http://shrwandeore.blogspot.in/

Wednesday, August 15, 2018

संविधान गौरव परिक्षा!!


भगवद्गीता वाटप, संविधान दहन, मनुस्मृती उदात्तीकरण
आदि सुरूच राहील! आपण एकच काम करू या!
घर घर संविधान!            संविधान गौरव परिक्षा!!
भारताचे संविधानः जसेच्या तसे’’ या ग्रंथावर परिक्षा घेण्याचे निश्चित झाले आहे!
  1)   गेल्या 25 वर्षांपासून फुले आंबेडकर तत्वज्ञान संस्था (विद्यापीठ) संचलित सत्यशोधक छत्रपती ज्ञानपीठ मार्फत समतावादी अभ्यासक्रमावर अधारित ग्रंथांवर राज्यस्तरीय परिक्षा आयोजित केल्या जातात.
  2)   ‘’भारताचे संविधानः- जसेच्या तसे’’ या अभ्यासग्रंथात संविधानातील सर्व कलम, न्यायमुर्ती पी.बी. सावंत यांची प्रस्तावना, मान्यवर सुनिलजी खोब्रागडे यांची ‘भुमिका व कृती’ व बाबासाहेब आंबेडकरांची संविधान सभेतील निवडक भाषणे आदि प्रकरणे आहेत. हा अभ्यासग्रंथ परिक्षार्थींना केवळ 200 रूपयात दिला जाईल व त्यावर ऑक्टोंबर अखेर राज्यस्तरीय परिक्षा घेण्यात येईल. परिक्षा उत्तीर्ण होणार्‍यास प्रमाणपत्र व मेरिटमध्ये येणार्‍यास हजारो रुपयांची बक्षिसे जिंकता येतील.
3)   आता आपणा सर्वांसाठी एक छोटासा कृती कार्यक्रम! संविधानावर प्रेम करणार्‍या प्रत्येक व्यक्तीने किमान 25 अभ्यासग्रंथ ज्ञानपीठाकडून विकत घेणे व ते ग्रंथ आपल्या परिसरातील शाळा-कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना फुकट वाटप करणे. अभ्यासग्रंथ फुकट वाटप करतांना त्याला या ग्रंथावरील परिक्षेस बसविण्यास सांगणे व हजारो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
4)   जे मान्यवर 50 अभ्यासग्रंथ विकत घेऊन वाटप करतील त्यांचा फोटो व परिचय या अभ्यासग्रंथात शेवटच्या पानावर फोर कलरमध्ये छापला जाईल.
5)   तर चला आता लागू या कामाला. पुढील बँक अकाऊंट मध्ये पैसे भरा व या ‘’संविधान गौरव परिक्षा’’ कार्यक्रमात सामिल व्हा!
6)   बँक अकाऊंट चे नाव- फुले आंबेडकर तत्वज्ञान संस्था
7)   अकाऊंट नंबर- 315 120 67 850, IFS code- SBIN 00 11 669
8)    बँकेचे नाव- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
9)   बँकेत पैसे भरल्यानंतर 94 227 88 546 या व्हाट्सप नंबरच्या ‘’संविधान गौरव परिक्षा’’ या गृपवर  पैसे भरलेल्या पावतीची फोटो-कॉपी पाठवावी.


No comments:

Post a Comment