्गगीतेचे, मनुस्मृतीचे उदात्तीकरण होत आहे. संविधान जंतर-मंतरवर जळत आहे. ब्राह्मण बिनधास्तपणे कृती कार्यक्रमांचा धडाका लावत आहेत व आपण मुठभर पुरोगामी फेबु-व्हाटसपवर शिव्या घालून रिऍक्शन देत आहोत.
ब्राह्मणी कु-प्रबोधनाच्या कार्यक्रमांना आम्ही कधीच रिऍक्शन नाही दिली. 1994 साली फुले-आंबेडकर विद्यापीठाची स्थापना केली. ‘’सत्यशोधक छत्रपती ज्ञानपीठ’’ उभारले. त्याचा एक अभ्यासक्रम तयार केला व तो गेल्या 25 वर्षांपासून महाराष्ट्रात राबवित आहोत. आपण सर्वच जर ऍक्शनरी (मिशनरी) असतो तर हे विद्यापीठ आज बौद्ध विद्यापीठासारखे भारताच्या स्तरावर महाप्रबोधनकारी ठरले असते व आजची ब्राह्मणी प्रतिक्रांती झालीच नसती. पण आम्हाला रिऍक्शनरी बनण्यातच जास्त इंटरेस्ट! ऍक्शनरी होण्यासाठी बराच काही त्याग करावा लागतो. खिशातून पैसे खर्च करावे लागतात, वेळ द्यावा लागतो, कुटूंब-प्रेम कमी करावे लागते व समाज-प्रेम वाढवावे लागते. एखादेकामहाती घेऊन ते टार्गेटपर्यंत न्यावे लागते. एवढी सर्व दगदग करून पुरोगामी बनण्यापेक्षा फेबु-व्हाटसपवर भिडे गुरूजींना दोन-चार शिव्या दिल्या की काम भागते.
सत्यशोधक छत्रपती ज्ञानपीठाच्या 25 वर्षांच्या अथक इतिहासात आम्ही ज्या परिक्षा
घेतल्यात्यात तात्यासाहेब व बाबासाहेबांच्या मूळ पुस्तकांवर परिक्षा घेतल्यात. गुलामगिरी, ऍनिहिलेशन ऑफ कास्ट, शेतकर्याचा असूड, कास्ट इन इंडिया, सार्वजनिक सत्यधर्म, ब्राह्मणांचे कसब, हु वेअर दि शुद्राज अशी सर्व पुस्तके मूळ स्वरूपात छापून परिक्षा घेतल्यात. त्यानंतर छत्रपती शिवाजी, राजे संभाजी, माता जिजाऊ, सावित्रीमाई फुले. अहिल्यामाइ होळकर, माता रमाई, ताराबाई शिंदे अशा सर्व महापुरूष व महान स्त्रियांवर चरित्रग्रंथ छापून त्यावर परिक्षा घेतल्यात. त्यानंतर बाबासाहेबांनी लिहिलेल्या पहिल्या राज्यघटनेवर व दुसर्या राज्यघटनेवरही परिक्षा घेतल्यात. हा परिक्षा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रात विविध जिल्ह्यातून 300 परिक्षा केंद्रांवर दरवर्षी संपन्न होत असतो. आमच्या काही आर्थिक व तांत्रिक अडचणींमुळे हा कार्यक्रम गेल्या 2-3 वर्षांपासून बंद आहे.
आमच्या या कार्यक्रमांना सनातनी ब्राह्मणांनी कधीच रिऍक्शन दिली नाही. कारण त्यांना खात्री होती की, बहुजन आवाका हाशाळा-कॉलेजपर्यंतच आहे. शाळा-कॉलेज काढणे म्हणजे पुरोगामी सिद्ध होणे. परंतू या शाळा-कॉलेजेसमध्ये ब्राह्मणी अभ्यासक्रमच शिकविला जातो, हे आजही त्यांच्या लक्षात येत नाही. विद्यापीठ उभारून आपला स्वतःचा समतावादी अभ्यासक्रम आपण राबविला पाहीजे, हे मात्र आता बर्याच बहुजनांना पटले आहे. आणी म्हणून 2-3 वर्षांपासून थांबलेले हे काम आता पुन्हा सुरू करीत आहोत.
‘’भारताचे संविधानः जसेच्या तसे’’ या ग्रंथावर परिक्षा घेण्याचे निश्चित झाले आहे. या
अभ्यासग्रंथात संविधानातील सर्व कलम, न्यायमुर्ती पी.बी. सावंत यांची प्रस्तावना, मान्यवर सुनिलजी खोब्रागडे यांचीभुमिका व कृतीव बाबासाहेब आंबेडकरांची संविधान सभेतील निवडक भाषणे आदि प्रकरणे आहेत. हा अभ्यासग्रंथ परिक्षार्थींना केवळ 200 रूपयात दिला जाईल व त्यावर ऑक्टोंबर अखेर राज्यस्तरीय परिक्षा घेण्यात येईल. परिक्षा उत्तीर्ण होणार्यास प्रमाणपत्र व मेरिटमध्ये येणार्यास हजारो रुपयांची बक्षिसे जिंकता येतील. आता आपणा सर्वांसाठी एक छोटासा कृती कार्यक्रम! संविधानावर प्रेम करणार्या प्रत्येक व्यक्तीने किमान 25 अभ्यासग्रंथ ज्ञानपीठाकडून विकत घेणे व ते ग्रंथ आपल्या परिसरातील शाळा-कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना फुकट वाटप करणे. अभ्यासग्रंथ फुकट वाटप करतांना त्याला या ग्रंथावरील परिक्षेस बसविण्यास सांगणे व हजारो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. जे मान्यवर 50 अभ्यासग्रंथ विकत घेऊन वाटप करतील त्यांचा फोटो व परिचय या अभ्यासग्रंथात शेवटच्या पानावर फोर कलरमध्ये छापला जाईल. तर चला आता लागू या कामाला. पुढील मोबाईलवर एस.एम.एस. पाठवा व या ‘’संविधान गौरव परिक्षा’’ कार्यक्रमात सामिल व्हा!
------- प्रा. श्रावण देवरे
Whatsap No. Mobile – 88 301 27 270
                                      Blog ब्लॉग-https://shrwandeore.blogspot.in/
                                       Email- s.deore2012@gmail.com


No comments:

Post a Comment